Vasant Panchami 2026: वसंत पंचमी कधी आहे, 23 की 24 जानेवारी? जाणून घ्या तारीख आणि सरस्वती पूजनाचा शुभ मुहूर्त

Vasant Panchami 2026 Date: माघ महिन्याच्या पंचमी तिथीला वसंत पंचमी सण साजरा केला जातो. ही पवित्र तिथी वसंत ऋतूच्या आगमनाचे तसेच विद्येची देवी माता सरस्वतीच्या पूजनाचे प्रतीक मानली जाते. यंदा वसंत पंचमी कधी आहे आणि कोणत्या शुभ मुहूर्तावर सरस्वतीचे पूजन करावे?

जाहिरात
Read Time: 3 mins
"Vasant Panchami 2026 Date: सरस्वती पूजनाची योग्य तारीख, विधी आणि शुभ मुहूर्त"
Canva
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • वसंत पंचमी 2026 23 जानेवारी शुक्रवार रोजी साजरी केली जाईल
  • वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीची पूजा केली जाते.
  • वसंत पंचमी वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Vasant Panchami 2026 Date And Shubh Muhurat: सनातन परंपरेमध्ये माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला विशेष महत्त्व आहे, कारण या तिथीला बुद्धी, ज्ञान, विवेक आणि विद्येची देवी माता सरस्वती प्रकट झाल्या होत्या, असे मानले जाते. सरस्वती मातेच्या आशीर्वादाने व्यक्ती धर्म-अध्यात्म, गीत-संगीत तसेच विविध कलांमध्ये यश प्राप्त करून उच्च पद प्राप्त करतो, असे मानले जाते. या तिथीचे महत्त्व श्रीमद्भगवद्गीतेतील भगवान श्रीकृष्णांच्या वचनातूनही स्पष्ट होते, जेथे त्यांनी म्हटलंय की, "ऋतूंमध्ये मी वसंत आहे". हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे. वसंत पंचमीची अचूक तारीख, पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आणि माता सरस्वतीची पूजन विधी सविस्तर जाणून घेऊया.

वसंत पंचमीचा शुभ मुहूर्त | Vasant Panchami 2026 Shubh Muhurat And Tithi 

पंचांगानुसार विद्येची देवी माता सरस्वती यांच्या पूजेचा महापर्व 23 जानेवारी 2026 (शुक्रवार) रोजी साजरा केला जाईल. पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 23 जानेवारी 2026 रोजी उत्तररात्री 02:28 (AM) वाजता सुरू होऊन 24 जानेवारी 2026 रोजी उत्तररात्री 01:46 (AM) वाजता समाप्त होईल. उदया तिथीनुसार वसंत पंचमी 23 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी माता सरस्वतीच्या पूजेसाठी सर्वोत्तम मुहूर्त सकाळी 07:15 वाजेपासून ते दुपारी 12:50 वाजेपर्यंत असेल. भाविकांना एकूण 5 तास 36 मिनिटे पूजेसाठी मिळणार आहेत.

वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीची पूजा कशी करावी? | Vasant Panchami 2026 Goddess Saraswati Puja

  • हिंदू मान्यतेनुसार वसंत पंचमीच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून स्नान-ध्यान करावे.
  • त्यानंतर हंसवाहिनी माता सरस्वतीची विधीवत पूजा, जप-तप आणि व्रत करण्याचा संकल्प करावा. 
  • या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे 
  • पूजेमध्ये पिवळ्या रंगाची फुले, पिवळ्या रंगाची मिठाई, हळद, पिवळे वस्त्र इत्यादी अर्पण करावे. पूजेच्या सुरुवातीला मूर्ती पाण्याने स्वच्छ करून घ्यावी.  
  • यानंतर देवीच्या मूर्तीसमोर कलश, गणपती देवता आणि नवग्रहांची स्थापना करावी.  
  • सरस्वती मातेला फुले-फळं, चंदन, केशर, पुस्तक, पेन आणि खीर इत्यादी गोष्टी अर्पण कराव्या. 
  • शक्य असल्यास सरस्वती मातेच्या पूजेमध्ये कमळाचे फुले अवश्य अर्पण करावे
  • यानंतर माता सरस्वती वंदना आणि त्यांच्या मंत्रांचा जप करावा. 
  • व्रत करणार असाल तर या दिवशी चुकूनही अन्न ग्रहण करू नये, केवळ फलाहार करावा. 
वसंत पंचमीचे धार्मिक महत्त्व | Vasant Panchami 2026 Significance 

सनातन परंपरेत वसंत पंचमीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. काही लोक हा दिवस ज्ञानाचा उत्सव म्हणून साजरा करतात, तर काही जण विद्येच्या देवीचा प्रकट दिन मानतात. वसंत पंचमी हा शुभ कार्यांच्या प्रारंभासाठी अत्यंत उत्तम मानला जातो. या शुभतेमुळे अनेक लोक आपल्या मुलांच्या शिक्षणाची सुरुवात याच दिवशी करतात.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)