Lord Ram Unique Names: स्वभाव, गुणांप्रमाणे मनुष्यप्राणी त्याच्या नावावरूनही ओळखला जातो. म्हणूनच आपल्या बाळाचे विचारपूर्वक बारसे केले पाहिजे. 'यथा नाम तथा गुण' म्हणजेच जसे नाव तसे गुण. म्हणूनच पूर्वीच्या काळामध्ये लोक आपल्या मुलांची नावे देवीदेवतांच्या नावावरून ठेवत असत. पण बदलत्या काळानुसार पालकांकडून मॉडर्न नावांना पसंती दिली जाऊ लागली. देवीदेवतांच्या नावांची जागा मॉडर्न नावांनी घेतली.
दरम्यान नावांमुळे देखील आपल्या जीवनावर परिणाम पाहायला मिळतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या लेखाद्वारे आपण प्रभू श्रीरामांची नावे जाणून घेणार आहोत, जी अर्थपूर्ण आणि अद्वितीय अशी आहेत.
आजही काही पालक प्रभू श्रीरामाच्या नावावरून आपल्या मुलांच्या नावाची निवड करतात. तुम्हाला देखील भगवान रामाच्या नावावरून मुलाचे नाव ठेवायचे असेल तर ही यादी नक्की पाहा...
(रामनवमीनिमित्त हवाई प्रवास महागला, अयोध्येसाठीच्या तिकीटदरात दुपटीने वाढ)
अविराज :
हे देखील भगवान रामाचे नाव आहे. अविराज म्हणजे सूर्याप्रमाणे तेजस्वी. म्हणूनच आईवडील आपल्या मुलाचे नाव अविराज ठेवू शकतात.
मानविक :
बुद्धिमान, स्वभावाने दयाळू आणि देवावर विश्वास ठेवणारा असे गुण जर तुम्हाला तुमच्या मुलामध्ये हवे असतील तर तुम्ही मानविक या नावाची निवड करू शकता.
(रामनवमीनिमित्त साताऱ्याचे कंदी पेढे प्रभू श्रीराम चरणी; 1000 बॉक्स अयोध्येला पाठवणार)
विराज :
विराज हे देखील प्रभू रामाचेच एक नाव आहे. राजाराम सूर्यवंशी होते, म्हणून त्यांना सूर्याचा राजा असेही म्हटले जाते आणि हाच 'विराज' या शब्दाचा अर्थ आहे. विश्वामध्ये सर्वात महान म्हणजेच सूर्याचा राजा. हे नाव देखील अनोखे आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या मुलासाठी या नावाची निवड करू शकता.
शाश्वत :
त्रेतायुगात जन्मलेले प्रभू श्रीराम सनातनी होते. ते सनातन धर्म मानणारे होते आणि सनातन धर्माचे दुसरे नावच शाश्वत असे आहे. याच नावावरून प्रभू श्रीराम यांचे नाव शाश्वत ठेवण्यात आले.
अद्वैत :
आपल्या मुलाप्रमाणे कोणीही नसावे, आपले बाळ स्वभावाने चांगले तसेच सर्वांपेक्षा वेगळे असावे; असे तुम्हाला वाटत असेल तर मुलासाठी भगवान रामाच्या 'अद्वैत' या नावाची देखील आपण निवड करू शकता.
अथर्व :
या नावावरूनच स्पष्ट होते की अथर्व हे चार वेदांपैकी एक आहे आणि हे देखील प्रभू रामाचेच नाव आहे. 'वेदांचा जाणता' असा अथर्व या शब्दाचा अर्थ होय.
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.