WhatsApp Numbers: बँकांची कामे, कागदपत्रे मिळवा मोबाईलवर; हे व्हॉट्सॲप नंबर आताच सेव्ह करा

भारत सरकारचे 'डिजीलॉकर', 'आयआरसीटीसी' तसेच एसबीआय, एचडीएफसीने अधिकृत व्हॉट्सॲप नंबर्स (AI बॉट्स) जारी केले आहेत. ज्यामुळे व्हॉट्सअॅप बँकिंग, रेल्वे, सरकारी कागदपत्रे आणि मेट्रो तिकिटांसाठी एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

आजच्या गतिमान डिजिटल युगात सोशल मीडियावरील व्हॉट्सॲप हे संवाद साधण्याचे सर्वात सोपे आणि सुलभ माध्यम बनले आहे. मात्र, बदलत्या तंत्रज्ञानासोबतच आता सरकारी विभाग आणि मोठ्या खाजगी संस्थांनी ग्राहकांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी आपले अधिकृत व्हॉट्सॲप नंबर्स सुरू केले आहेत. अनेक नागरिकांना या सुविधांची माहिती नसल्याने ते तासनतास रांगेत उभे राहतात किंवा विविध ॲप्स डाऊनलोड करत बसतात. रेल्वेचे तिकीट असो, पॅन कार्ड डाऊनलोड करणे असो किंवा बँकेचे मिनी स्टेटमेंट काढणे, हे सर्व कामे आता केवळ एका 'Hi' मेसेजवर व्हॉट्सॲपवर शक्य आहेत. 

डिजीलॉकर (DigiLocker) - कागदपत्रे डाऊनलोड करण्यासाठी

भारत सरकारच्या MyGov हेल्पडेस्कने नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त सुविधा सुरू केली आहे. तुम्ही शासकीय कागदपत्रे थेट पीडीएफ (PDF) स्वरूपात व्हॉट्सॲपवर मिळवू शकता. यासाठी अधिकृत नंबर 9013151515 हा आहे.  या नंबरवर 'Hi' लिहून पाठवा. त्यानंतर तुम्ही तुमचे पॅन कार्ड (PAN Card), ड्रायव्हिंग लायसन्स, 10 वी आणि 12 वीची गुणपत्रिका तसेच वाहनाची आरसी बुक थेट व्हॉट्सॲपवर डाऊनलोड करू शकता.

Advertisement

रेल्वे आणि ट्रॅव्हल सर्व्हिसेस 

ट्रेनने प्रवास करताना प्रवाशांना त्यांच्या सीटवरच आवडीचे जेवण मिळावे, यासाठी भारतीय रेल्वे आणि जिओमार्टने भागीदारीत अधिकृत व्हॉट्सॲप नंबर्स सुरू केले आहेत.

IRCTC फूड बुकिंग 70420 62070 या नंबरवर प्रवाशांनी प्रवासादरम्यान 'Hi' लिहून आपला पीएनआर (PNR) नंबर पाठवल्यास, जेवण थेट त्यांच्या बर्थवर डिलिव्हर केले जाते. जिओमार्ट ग्रोसरी डिलिव्हरीसाठी 88811 99119 हा नंबर प्रवासात किराणा किंवा खाण्यापिण्याचे इतर सामान थेट सीटवर मागवण्यासाठी उपयुक्त आहे.

बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस

विविध बँकांनी ग्राहकांसाठी घरबसल्या बँक बॅलन्स आणि मिनी स्टेटमेंट तपासण्यासाठी व्हॉट्सॲप बँकिंग सुरू केले आहे. 

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI): 90226 90226 या नंबरवर 'Hi' पाठवून बँक बॅलन्स, मिनी स्टेटमेंट (शेवटचे 5 व्यवहार) आणि पेन्शन स्लिप मिळू शकते.
  • HDFC बँक: 70700 22222 या नंबरवरून अकाउंट बॅलन्स, क्रेडिट कार्ड समरी, लोन एलिजिबिलिटी आणि जवळचे एटीएम शोधण्यासाठी उपयुक्त आहे.
  • ICICI बँक: 86400 86400 या नंबरवरून बँक बॅलन्स तपासणे, कार्ड ब्लॉक/अनब्लॉक करणे आणि फिक्स डिपॉझिट तपशील मिळवण्यासाठी.

एलपीजी गॅस सिलेंडर बुकिंग 

  • इंडेन गॅस (Indane): 75888 88824
  • एचपी गॅस (HP Gas): 92222 01122
  • भारत गॅस (Bharat Gas): 18002 24344

Topics mentioned in this article