Tulsi Plant In Winter: तुळशीच्या रोपाचे धार्मिक तसेच आयुर्वेदिक दृष्टीकोनातूनही प्रचंड महत्त्व आहे. पण हिवाळ्यात तुळशीच्या रोपाची देखभाल करणं कठीण होते, कारण हवामान बदलामुळे ते वाळते. तुळशीचे रोप हिरवेगार राहावे, यासाठी वेळोवळेची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्या घरातील तुळशीचे रोप वाळू नये, असे तुम्हाला वाटत असेल तर तीन महत्त्वपूर्ण टिप्स या लेखाद्वारे जाणून घेऊया...
तुळशीच्या रोपाची जागा बदला
हिवाळ्यामध्ये तुळशीचे रोप सुकू नये यासाठी घरामध्ये जेथे सूर्यप्रकाश पोहोचतो, त्याठिकाणी कुंडी ठेवावी. हिवाळा ऋतूमध्ये हवामानातील आर्द्रता आणि ओलावा कमी होतो, याचे परिणाम झाडाझुडूपांवरही होतात. परिणामी रोपं सुकू लागतात. यावर उपाय म्हणून तुळशीचे रोप सूर्यप्रकाशात ठेवा, जेणेकरून रोपास उष्णता मिळेल आणि प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक असलेली ऊर्जा देखील रोपापर्यंत पोहोचेल. ज्यामुळे रोपाची पाने हिरवीगार आणि निरोगी राहतील.
मातीची देखभाल
तुळशीचे रोप जगवण्यासाठी रोपाच्या मुळांना श्वास मिळणे आवश्यक आहे. रोपाची माती कोरडी झाली असेल रोपापर्यंत आवश्यक पोषणतत्त्वांचा पुरवठा होणार नाही. त्यामुळे मातीमध्ये वेळोवेळी खतांचा समावेश करावा तसेच रोपाला पाणी द्यावे.
रोपाची छाटणी करणे
तुळशीचे रोप हिरवेगार राहावे, यासाठी रोपाची वेळोवेळी छाटणी करावी. तुळशीच्या मंजिरी काढाव्या, त्या पुन्हा रुजवाव्या अन्यथा रोपाची सर्व ऊर्जा बीज निर्मितीमध्ये खर्च होईल आणि रोपाची वाढ होणार नाही.
कीटकांपासून रोपाचे संरक्षण करावे
थंड हवा आणि आर्द्रतेमुळे तुळशीच्या पानांवर काळे डाग तसेच लहान कीटक दिसू लागतात. कीटकांपासून रोपाचे संरक्षण करण्यासाठी नैसर्गिक खतांचा वापर करावा.
(नक्की वाचा: Tulsi Plant Benefits: राम की कृष्ण, घरामध्ये कोणत्या तुळशीचे रोप आणावे? कोणते फायदे मिळतील? वाचा नियम)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )