बापरे हे कसं शक्य आहे? वणव्यासारखा पसरतोय व्हिडीओ; इंटरनेटवर पसरलाय जाळ

Weight Loss Journey: 4 मिसकॅरेज, 5 व्या प्रयत्नात झालेला भयंकर त्रास. प्रसुतीनंतर वाढलेलं वजन आणि त्यामुळे ऐकावे लागणारे टोमणे यामुळे सुषमा मनोमन खचल्या होत्या. या परिस्थितीतून त्या बाहेर आल्या मात्र 2019 साली झालेल्या दुर्घटनेमुळे त्या नैराश्येच्या गर्तेत सापडल्या.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

Weight Loss Transformation: प्रेग्नंसीदरम्यान बहुसंख्य महिलांचे वजन वाढतं. मूल झाल्यानंत अनेक महिला आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही आणि मग त्यांचे वजन वाढत जातं. अशा महिलांना अनेकदा टोमणे ऐकावे लागतात.  टायर झालीयस, आता रिटायर हो, आता पेन्शन घेऊन शांत बस असे टोमणे अनेक महिलांना ऐकावे लागतात. वजन वाढल्याने असे टोमणे ऐकून घेणं हे फार लाजिरवाणं आणि अपमानास्पद असतं. या टोमण्यांमुळे अनेक महिला मानसिकरित्या खचतात, आणि उरलेलं आयुष्य मन मारून जगतात. मात्र एका महिलेला हे सहन झालं नाही. तिने मनोमन ठरवलं की ही परिस्थिती आपण बदलायला हवी. त्यासाठी तिने अपार कष्ट घेण्याची तयारीही केली होती. या महिलेची चार मिसकॅरेज झाली होती. बाळ गेल्याचं दुख हे कोणत्याही आईसाठी फार वाईट असतं, या महिलेने तर तिची चार बाळे गमावली होती. मात्र तरीही ती खचली नाही. या महिलेचं वजन 93 किलोपर्यंत पोहोचलं होतं. यानंतर तिने जे केलं ते अकल्पनीय होतं.  

नक्की वाचा: रोज कोमट पाण्यात 1 चमचा तूप मिक्स करून प्यायल्यास काय होतं? न्युट्रिशनिस्टने सांगितले 5 फायदे

पराकोटीचे प्रयत्नानंतर चाखायला मिळाली यशाची चव  (Weight Loss Journey)

डॉ. सुषमा पचौरी या असिस्टंट प्रोफेसर होत्या. चार वेळा मिसकॅरेजच्या वेदना झेलणाऱ्या सुषमा यांना पाचव्या प्रेग्नंसीमध्ये 6 महिने सातत्याने रक्तस्त्राव होत होता. डॉक्टरांनीही हात वर केले की यावेळी बाळ आणि आई दोघांच्या जीवाला धोका आहे. मात्र सुषमा जिद्दीला पेटल्या होत्या. 

Advertisement

2007 साली सुषमा यांना मुलगा झाला. या काळात सतत घ्याव्या लागत असलेल्या हार्मोनल इंजेक्शनमुळे त्यांचं वजन 93 किलो पर्यंत गेलं होतं.

Advertisement

एके दिवशी सुषमा यांच्या भावाने त्यांना गंमतीत म्हटलं की, तू वयाने माझ्यापेक्षा छोटी आहेस पण दिसतेस माझ्यापेक्षा मोठी. भावाने गंमतीत म्हटलेलं हे वाक्य सुषमा यांच्या जिव्हारी लागलं होतं. हाच त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला.  

Advertisement

93 किलोपासून 59 किलोपर्यंतचा खडतर प्रवास (weight loss inspiration)

सुरुवातीला सुषमा यांनी जिममधील ट्रेममिलवर धावण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी कोणतेही डाएट, वेट ट्रेनिंग सुरू केलं नव्हतं. काही दिवसांनी सुषमा यांनी एक फिटनेस कोच नियुक्त केला. या फिटनेस कोचने त्यांना फिट होण्याचा मार्ग दाखवला.  सुषमा यांनी आपल्या आहारात तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार बदल केले. त्यांनी खालील डाएट काटेकोटरपणे पाळले. 

  • घरचे जेवण
  • नाश्त्यामध्ये फक्त चहा आणि ठेपले 
  • जेवणात फक्त डाळ भात, दही आणि सॅलडचा समावेश 
  • स्नॅक फक्त मखाणा
  • सोया, पनीरच्या सेवनाने त्यांनी प्रोटीनची कमतरता भरून काढली.  
  • काटेकोटर डाएट नियमित व्यायाम यामुळे सुषमा यांचे वजन 93 किलो वरून 59 किलो झालं. 

वाईट घटनेने सगळ्या प्रयत्नांवर पडले पाणी, जिद्दीने केले कमबॅक (fat to fit transformation journey)

2019 साली झालेल्या एका दुर्घटनेने सुषमा या नैराश्याच्या गर्तेत गेल्या होत्या. या काळात आरोग्याकडे त्यांचं साफ दुर्लक्ष झालं होतं. दिवसाला 15 कप चहा त्या पिऊ लागल्या होत्या. या काळात त्यांचे वजन 10 किलोने वाढले होते. मात्र कालांतराने त्या सावरल्या. त्यांनी पुन्हा एकदा डाएट पाळायला सुरूवात केली आणि जिममध्ये घाम गाळणं सुरू केलं. त्यांनी केलेली कठोर मेहनत स्पष्टपणे दिसू लागली असून सुषमा या भारतातील बहुसंख्य महिलांसाठी आज एक आदर्श बनल्या आहेत.