Venus Jupiter Conjunction: आकाशात आज (9 जून 2026) एक अद्भुत खगोलीय नजारा पाहायला मिळणार आहे, जेव्हा गुरु (बृहस्पति) आणि शुक्र ग्रह एकमेकांच्या अतिशय जवळ येतील. दोन्ही ग्रहांमधील अंतर अवघे 1.5 अंशांच्या (डिग्री) आसपास राहील. संध्याकाळी सूर्यास्तानंतर ही घटना दुर्बिण किंवा टेलिस्कोपशिवाय उघड्या डोळ्यांनीही पाहता येऊ शकेल. नेहरू प्लॅनेटोरियमच्या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, सूर्यमालेतील दोन सर्वात तेजस्वी ग्रह गुरु आणि शुक्र यांच्यात अब्जावधी किलोमीटरचे अंतर आहे, पण आज त्यांच्या मिलनाचा दुर्मीळ नजारा पाहायला मिळणार आहे. या घटनेला ग्रहांचे महामिलन म्हटले जात आहे.
सूर्यास्तानंतर दिसणार शुक्र-गुरु ग्रहांच्या युतीचा नजारा | Venus Jupiter Conjunction Visible After Sunset
सूर्यास्तानंतर लगेचच आकाशात गुरु (Jupiter Planet) आणि शुक्र (Venus Planet) एकमेकांच्या अतिशय जवळ असतील. हे दोन ग्रह एकमेकांना स्पर्श करणार आहेत की काय, असा भास होईल. आज संध्याकाळी 7.15 वाजता सूर्यास्तानंतर ठीक 30 ते 45 मिनिटांनी पश्चिम क्षितिजावर म्हणजेच ज्या दिशेला सूर्य मावळतो त्या दिशेला पाहिले तर तुम्हीही या दुर्मीळ घटनेचे साक्षीदार होऊ शकता आणि हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करू शकता.
गुरु आणि शुक्र ग्रहांना कसे ओळखावे? How to Identify Jupiter and Venus Planets?
आकाशात जो सर्वात जास्त चमकणारा पांढरा बिंदू दिसेल तो शुक्र ग्रह असेल. त्याच्या जवळ असणारा दुसरा सर्वात तेजस्वी बिंदू म्हणजे गुरु ग्रह असेल. बुध ग्रह देखील याच रांगेत नजरेस पडू शकतो. नेहरू प्लॅनेटोरियमचे संचालक डॉ. वाय रवी किरण यांनी सांगितलं की, पृथ्वीवरून पाहताना गुरु आणि शुक्र ग्रह एकमेकांच्या खूप जवळ दिसतात. वास्तविक पाहता गुरु आणि शुक्र ग्रह एकमेकांपासून लाखो-करोडो किलोमीटर दूर आहेत, पण जेव्हा आपण पृथ्वीवरून आकाशात पाहतो, तेव्हा आपल्याला ते अंतर जाणवत नाही आणि दोन्ही ग्रह शेजारी-शेजारी दिसतात.
(नक्की वाचा : Adhik Maas 2026: अधिक मासात आईची ओटी का भरावी? जोशी गुरुजींनी सांगितलेले 6 लाभ,ओटीतील 9 गोष्टींचे महत्त्व वाचा शुक्र आणि गुरु ग्रहामधील अंतर | Distance Between Shukra And Guru Planets जरी हे दोन्ही ग्रह आकाशात एकमेकांच्या जवळ दिसत असले, तरी पृथ्वीच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास हा एक भास आहे. अंतराळात हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून अब्जावधी किलोमीटर दूर आहेत. शुक्र आणि गुरु यांच्यातील सरासरी अंतर सुमारे 67 कोटी किलोमीटर आहे. दोन्ही ग्रह वेगवेगळ्या गतीने सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात. त्यामुळे त्यांच्यातील किमान अंतर सुमारे 52.8 कोटी किलोमीटर आणि कमाल अंतर 81.4 कोटी किलोमीटरपर्यंत असू शकते. पृथ्वीपासून दोन्ही ग्रहांचे अंतर पृथ्वीपासून या दोन्ही ग्रहांचे अंतर देखील सातत्याने बदलत असते. शुक्र पृथ्वीपासून सुमारे 18 ते 20 कोटी किलोमीटर दूर आहे. हा पृथ्वीच्या सर्वात जवळच्या ग्रहांपैकी एक आहे. त्यामुळे आकाराने लहान असूनही तो सर्वात जास्त चमकतो. तर पृथ्वीपासून गुरु ग्रहाचे अंतर सुमारे 85 ते 90 कोटी किलोमीटर इतके आहे. शुक्र: उष्ण ग्रह | Venus: The Hot Planet शुक्र ग्रहाला 'सिस्टर प्लॅनेट' म्हणजेच पृथ्वीची जुळी बहीण (ट्विन प्लॅनेट) असेही म्हटले जाते. याचा आकार आणि वस्तुमान (द्रव्यमान) पृथ्वीसारखेच आहे. सूर्यमालेत सूर्याच्या सर्वात जवळ बुध ग्रह आहे, पण सर्वात उष्ण ग्रह शुक्र आहे. याच्या दाट वातावरणामध्ये 96 टक्के कार्बन डायऑक्साइड आहे. या ग्रहाचे तापमान 465 अंशांपर्यंत असते, त्यामुळे येथे जीवन असणे अशक्य आहे. सूर्यमालेतील बहुतेक ग्रहांच्या उलट, शुक्र (Shukra Grah) स्वतःच्या अक्षावर पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. म्हणजेच येथे सूर्योदय पश्चिमेला आणि सूर्यास्त पूर्वेला होतो गुरु (Jupiter): सूर्यमालेतील राजा |Jupiter: The King of the Solar System गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा आणि जड ग्रह आहे. हा ग्रह इतका विशाल आहे की आपल्या पृथ्वीसारखे 300 ग्रह यात सहज सामावू शकतात. हा वायूचा एक गोळा आहे. शुक्रासारखी याला कोणताही घन पृष्ठभाग नाही. हा प्रामुख्याने हायड्रोजन आणि हीलियम वायूने बनलेला आहे. हा स्वतःच्या अक्षावर सूर्यमालेत सर्वात वेगाने फिरतो. याचा एक दिवस अवघ्या 10 तासांचा असतो. शुक्राला एकही चंद्र नाही, तर गुरु ग्रहाकडे 95 चंद्र आहेत. या ग्रहाच्या वातावरणामध्ये एक मोठे वादळ सातत्याने सुरू असते. (Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)