Gifts to Avoid: सण-उत्सव असोत किंवा कोणतेही खास प्रसंग, आपल्या प्रियजनांना गिफ्ट्स देण्याची परंपरा आपल्याकडे आहे. गिफ्ट्स केवळ शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी नाही तर मंगलभावनेचे प्रतीक आहे. मात्र, हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू अशा आहेत, ज्या चुकूनही कोणाला भेट देऊ नयेत, अन्यथा त्याचा थेट नकारात्मक परिणाम देणाऱ्या व्यक्तीवर आणि नात्यावर होऊ शकतो.
कोणते गिफ्ट देणे टाळावे?
घड्याळ
वास्तुशास्त्रानुसार, कोणालाही घड्याळ भेट देणे अशुभ मानले जाते. यामागील मान्यता अशी आहे की, घड्याळ भेट दिल्याने तुम्ही तुमचे चांगले दिवस किंवा शुभ काळ प्रतीकात्मक रूपात दुसऱ्या व्यक्तीला देत असता. यामुळे तुमच्या प्रगतीवर आणि वेळेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.
धारदार वस्तू
चाकू, कात्री, सुई किंवा कोणतीही धारदार वस्तू भेटवस्तू म्हणून देणे टाळावे. वास्तुशास्त्रानुसार, अशा वस्तू भेट दिल्यास संबंधित व्यक्तीसोबतचे तुमचे नातेसंबंध खराब होण्याचा धोका असतो.
मनी प्लांट
वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांटचे रोप भेट देऊ नये. ही एक प्रचलित मान्यता आहे की, असे केल्याने तुम्ही तुमचे भाग्य आणि आर्थिक संपन्नता प्रतीकात्मक रूपात दुसऱ्या व्यक्तीला देत असता.
काळ्या रंगाच्या वस्तू
वास्तुशास्त्रानुसार काळा रंग नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो आणि अशुभ मानला जातो. त्यामुळे काळ्या रंगाचे कपडे, काळे बूट, काळी छत्री अशा वस्तू भेटवस्तू म्हणून देण्याचे टाळावे.
धार्मिक फोटो आणि मूर्ती
देवाची मूर्ती, चित्र किंवा शिवलिंग कोणालाही भेट म्हणून देऊ नये. यामागील कारण असे आहे की, जर दुसऱ्या व्यक्तीने तुमच्या दिलेल्या पवित्र मूर्तीची किंवा शिवलिंगाची विधी-विधानाने पूजा आणि योग्य काळजी घेतली नाही, तर त्याचा दोष तुम्हालाही लागू शकतो.
चामड्याच्या आणि हाडांच्या वस्तू
हिंदू मान्यतेनुसार, चामड्याचे किंवा कोणत्याही प्राण्याच्या हाडांपासून बनवलेले सामान भेट म्हणून देऊ नये, कारण अशा वस्तू शुभ मानल्या जात नाहीत.
परफ्यूम
हिंदू मान्यतेनुसार, कोणालाही परफ्यूम भेट देणे टाळावे. कारण यामुळे भविष्यकाळात संबंधित व्यक्तीसोबतचे तुमचे संबंध बिघडण्याची शक्यता असते.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य मान्यता आणि वास्तुशास्त्रावर आधारित आहे. NDTV मराठी याची पुष्टी करत नाही.)