Maxi Scooter: TVS ने भारतात तयार केली सुसाट 'सुपर' स्कूटर! लुक आणि फीचर्स पाहून थक्क व्हाल

ही स्कूटर बाजारात आणून टीव्हीएसने मास्टर स्ट्रोक मारला अशी चर्चा रंगली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

TVS कंपनी भारतीय ऑटोमोबाईल बाजारात सर्वांनाच आश्चर्यचकीत करण्याच्या तयारीत आहे. कंपनी भारतात एक अत्यंत पॉवरफुल 160cc क्षमतेचे मॅक्सी-स्कूटर (Maxi-Scooter) लॉन्च करणार आहे. ही स्कूटर खास तरुणांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. ज्या तरूणांना रोजच्या प्रवासातही रेसिंग बाईकसारखा परफॉर्मन्स त्याच बरोबर स्कूटरसारखा आराम हवा आहे त्याच्यासाठी असेल.  विशेष म्हणजे, ही नवीन स्कूटर कोणत्याही जुन्या मॉडेलचे अपडेटेड व्हर्जन नाही हे टीव्हीएसने स्पष्ट केले आहे. ही स्कुटर पूर्णपणे एका नवीन प्लॅटफॉर्मवर तयार केली जात आहे. कंपनी याला अत्यंत परफॉर्मन्स-ओरिएंटेड बनवत आहे. याचा पिकअप आणि टॉप स्पीड सामान्य स्कूटरपेक्षा खूप जास्त असेल. TVS च्या पोर्टफोलिओमध्ये याला लोकप्रिय NTorq च्या वरचे स्थान दिली जाईल.

​या नवीन मॅक्सी-स्कूटरची सर्वात मोठी ताकद काय असेल? तर ते त्याचे इंजिन असणार आहे. यामध्ये 160cc चे पूर्णपणे नवीन लिक्विड-कूल्ड (Liquid-Cooled) इंजिन दिले जाणार आहे. लिक्विड-कूलिंग तंत्रज्ञानामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासात किंवा भारी ट्रॅफिकमध्येही इंजिन जास्त गरम होणार नाही हे त्याचे वैशिष्ट्य आहे.  शिवाय स्कुटर सातत्याने उत्तम परफॉर्मन्स देत राहील असा कंपनीचा दावा आहे.  ही स्कूटर हायवेवरही बाईकसारखी वेगाने धावेल असं कंपनीनं सांगितलं आहे.

Advertisement

नक्की वाचा - Electric Vehicle: खूशखबर! EV मार्केटमध्ये होणार मोठा धमाका; ह्युंदाई कंपनी आणणार परवडणारी इलेक्ट्रिक गाडी

​ही एक प्रीमियम आणि महागड्या सेगमेंटमधील स्कूटर आहे. TVS फीचर्सच्या बाबतीत कोणतीही कसर सोडणार नाही असं ही सांगितलं गेलं आहे. आरामदायी राइडिंगसाठी याच्या फ्रंटला टेलिस्कोपिक फोर्क्स मिळतील. जे खडबडीत रस्त्यांवरील झटके सहज सहन करू शकतील. त्यामुळे स्कुटरवर बसल्यावर धक्के बसणार नाहीत. तसेच, हाय-स्पीडमध्ये उत्तम नियंत्रणासाठी दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक दिले जातील. याशिवाय यात स्मार्ट कनेक्टिव्हिटी आणि ब्लूटूथसारखे अनेक आधुनिक फीचर्स पाहायला मिळतील असं कंपनीने सांगितलं आहे. 

नक्की वाचा - New Car: BYD मार्केट जाम करणार! एका चार्जमध्ये मुंबई-पुणे  3 वेळा जा, सारखं पेट्रोल भरायची कटकट संपणार   

​ही स्कूटर बाजारात आणून टीव्हीएसने मास्टर स्ट्रोक मारला आहे. या माध्यमातून TVS चे थेट लक्ष देशातील तरुण रायडर्सवर आहे. ज्या तरूणांना स्टायलिश लुक आणि दमदार पॉवरची क्रेझ असते त्यांच्यासाठी ही स्कूटर आहे. याचे मस्कुलर बॉडी वर्क, मोठी विंडस्क्रीन आणि स्पोर्टी डिझाइन यामुळे याला रस्त्यावर एक आकर्षक लुक मिळेल असं कंपनीने सांगितलं आहे. लांबच्या प्रवासातही रायडरला थकवा जाणवणार नाही अशा पद्धतीने हे डिझाइन केले आहे. भारतीय बाजारात आल्यानंतर या 160cc मॅक्सी-स्कूटरची थेट स्पर्धा Yamaha Aerox 155 आणि आगामी Hero Xoom 160 शी होईल.