जाहिरात

सरकारी नोकरीची मोठी संधी! 2 लाख पगार अन् मुंबईत राहण्याची जागा; 'या' तारखेपूर्वी करा अर्ज, वाचा सर्व माहिती

Mumbai Port Authority Recruitment 2026: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात राहून, दरमहा तब्बल 2 लाख रुपयांपर्यंत पगार मिळवण्याची एक सुवर्णसंधी आहे.

सरकारी नोकरीची मोठी संधी! 2 लाख पगार अन् मुंबईत राहण्याची जागा; 'या' तारखेपूर्वी करा अर्ज, वाचा सर्व माहिती
government jobs in Mumbai : मुंबईत सरकारी नोकरीची ही चांगली संधी आहे.
मुंबई:

Mumbai Port Authority Recruitment 2026: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात राहून, दरमहा तब्बल 2 लाख रुपयांपर्यंत पगार मिळवण्याची एक सुवर्णसंधी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नोकरीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना मुंबईत हक्काची राहण्याची सोय म्हणजेच निवासव्यवस्था देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. एका बड्या सरकारी संस्थेमध्ये उच्च व्यवस्थापकीय पदांवर काम करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही मोठी सुवर्णसंधी असून, यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे.

कुठे आहे नोकरीची संधी?

मुंबई पोर्ट अथॉरिटीने विविध विभागांमधील उच्च पदस्थांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती पूर्णपणे कंत्राटी पद्धतीने केली जाणार असून, यासाठी पात्र भारतीय उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज सादर करण्यासाठी 6 जुलै 2026 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

विविध पदे आणि आकर्षक मानधन

या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 10 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये चीफ मॅनेजर बिझनेस डेव्हलपमेंट, चीफ मॅनेजर एन्व्हायर्नमेंट आणि चीफ मॅनेजर कॉर्पोरेट लीगल या पदांसाठी दरमहा 2 लाख रुपये मानधन दिले जाईल. याशिवाय सिनियर मॅनेजर बिझनेस डेव्हलपमेंट या पदासाठी 1 लाख 60 हजार रुपये महिना पगार असेल. 

तसेच मॅनेजर बिझनेस डेव्हलपमेंट, मॅनेजर एन्व्हायर्नमेंट, मॅनेजर आयसीटी आणि मॅनेजर कॉर्पोरेट लीगल या पदांसाठी दरमहा 1 लाख 20 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

( नक्की वाचा : VIDEO: 12 वी नंतर शिक्षण लगेच थांबवा; दिग्गज गुंतवणूकदाराचा देशातील तरुणांना खळबळजनक सल्ला, कारणही सांगितलं )
 

कंत्राटाचा कालावधी आणि इतर सुविधा

ही नियुक्ती सुरुवातीला 3 वर्षांच्या कालावधीसाठी असेल. त्यानंतर संस्थेच्या गरजेनुसार हा कालावधी आणखी 2 वर्षांनी वाढवला जाऊ शकतो. नियुक्ती पूर्णपणे कंत्राटी स्वरूपाची असल्याने, उमेदवारांना कायमस्वरूपी सेवेचा कोणताही हक्क सांगता येणार नाही. या नोकरीमध्ये कर्मचाऱ्यांना वर्षातून 20 दिवसांची नैमित्तिक सुट्टी आणि पोर्टच्या रुग्णालयात वैद्यकीय सुविधा दिली जाईल. विशेष म्हणजे, उपलब्धतेनुसार 10% मानधन आणि परवाना शुल्क कपात करून मुंबईत राहण्यासाठी निवासव्यवस्था देखील मिळू शकते.

अर्ज करण्याची सोपी पद्धत

इच्छुक उमेदवारांनी मुंबई पोर्ट अथॉरिटीच्या अधिकृत संकेतस्थळावरून म्हणजेच www.mumbaiport.gov.in वरून अर्ज डाऊनलोड करावा. अर्ज पूर्ण भरून, आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या स्व-साक्षांकित प्रतींसह तो मॅनेजर (HR), मुंबई पोर्ट अथॉरिटी, जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई - 400001 या पत्त्यावर स्पीड पोस्टाने पाठवायचा आहे.

( नक्की वाचा : मोठी बातमी! येत्या 5 वर्षांत देशातले प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन गायब होणार? वाचा काय आहे कारण? )
 

अर्ज पाठवताना लिफाफ्यावर कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे, त्याचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज किंवा केवळ रेझ्युमे स्वीकारला जाणार नाही. या भरती प्रक्रियेतील सर्व अपडेट्स केवळ अधिकृत संकेतस्थळावरच प्रसिद्ध केले जातील, त्यामुळे उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट देत राहणे गरजेचे आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com