Sankashti Chaturthi अधिक मासातील संकष्टी चतुर्थी, विभुवन गणेश म्हणजे काय? शुभ मुहूर्तासह राहुकाळ नोट करून घ्या

Sankashti Chaturthi June 2026: संकष्टी चतुर्थी 2026 निमित्त पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी आजचे शुभ मुहूर्त, चंद्रोदय वेळ, राहुकाळ आणि कार्यसिद्धी वेळा शेअर केल्या आहेत. बाप्पाच्या उपासनेसाठी आजचा दिवस का खास आहे ते जाणून घ्या.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Sankashti Chaturthi June 2026: अधिक मासातील संकष्टी चतुर्थी 2026"
Canva

Sankashti Chaturthi June 2026: विघ्नविनाशक भगवान श्रीगणेशाच्या आराधनेला समर्पित असलेली 'विभुवन संकष्टी चतुर्थी' आज ( 4 जून 2026) आहे. ही चतुर्थी अत्यंत दुर्मीळ मानली जाते कारण ती पुरुषोत्तम मासच्या (अधिक मास)  कृष्ण पक्षात येते. या चतुर्थीला भगवान गणेशाच्या 'विभुवन' रूपाची विशेष पूजा केली जाते. विभुवन गणेश म्हणजे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ अशा तिन्ही लोकांमध्ये विराजमान असणारे गणेश. पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी शुभ मुहूर्त, अशुभ काळ, कार्यसिद्धी वेळा यासह अन्य महत्त्वाची माहिती सोशल मीडियावर शेअर केली, जाणून घ्या...  

शुभ मुहूर्त

  • लाभ मुहूर्त : सकाळी 06:00 वाजेपासून ते सकाळी 07:38 वाजेपर्यंत आहे.
  • अमृत मुहूर्त : सकाळी 07:38 वाजेपासून ते सकाळी 09:16 वाजेपर्यंत आहे.
  • विजय मुहूर्त : दुपारी 14:42 वाजेपासून ते दुपारी 15:34 वाजेपर्यंत आहे.

अशुभकाळ

  • राहु काळ : दुपारी 12:32 वाजेपासून ते दुपारी 14:10 वाजेपर्यंत आहे.
  • यमघंट काळ : सकाळी 07:38 वाजेपासून ते सकाळी 09:16 वाजेपर्यंत आहे.

कार्यसिद्धी वेळा (शुभ काळ)

  • सकाळी: 09:16 वाजेपासून ते 12:05 वाजेपर्यंत आहे.
  • दुपार ते संध्याकाळ: 14:42 वाजेपासून ते 18:11 वाजेपर्यंत आहे.
  • रात्री: 19:04 वाजेपासून ते 21:58 वाजेपर्यंत आहे.

कार्यनाशक वेळा (अशुभ काळ)

  • सकाळी: 06:00 वाजेपासून ते 08:36 वाजेपर्यंत आहे.
  • दुपारी: 12:05 वाजेपासून ते 14:42 वाजेपर्यंत आहे.
  • संध्याकाळी: 18:11 वाजेपासून ते 19:04 वाजेपर्यंत आहे.
  • रात्री: 21:58 वाजेपासून ते रात्री 24:00 (12:00) वाजेपर्यंत आहे.

आजचे मार्गदर्शन

आजचे वस्त्र हिरवे
स्नान विशेष गहूला वनस्पतीचे चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे.
उपासना - संकटनाशन गणपती स्तोत्राचे पठण आणि 'बुं बुधाय नमः' या मंत्राचा जप करावा.
दिशाशूल उपाय दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा करण्यापूर्वी तीळ भक्षण करून बाहेर पडावे.

Advertisement

शहरानुसार चंद्रोदयाची वेळ नोट करून घ्या

चंद्रबळ

मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन या राशींना 29:59 पर्यंत चंद्रबळ अनुकूल आहे (पुढील दिवस).

सूर्योदय - 06:00 वाजता
सूर्यास्त - 19:04 वाजता
चंद्रोदय 21:48 वाजता
शालिवाहन शक 1948
संवत्सर पराभव
अयन उत्तरायण
ऋतु - ग्रीष्म
मास अधिक ज्येष्ठ
पक्ष - कृष्ण पक्ष
तिथी - तृतीया (19:48 नं.) चतुर्थी
वार - बुधवार
नक्षत्र - पूर्वाषाढा (23:26 नं.) उत्तराषाढा
योग - शुभ (07:05 नं.) शुक्ल
करण - वणीज (06:56 नं.) भद्रा
चंद्र रास - धनु (29:59 नं. मकर)
सूर्य रास - वृषभ
गुरु रास - कर्क
शुभाशुभ दिवस - 19:48 नं. शुभ दिवस
श्राद्ध तिथी तृतीया श्राद्ध

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)