जाहिरात

Vat Purnima 2026: वटपौर्णिमा तिथी, शुभ मुहूर्त, पूजा साहित्य, महत्त्व; वाचा ज्योतिषी कुलकर्णींनी दिलेली माहिती

Vat Purnima 2026 Date and Time: यंदा वटपौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या ज्योतिषी श्रीकेतन कुलकर्णी यांनी सांगितलेला पूजेचा उत्तम शुभ मुहूर्त, आवश्यक साहित्य आणि या व्रताचे धार्मिक महत्त्व सविस्तर.

Vat Purnima 2026: वटपौर्णिमा तिथी, शुभ मुहूर्त, पूजा साहित्य, महत्त्व; वाचा ज्योतिषी कुलकर्णींनी दिलेली माहिती
"Vat Purnima 2026 Date and Time: वटपौर्णिमा पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या"
Gemini AI प्रतिकात्मक फोटो

Vat Purnima 2026 Date And Time: हिंदू संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेच्या व्रताचे महत्त्वाचे स्थान आहे. वटपौर्णिमेचे व्रत ज्येष्ठ पौर्णिमा तिथीला केले जातात. परंपरेनुसार पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्म त्याच्या प्राप्तीसाठी महिला हे व्रत करतात. श्रीकेतन कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त, पूजेचे साहित्य आणि पूजेचे महत्त्व जाणून घेऊया सविस्तर...  

ज्येष्ठ पौर्णिमेची तिथी | Vat Purnima 2026 Date And Time

ज्येष्ठ पौर्णिमा तिथी 29 जून 2026 रोजी पहाटे 3.07 वाजता आरंभ होत आहे.
ज्येष्ठ पौर्णिमा तिथी 30 जून 2026 रोजी पहाटे 5.27 वाजता समाप्त होत आहे.

वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त | | Vat Purnima 2026 Shubh Muhurat

ब्रह्म मुहूर्त : पहाटे 4:05 वाजेपासून ते पहाटे 4:45 वाजेपर्यंत आहे. 
पूजेसाठी उत्तम वेळ : सकाळी 6:00 ते सकाळी 10:30 वाजेपर्यंत आहे.
अभिजित मुहूर्त : दुपारी 12:08 वाजेपासून ते दुपारी 12:59 वाजेपर्यंत आहे.
शक्यतो सूर्योदयानंतर आणि दुपारपूर्वी वडाच्या झाडाची पूजा करावी.

(नक्की वाचा : Happy Vat Purnima 2026 Wishes 25+: सात जन्माची अतुट साथ आपली! वटपौर्णिमेनिमित्त पाठवा खास शुभेच्छा संदेश)

वटपौर्णिमेच्या पूजेचे साहित्य| Vat Paurnima 2026 Pooja Sahitya
  1. वडाच्या झाडासाठी हळद, कुंकू
  2. तुपाचा किंवा तेलाचा दिवा
  3. अक्षता
  4. कापूर
  5. फुले आणि फुलांचा हार
  6. नैवेद्य (फळे, मिठाई, पुरणपोळी किंवा घरी केलेला गोड पदार्थ)
  7. आंब्याची पाने
  8. विड्याची पाने (5 किंवा 11)
  9. ओल्या हरभऱ्याची डाळ आणि आंबा 
  10. कापसाचा पांढरा दोरा /सुत (वडाभोवती गुंडाळण्यासाठी)
  11. सुपाऱ्या
  12. दक्षिणा
  13. नारळ
  14. तांदूळ
  15. पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर)
  16. कलश आणि पाणी
  17. पान-सुपारी
  18. फुलांची वेणी (इच्छेनुसार)
  19. गंध (चंदन)
  20. धूप, अगरबत्ती
  21. ओटी भरप्याचे साहित्य (हळद, कुंकू, खण, नारळ, फळे इत्यादी)

वटपौर्णिमेच्या पूजेचे महत्त्व | Vat Paurnima 2026 Pooja Importance 

  • वटसावित्री व्रत हे पतीचे दीर्घायुष्य, अखंड सौभाग्य, कुटुंबातील सुख-समृद्धी आणि आरोग्य यासाठी केले जाते. 
  • विवाहित महिला वडाच्या झाडाची पूजा करून प्रदक्षिणा घालतात आणि दोरा गुंडाळतात.
  • अविवाहित मुलींनी सद्गुणी आणि योग्य जीवनसाथी मिळावा या भावनेने वडाची पूजाप्रार्थना करावी.

श्रीकेतन कुलकर्णी गुरूजी यांनी शेअर केलेली पोस्ट वाचा 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com