जाहिरात

New Car: BYD मार्केट जाम करणार! एका चार्जमध्ये मुंबई-पुणे  3 वेळा जा, सारखं पेट्रोल भरायची कटकट संपणार   

BYD New Cars: चीनमधील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी 'BYD' आगामी 9 जून 2026 रोजी भारतीय बाजारपेठेत आपली पहिली प्लग-इन हायब्रिड कार सादर करणार आहे.

New Car: BYD मार्केट जाम करणार! एका चार्जमध्ये मुंबई-पुणे  3 वेळा जा, सारखं पेट्रोल भरायची कटकट संपणार   

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ असतानाच, अब हायब्रिड गाड्यांच्या बाजारपेठेत एक मोठी क्रांती होणार आहे. चीनची दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी 'BYD' 9 जून 2026 रोजी भारतात आपली पहिली प्लग-इन हायब्रिड SUV (PHEV) अधिकृतपणे सादर करण्यासाठी सज्ज झाली आहे. आतापर्यंत भारतीय बाजारपेठेत फक्त 'प्युअर इलेक्ट्रिक' (Pure EV) कार विकणाऱ्या BYD चा हा हायब्रिड सेगमेंटमधील पहिलाच प्रवेश असेल.

BYD ने आपल्या सोशल मीडिया हँडल्सवरून भारतात आपली प्रगत 'DM-i सुपर प्लग-इन हायब्रिड EV' (DM-i Super Plug-in Hybrid EV) तंत्रज्ञान आणण्याचे संकेत दिले आहेत. या तंत्रज्ञानामध्ये पेट्रोल इंजिन, शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटर आणि दमदार बॅटरी पैक एकत्र काम करतात, ज्यामुळे गाड़ीला उत्तम मायलेज आणि अद्भूत ड्रायव्हिंग रेंज मिळते.

9 जूनच्या मेगा इव्हेंटमध्ये कंपनी 'BYD Atto 2 DM-i' आणि 'BYD Sealion 6 DM-i' हे दोन बहुप्रतिक्षित मॉडेल्स जगासमोर आणण्याची शक्यता आहे. या दोन्ही एसयूव्ही भारताच्या रस्त्यांवर टेस्टिंगदरम्यान अनेकदा स्पॉट झाल्या आहेत.

BYD Atto 2 DM-i: हुंडई क्रेटाशी थेट स्पर्धा!

BYD Atto 2 DM-i ही मिड-साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये लॉंच केली जाईल, जिथे तिची थेट स्पर्धा हुंडई क्रेटा (Hyundai Creta) आणि किया सेल्टोस (Kia Seltos) सारख्या लोकप्रिय गाड्यांशी असेल.

(नक्की वाचा-  मारुती सुझुकीचं ऐतिहासिक पाऊस, देशातील पहिली 'WagonR Flex Fuel' कार लाँच; शेतकऱ्यांना होणार फायदा)

स्पेसिफिकेशन्स आणि रेंज

यामध्ये 1.5-लीटरचे पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. ग्राहकांसाठी 7.8 kWh किंवा 18 kWh चे बॅटरी पॅक पर्याय उपलब्ध असू शकतात.  कंपनीचा दावा आहे की, हे बॅटरी पॅक्स अनुक्रमे 928 किलोमीटर आणि 998 किलोमीटर इतकी अफाट कंबाइंड रेंज देण्यास सक्षम आहेत.  सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही पेट्रोलचा एक थेंबही खर्च न करता ही गाडी केवळ इलेक्ट्रिक मोडवर 40 ते 90 किलोमीटर पर्यंत चालवू शकता.

फॉर्च्यूनरला देणार टक्कर!

दुसरीकडे, 'BYD Sealion 6 DM-i' ही एक मोठ्या आकाराची प्रीमियम आणि लक्झरियस एसयूव्ही आहे, जी आकाराच्या बाबतीत थेट टोयोटा फॉर्च्यूनर सारखी भव्य दिसते. या गाडीतही 1.5-लीटरचे पेट्रोल इंजिन आहे, जे नॉर्मल आणि टर्बोचार्ज्ड अशा दोन्ही पर्यायांसह येईल. याचा टर्बो व्हेरियंट तब्बल 344 bhp ची प्रचंड ताकद निर्माण करतो आणि हा ऑल-व्हील ड्राईव्ह (AWD) सिस्टमसह सुसज्ज आहे.

(नक्की वाचा-  Hero MotoCorp New Bike: हिरो मोटोकॉर्पचा मोठा धमाका! पेट्रोल किंवा चार्जिंगशिवाय धावणार बाईक)

यात 18.3 kWh आणि 26.6 kWh चे मोठे बॅटरी पॅक वापरण्यात आले आहेत. रेंजच्या बाबतीत ही गाडी आणखी पुढे असून, ती एकूण 1,092 किलोमीटरची कंबाइंड रेंज आणि 140 किलोमीटरची प्युअर इलेक्ट्रिक रेंज ऑफर करते. प्रदूषणमुक्त प्रवासासोबतच लांबच्या प्रवासासाठी वारंवार पेट्रोल भरण्याच्या कटकटीपासून मुक्ती देणारे हे तंत्रज्ञान भारतीय ग्राहकांसाठी गेमचेंजर ठरू शकते. आता सर्वांचे लक्ष 9 जून रोजी होणाऱ्या या अधिकृत लॉंचिंग सोहळ्याकडे आणि या गाड्यांच्या किमतींकडे लागले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com