जाहिरात

Visa Free country: व्हिसाचं टेन्शन सोडा, बॅग भरा! फक्त 1 लाखात फिरून या 'हे' 4 सुंदर देश

त्यामुळे ही ट्रीप नक्की करा. यातून फिरणं ही होईल आणि त्या अनुषंगाने परदेशवारी करण्याची इच्छा ही पूर्ण होईल.

Visa Free country: व्हिसाचं टेन्शन सोडा, बॅग भरा! फक्त 1 लाखात फिरून या 'हे' 4 सुंदर देश
  • भारतीय पर्यटकांना एक लाख रुपयांच्या बजेटमध्ये व्हिसा-मुक्त चार देशांची परदेशवारी करता येते
  • मॉरिशसमध्ये ६० दिवसांसाठी व्हिसा न घेता समुद्रकिनारा आणि वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येतो
  • नेपाळमध्ये व्हिसा न लागता सांस्कृतिक पर्यटन आणि साहसी खेळांसाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

दैनंदिन कामाच्या व्यापातून थोडा विसावा हवा असेल आणि खिशाला परवडणारी परदेशवारी करायची असेल, तर आता ही संधी चालून आली आहे. व्हिसाच्या कटकटीशिवाय केवळ 1 लाख रुपयांच्या बजेटमध्ये तुम्ही चार अतिशय सुंदर देशांना भेट देऊ शकता. यामध्ये राहण्या-खाण्यासह शॉपिंगचाही आनंद घेता येईल. त्यामुळे ही ट्रीप नक्की करा. यातून फिरणं ही होईल आणि त्या अनुषंगाने परदेशवारी करण्याची इच्छा ही पूर्ण होईल.  

जर तुम्हाला समुद्रकिनारे आणि वॉटर स्पोर्ट्सची आवड असेल, तर मॉरिशस हा उत्तम पर्याय आहे. भारतीय पर्यटकांना येथे 60 दिवसांपर्यंत व्हिसा-मुक्त प्रवेश मिळतो. दुसरीकडे, हिमालयाच्या कुशीत वसलेला नेपाळ हा सांस्कृतिक आणि धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. येथे व्हिसाची गरज नाही. व्हिसा शिवाय तुम्ही नेपाळमध्ये प्रवेश करू शकता. ट्रेकिंग आणि साहसी खेळांसाठी तरुणांची मोठी पसंती नेपाळला मिळते. भारतातून मोठ्या प्रमाणात पर्यटक नेपाळमध्ये जातात. 

नक्की वाचा - Oral Hygiene: रात्री झोपण्या पूर्वी दात का घासावेत? दिवसातून किती वेळा ब्रश करण्याचा तज्ज्ञ देतात सल्ला

शांतता आणि निसर्ग सौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या भूटानमध्ये व्हिसा लागत नाही, मात्र तिथे गेल्यावर परवाना (Permit) घ्यावा लागतो. तसेच, सध्या सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या व्हिएतनामनेही भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेशाची दारे उघडली आहेत. इथली संस्कृती आणि स्वस्त पर्यटन सध्या पर्यटकांना आकर्षित करत आहे. दुबाई प्रमाणे भारतीय पर्यटक आता व्हिएतनामला ही प्राधान्य देत आहेत. 

नक्की वाचा - Period Pain: मासिक पाळीत पोट खूप दुखतंय? हे आहेत सोपे घरगुती उपाय, वेदनांपासून अशी मिळवा झटपट सुटका

या देशांची करा सफर

  • मॉरिशस: बॉलीवूड स्टाईल वेकेशन हवे असेल तर मॉरिशस बेस्ट आहे. 60 दिवस तुम्ही इथे विना-व्हिसा राहू शकता.
  • नेपाळ: कमी खर्चात परदेशाचा अनुभव घ्यायचा असेल तर नेपाळला पहिले पसंती द्या. इथल्या शांत तलावांची बातच काही वेगळी आहे.
  • भूटान: डोंगर-दऱ्या आणि सुंदर मठांसाठी भूटान प्रसिद्ध आहे. इथली पारंपरिक संस्कृती तुम्हाला नक्कीच आवडेल.
  • व्हिएतनाम: सध्या व्हिएतनाम खूप 'ट्रेंडिंग' आहे. कमी पैशात लक्झरी फील देणारा हा देश भारतीयांच्या पसंतीस उतरत आहे.


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com