Vat Purnima 2024: आज वटपौर्णिमा? जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त आणि वैशिष्ट्य

Vat Purnima 2024 Date : यंदा कधी आहे वट पौर्णिमा? जाणून घ्या तारीख आणि पूजेसाठीचा शुभ मुहूर्त

Advertisement
Read Time: 2 mins

Vat Purnima 2024 Date : दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमेचे व्रत केले जाते. पतीला दीर्घायुष्य लाभावे आणि वैवाहिक जीवन सुखी व्हावे; यासाठी महिलावर्ग वटपौर्णिमेचा उपवास करतात. पण यंदा वटपौर्णिमा 21 जून की 22 जूनला आहे? यावरून गोंधळ निर्माण झाला आहे. कारण वटपौर्णिमा व्रतासाठी आवश्यक असलेली ज्येष्ठ पौर्णिमेची तिथी 21 जून रोजी सकाळी सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी 22 जूनच्या सकाळी तिथी समाप्त होईल. पौर्णिमेच्या शुभ मुहूर्ताची माहिती सविस्तर जाणून घेऊया... 


वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त (Vat Purnima 2024 Date)

वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त 21 जून 2024 रोजी सकाळी 6 वाजून 01 मिनिटांनी सुरू होणार असून 22 जून 2024 रोजी सकाळी 6 वाजून 37 मिनिटाला तिथी समाप्त होईल. .

या पौर्णिमेला पहाटे स्नान करणे आणि दान करण्यास अधिक महत्त्व आहे. ज्येष्ठ महिन्यातील पूजेची वेळ सकाळी 07.31 वाजेपासून ते सकाळी 10.38 वाजेपर्यंत असणार आहे. 


वटपौर्णिमेचे वैशिष्ट्य

  • सामान्यतः जून महिन्यामध्ये ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा येते, यास वटपौर्णिमा असेही म्हणतात. 
  • या दिवशी लक्ष्मी नारायणच्या पूजेसह विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याची पूजाही करतात.  
  • वटपौर्णिमेचे व्रत सौभाग्य, सुख, संपत्ती आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी केले जातात.

नक्की वाचा :

Vastu Tips: महालक्ष्मीचा आशीर्वाद हवाय? हे उपाय ठरतील फलदायी

हनुमान चालीसाचे पठण करताना अजिबात करू नका या चुका, जाणून घ्या नियम

प्रभू श्रीरामाच्या नावावरून तुमच्या मुलाचे ठेवा सुंदर आणि अर्थपूर्ण नाव