Vishwakarma Puja 2024 : विश्वकर्मा पूजा कधी आणि का करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त

Vishwakarma Puja 2024 : ज्योतिषाचार्यांच्या मते, यंदा अनेकांच्या मनामध्ये विश्वकर्मा पूजेबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. पूजा नेमकी कोणत्या वेळेस करावी? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

जाहिरात
Read Time: 2 mins

Vishwakarma Puja 2024 : यंदा विश्वकर्मा जयंती 17 सप्टेंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी विश्वकर्मा पूजा केली जाते. विश्वाचे निर्माते देव विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त ही पूजा केली जाते. विश्वकर्मा हे ब्रह्मदेवतेचे सातवे पुत्र मानले जातात. या दिवशी यंत्राशी संबंधित काम करणारे कामगार यंत्रांची आणि भगवान विश्वकर्माची पूजा (Vishwakarma Puja shubh muhurat)  करतात. पूजेचा शुभ मुहूर्त कालावधी कधी आहे? याबाबत जाणून घेऊया सविस्तर माहिती....   

भगवान विश्वकर्मा आहेत वास्तुविशारद-शिल्पकार  

शास्त्रांमध्ये भगवान विश्वकर्मा यांना शिल्पकार आणि वास्तुविशारद मानले गेले आहे. त्यांनीच इंद्रपुरी, द्वारका, हस्तिनापूर, स्वर्गलोक, लंका आणि जगन्नाथ पुरीचे निर्माण केले. शास्त्रांमध्ये असंही म्हटलं गेलंय की, भगवान विश्वकर्मा यांनी भगवान शिवाचे त्रिशूल आणि भगवान विष्णूचे सुदर्शन चक्रही निर्माण केले. यामुळेच विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते.

(नक्की वाचा: हनुमान चालीसाचे पठण करताना अजिबात करू नका या चुका, जाणून घ्या नियम)

विश्वकर्मा पूजा का केली जाते?

धार्मिक मान्यतेनुसार, शुभ मुहुर्तावर भगवान विश्वकर्माची विधिवत पूजा केल्यास कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते आणि व्यवसायामध्ये यश मिळते. पूजेदरम्यान मंत्रांचाही योग्य पद्धतीने जप करावा.  

(नक्की वाचा: प्रभू श्रीरामाच्या नावावरून तुमच्या मुलाचे ठेवा सुंदर आणि अर्थपूर्ण नाव)

सूर्याचा कन्या राशीमध्ये प्रवेश 

ज्योतिषाचार्यांच्या मते, यंदा विश्वकर्मा पूजेबाबत भाविकांमध्ये मनात गोंधळ आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यामध्ये सूर्य सिंह राशीतून कन्या राशीमध्ये प्रवेश करतो. यावेळेस विश्वकर्मा पूजा केली जाते, पण यंदा सूर्याने 16 सप्टेंबरलाच संध्याकाळी 7:29 वाजताच कन्या राशीत प्रवेश केल्याने विश्वकर्मा पूजेची नेमकी तारीख आणि पूजा मुहूर्त कधी आहे? याबाबत लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. 

विश्वकर्मा पूजेचा शुभ मुहूर्त 

17 सप्टेंबरला विश्वकर्मा पूजा रवी योगमध्ये आहे. सकाळी 6.07 वाजता रवी योगास प्रारंभ होईल आणि दुपारी 1:53 वाजता हा योग समाप्त होईल. यादरम्यान कारखाने आणि दुकानांमध्ये पूजा करावी. यंत्रसामग्रींशी संबंधित काम करणारे मजूर आणि कामगार या दिवशी पूजेनंतर त्या यंत्रांचा वापर करत नाहीत. कारखान्यांमधील सर्व यंत्रे आणि यंत्रांच्या सुट्या भागांची पूजा केली जाते.  

(नक्की वाचा: Tulsi Plant Rules: घरामध्ये तुळशीचे रोप असेल तर या गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होईल मोठे नुकसान)

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Topics mentioned in this article