Tulsi Plant Rules: घरामध्ये तुळशीचे रोप असेल तर या गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होईल मोठे नुकसान

तुळशीचे रोप कधीही अंधार असणाऱ्या जागी ठेवू नका. सूर्यास्तानंतरही तुळशीच्या रोपाजवळ प्रकाश असावा, यासाठी नेहमी रोपासमोर दिवा लावावा. 

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Tulsi Puja Tips In Marathi: पहाटे-पहाटे स्नान केल्यानंतर तुम्ही आई किंवा आजीला सर्वप्रथम अंगणातील अथवा घरातील तुळशीच्या रोपाची (Tulsi plant) पूजा करताना पाहिले असेलच. कारण आंघोळीनंतर तुळशीच्या रोपाची पूजा करणे शुभ मानले जाते. तसेच तुळशीच्या रोपामध्ये देवी लक्ष्मी मातेचा (Goddess Lakshmi) निवास असतो, असे म्हणतात. त्यामुळेच ज्या घरामध्ये तुळशीच्या रोपाची नियमित पूजा केली जाते, त्या घरावर देवी लक्ष्मी (Goddess Lakshmi) आणि भगवान विष्णू (Lord Vishnu) यांचा आशीर्वाद कायम राहतो, असेही म्हणतात. 

तुम्ही देखील घरामध्ये तुळशीचे रोप लावले असेत तर काही नियम कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे. या गोष्टींचे पालन केले नाही तर तुम्हाला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. नेमके काय आहेत हे नियम? जाणून घेऊया सविस्तर… 

घरामध्ये तुळशीचे रोप असल्यास या नियमांचे करा पालन, अन्यथा…

- तुळशीचे रोप कधीही अंधार असणाऱ्या जागी ठेवू नका. सूर्यास्तानंतरही तुळशीच्या रोपाजवळ प्रकाश असावा, यासाठी नेहमी रोपासमोर दिवा लावावा. 
- तुळशीचे रोप मोकळ्या जागेत ठेवावे, ज्यामुळे रोपास नियमित स्वरुपात थेट सूर्यप्रकाश मिळेल. पण कडक उन्हामध्ये रोप ठेवण्याची चूक करू नका. 
- तुळशीची रोपे सुकले असेल तर ते मुळीच घरात (Vastu Tips In Marathi) ठेवू नये. तुळशीच्या वाळलेल्या रोपामुळे घरामध्ये गरिबी येते, असे म्हणतात. 
- तुळशीचे रोप योग्य दिशेला ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. घराच्या दक्षिण किंवा आग्नेय दिशेला रोप ठेवणे टाळा, कारण ही दिशा अग्नीदेवतेची दिशा मानली जाते. तुळशीचे रोप उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवावे.
- तुळशीच्या रोपाची कोरडी पाने किंवा फांद्या कधीही फेकून देऊ नये. ही पाने व फांद्या पाण्याने धुवा आणि त्यानंतर रोपाच्या मातीमध्ये त्याचा खत म्हणून वापर करावा.  
- तुळशीचे रोप वृंदावन किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावावे. थेट जमिनीमध्ये तुळशीच्या रोपाची लागवड करणे टाळा.  
- तुळशीच्या रोपाच्या आजूबाजूचा परिसर कायम स्वच्छ असेल याची काळजी घ्यावी. तुळशीच्या रोपाजवळ काटेरी झाड किंवा रोप लावणे टाळा. 
 

Topics mentioned in this article