Fake Milk : तुमच्या घरातील दुधात शॅम्पू तर नाही ना? तुकाराम मुंढेंचा धक्कादायक खुलासा, असे ओळखा बनावट दूध

Fake Milk Racket: दररोज तुमच्या घरात येणारे दूध खरोखरच शुद्ध आहे की त्यात विषारी रसायने मिसळली आहेत?

जाहिरात
Read Time: 3 mins
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांनी दुधातील भेसळीच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश केला आहे.
मुंबई:

Fake Milk Racket: दररोज तुमच्या घरात येणारे दूध खरोखरच शुद्ध आहे की त्यात विषारी रसायने मिसळली आहेत? तुम्ही रोज पिणाऱ्या दुधात डिटर्जंट, कॉस्टिक सोडा किंवा शॅम्पू तर नाही ना, असा भयानक प्रश्न उपस्थित झाला आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त आणि धडक कारवाईसाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी दुधातील भेसळीच्या काळ्या धंद्याचा असा एक धक्कादायक पर्दाफाश केला आहे, ज्याने प्रत्येकाची झोप उडवली आहे.

राज्यात रसायनांचा वापर करून बनावट दूध तयार करणाऱ्या टोळ्या कशा सक्रिय आहेत आणि हे विष तुमच्या घरापर्यंत कसे पोहोचते, याची संपूर्ण माहिती त्यांनी उघड केली आहे.

Advertisement

तुकाराम मुंढेंची धडक कारवाई 

तुकाराम मुंढे यांनी 25 मे रोजी एफडीए आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात भेसळखोरांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. सध्या एफडीएचे पथक दररोज 20 पेक्षा जास्त ठिकाणी धाडी टाकत आहे. 

आतापर्यंत राज्यभरात 1,131 हून अधिक ठिकाणी तपासणी करण्यात आली असून, सुमारे 49.57 कोटी रुपयांचा बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये तब्बल 1.6 लाख लीटर बनावट आणि भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले आहे.

( नक्की वाचा : Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीतून 94 हजार नावे वगळली; तुमचं नाव यादीत आहे का? 'या' पद्धतीनं करा चेक )
 

शॅम्पू आणि कॉस्टिक सोड्यापासून बनतेय 'सिंथेटिक दूध'

छापेमारीदरम्यान अधिकाऱ्यांना केमिकल्सचा वापर करून दूध तयार करणाऱ्या समांतर उत्पादन लाईन्स सापडल्या आहेत. हे कथित 'सिंथेटिक दूध' बनवण्यासाठी स्किम्ड मिल्क पावडर, विषारी रसायने, इमल्सीफायर, कॉस्टिक सोडा आणि चक्क शॅम्पूचा सर्रास वापर केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. एका विशिष्ट फॉर्म्युल्यानुसार हे सगळे घटक एकत्र करून असा द्रव तयार केला जातो, जो हुबेहूब अस्सल दुधासारखाच दिसतो.

नफ्याची हाव आणि भेसळीचे गणित

बनावट दूध तयार करण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यातून मिळणारा अफाट नफा आहे. तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाईच्या दुधासारखे दिसणारे बनावट दूध तयार करण्यासाठी प्रति लीटर केवळ 15 रुपये खर्च येतो. तर म्हशीच्या दुधासारखे दिसणारे भेसळयुक्त दूध अवघ्या 30 रुपये प्रति लीटर दरात तयार होते. हाच बनावट माल बाजारात महागड्या दराने विकून भेसळखोर लोकांच्या जिवाशी खेळत आहेत.

Advertisement

( नक्की वाचा : Dental Care Tips: महागड्या ट्रीटमेंटची गरज नाही! 'या' सोप्या उपायाने तुमचे पिवळे दात होतील पांढरेशुभ्र )
 

भेसळीचा खेळ नक्की चालतो तरी कुठे?

तपासात समोर आलेली सर्वात चिंतेची बाब म्हणजे ही भेसळ एकाच ठिकाणी होत नाही. शेतकरी पातळीपासून ते दूध संकलन केंद्र आणि चिलिंग सेंटरपर्यंत अनेक टप्प्यांवर हा भेसळीचा खेळ चालतो. इथूनच हे विषारी दूध मोठ्या डेअऱ्यांमध्ये पुरवले जाते किंवा त्यापासून इतर दुग्धजन्य पदार्थ तयार केले जातात.

भेसळ रोखण्यासाठी 'सोर्स ट्रॅकिंग' आवश्यक

दूध भेसळीचा हा काळा धंदा पूर्णपणे समूळ नष्ट करायचा असेल तर 'ट्रेसेबिलिटी' म्हणजेच दुधाच्या मूळ स्रोताचा शोध घेणे हाच एकमेव प्रभावी मार्ग असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. बाजारात येणाऱ्या दुधाचा प्रत्येक थेंब नेमका कुठून आला आहे, याचा माग काढणारी यंत्रणा जोपर्यंत भक्कम होत नाही, तोपर्यंत या भेसळखोरीला पूर्णपणे वेसण घालणे कठीण जाईल.

Advertisement

घरीच कशी ओळखाल दुधातील भेसळ?

तज्ज्ञ डॉ. समीर भाटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुधातील भेसळ ओळखण्यासाठी काही सोप्या पद्धती वापरता येतील:

पाण्याची भेसळ तपासणे: दुधाचा एक थेंब हाताच्या तळव्यावर किंवा गुळगुळीत पृष्ठभागावर टाका. जर दूध अतिशय वेगाने वाहून गेले, तर त्यात पाण्याची भेसळ आहे हे ओळखावे. अस्सल दूध हळूहळू वाहते आणि मागे पांढरा डाग सोडते.

स्टार्चची भेसळ तपासणे: एका काचेच्या पेल्यात थोडे दूध घ्या आणि त्यात आयोडीनचे काही थेंब टाका. जर दुधाचा रंग बदलून निळा झाला, तर दुधात स्टार्च किंवा इतर पावडरची भेसळ असल्याचे स्पष्ट होते.
 


Topics mentioned in this article