Travel Story: 12 ज्योतिर्लिंग यात्रेला कुठून सुरुवात करावी? तुमच्या लोकेशननुसार 'असा' ठरवा मार्ग

देशभरातील शिवभक्त १२ ज्योतिर्लिंगच्या दर्शनासाठी जात असतात. अशावेळी देशातील विविध राज्यांमध्ये पसरलेल्या या १२ ज्योतिर्लिंगांच्या यात्रेचे नियोजन करणे अनेक भक्तांसाठी आव्हानात्मक असू शकते.

जाहिरात
Read Time: 3 mins

Travel Plan For Jyotirlingas: हिंदू धर्मात भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांना अत्यंत पवित्र मानले जाते. या स्वयंभू ज्योतिर्लिंगांचे दर्शन आणि स्मरण केल्याने सर्व पापांचे निरसन होऊन मोक्षप्राप्ती होते, अशी अढळ श्रद्धा आहे. देशभरातील शिवभक्त १२ ज्योतिर्लिंगच्या दर्शनासाठी जात असतात. अशावेळी देशातील विविध राज्यांमध्ये पसरलेल्या या १२ ज्योतिर्लिंगांच्या यात्रेचे नियोजन करणे अनेक भक्तांसाठी आव्हानात्मक असू शकते. हा प्रवास सोपा करण्यासाठी, आपल्या प्रदेशानुसार योग्य मार्ग आणि पहिले ठिकाण निवडणे महत्त्वाचे आहे. यामुळे वेळ, खर्च आणि अंतर कमी होऊ शकते. वाचा सविस्तर... 

उत्तर भारतातून यात्रा कुठून सुरु करावी?|  (Travel Plan For North Indians

उत्तर भारतातील यात्रेकरूंसाठी, उत्तराखंडमधील केदारनाथ येथून आपल्या प्रवासाला सुरुवात करणे उत्तम आहे. यानंतर उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी विश्वनाथ, झारखंडमधील देवघर येथील वैद्यनाथ आणि मध्य प्रदेशातील दोन ज्योतिर्लिंगे: महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर यांना भेट देता येते. यात्रेच्या पुढील टप्प्यात महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर आणि घृष्णेश्वर, त्यानंतर गुजरातमधील सोमनाथ आणि नागेश्वर, आणि शेवटी दक्षिण भारतातील मल्लिकार्जुन आणि रामेश्वरम यांचा समावेश आहे.

Advertisement

दक्षिण भारतातून यात्रेची सुरुवात कुठून करावी?|  Travel Plan For South Indians

दक्षिण भारतातील भाविक तामिळनाडूतील रामेश्वरम येथील रामनाथस्वामी मंदिरापासून आपल्या ज्योतिर्लिंग यात्रेला सुरुवात करू शकतात. आंध्र प्रदेशातील श्रीशैलम येथील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाला भेट देणे सोयीचे आहे. यानंतर, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर भारतातील ज्योतिर्लिंगांना भेट देता येते.

सरकारी नोकरीची मोठी संधी! 2 लाख पगार अन् मुंबईत राहण्याची जागा; 'या' तारखेपूर्वी करा अर्ज, वाचा सर्व माहिती

पश्चिम भारतातून यात्रेची सुरुवात कुठून करावी?| Travel Plan For Western India

गुजरात आणि महाराष्ट्रातील भाविक द्वारका येथील नागेश्वर ज्योतिर्लिंगापासून सुरुवात करू शकतात. तथापि, गुजरात आणि महाराष्ट्रातील भाविकांना त्यांच्या सोयीनुसार पहिला थांबा निवडण्याचा सल्ला दिला जातो. यानंतर, सोमनाथ, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, घृष्णेश्वर, ओंकारेश्वर आणि महाकालेश्वरला भेट देता येते. अखेरीस, उत्तर भारतातील केदारनाथ, काशी विश्वनाथ आणि वैद्यनाथ मार्गे दक्षिण भारतातील मल्लिकार्जुन आणि रामेश्वरम येथे पोहोचता येते.

पूर्व भारतातून प्रवास सुरू करत असल्यास कुठे जावे? | Travel Plan For Eastern India

पूर्व भारतातील यात्रेकरूंसाठी, देवघर येथील वैद्यनाथ धाम हे सर्वोत्तम पहिले थांबे मानले जाते. यानंतर, वाराणसीतील काशी विश्वनाथ आणि उत्तराखंडमधील केदारनाथ धाम यांचा प्रवासात समावेश करता येतो. त्यानंतर, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि दक्षिण भारतातील ज्योतिर्लिंगांना भेट दिल्याने प्रवास अधिक सोपा होतो.

केदारनाथ यात्रेबद्दल महत्त्वाचे मुद्दे| Important Information Regarding The Kedarnath Yatra

जर तुम्ही उत्तर भारतातून प्रवास सुरू करत असाल आणि केदारनाथला तुमचा पहिला थांबा बनवू इच्छित असाल, तर तुमच्या प्रवासाचे आगाऊ नियोजन करणे महत्त्वाचे आहे. केदारनाथ मंदिराचे दरवाजे दरवर्षी थोड्या कालावधीसाठी, साधारणपणे एप्रिलच्या अखेरीस किंवा मे महिन्याच्या सुरुवातीपासून ते ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत उघडले जातात. त्यामुळे, ज्योतिर्लिंग यात्रेचा संपूर्ण प्रवास कार्यक्रम केदारनाथ धामच्या उघडण्याच्या वेळा लक्षात घेऊन आखला पाहिजे.

Advertisement

( नक्की वाचा : VIDEO: 12 वी नंतर शिक्षण लगेच थांबवा; दिग्गज गुंतवणूकदाराचा देशातील तरुणांना खळबळजनक सल्ला, कारणही सांगितलं )

या शहरांमध्ये उत्कृष्ट दळणवळणाची सोय| How To Travel

ज्योतिर्लिंग यात्रेसाठी देशातील अनेक प्रमुख शहरांमधून चांगली रेल्वे आणि रस्ते वाहतूक उपलब्ध आहे. प्रमुख स्थळांमध्ये उत्तर भारतातील दिल्ली, लखनौ आणि डेहराडून, दक्षिण भारतातील चेन्नई, बंगळूर आणि मदुराई, पश्चिम भारतातील मुंबई, अहमदाबाद आणि सुरत, आणि पूर्व भारतातील पाटणा, रांची आणि कोलकाता यांचा समावेश आहे.