Walking Tips : Walk सुरू करताच पहिल्या 2 मिनिटात काय होतं? शरीरात होतात मोठे बदल

दररोज वॉक केल्याने केवळ कॅलरी बर्न होत नाही तर अनेक धोकादायक आजारातून बाहेर पडण्यास मदत होते.

जाहिरात
Read Time: 3 mins

दररोज वॉक केल्याने केवळ कॅलरी बर्न होत नाही तर अनेक धोकादायक आजारातून बाहेर पडण्यास मदत होते. आहारतज्ज्ञ सोनिया नारंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमित चालण्याच्या व्यायमातून तुमच्या शरीरात (Walking Tips for Better Health) मोठे बदल होऊ शकतात. इंस्टाग्राम @sonianarangsdietclinics  वर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी वॉकिंगदरम्यान शरीरावर काय परिणाम (How Walking Reduces Stress and Anxiety Naturally) होतो हे सांगितलं.

व्हिडिओमध्ये, त्यांनी सांगितलं की, चालणे तुमच्या शरीरात कालांतराने कसे सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. (What Happens to Your Body after 1 Hour of Walk) त्यातील प्रत्येक मिनिट खूप महत्त्वाचा असतो. 

वॉकिग सुरू केल्याने काय होतं? (What happens when you start walking)

2 मिनिटात रक्तप्रवाह वाढतो

 सोनिया नारंग यांनी सांगितलं की, तुम्ही चालायला सुरुवात करताच तुमच्या शरीरात अनेक बदल होऊ लागतात. सुरुवातीला केवळ दोन मिनिटातच तुमचा रक्तप्रवाह वाढतो. यामुळे तुमच्या शरीराच्या सर्व अवयवांना ऑक्सिजन पोहोचायला मदत मिळते. ज्यामुळे शरीरातील एनर्जी वाढते. 

10 मिनिटात स्ट्रेस लेव्हल कमी होतो (Stress level decreases after 10 minutes)

थोडा वेळ चालल्यानंतर, तुमच्या शरीरात एंडोर्फिन बाहेर पडू लागतात. हे ताण कमी करणारे हार्मोन्स आहेत.  म्हणजेच, फक्त १० मिनिटे चालून तुम्ही तुमचा ताण कमी करू शकता. यामुळे तुम्हाला दिवसभर आराम वाटू शकतो.

15 मिनिटात रक्तदाब आणि साखर नियंत्रणात (Blood pressure and sugar level control after 15 minutes)

सोनिया नारंग यांनी सांगितलं की, सलग 15 मिनिटांचा वॉक केल्याने शरीरातील रक्तदाब आणि शरीरातील साखरेच्या पातळी नियंत्रणात येते. मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे रुग्णांसाठी ही परिणामकारक उपाययोजना आहे. 

Advertisement

30 मिनिटानंतर फॅट लॉसची सुरुवात

30 मिनिटापर्यंत सलग चालल्याने शरीरात जमा असलेलं फॅट बर्न व्हायला सुरुवात होते. यामुळे वजन कमी करण्यासाठी चालणं फायदेशीर ठरतं.

एका तासानंतर वेस्ट फॅट बर्निंग (Waist fat burning after 1 hour)

जर तुम्ही दररोज एक तास चालत असाल तर कंबर आणि पोटाजवळील चरबी जलद गतीने कमी होऊ लागते. म्हणजेच व्यायामाशिवाय तुमचं वजन कमी होऊ शकतं आणि कठीण व्यायाम न करता तुम्ही तंदुरुस्त शरीर मिळवू शकता. 

Advertisement

संशोधनानुसार वॉकिंग सर्वोत्कृष्ट व्यायाम  ( Research also considers walking as the best exercise)

JAMA इंटरनॅशनलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, दररोज केवळ १० मिनिट वॉक केल्याने मृत्यूचा धोका ७ टक्क्यांपर्यंत कमी होतो. जर वॉकिंग २० मिनिटांपर्यंत वाढवला तर रिस्क १३ टक्क्यांपर्यंत कमी होतो आणि ३० मिनिटांनंतर १७ टक्क्यांपर्यंत कमी होतो. हार्वर्ड मेडिकल स्कूलनुसार, दररोज ३० मिनिटं वॉक केल्यानंतर हृदयाचा धोका १९ टक्क्यांपर्यंत कमी होतो. जर्मनीच्या रॉबर्ट कोच इन्स्टिट्यूटच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जेवणानंतर १५ मिनिटे चालल्याने रक्तातील साखर आणि मेंदू दोन्ही नियंत्रित राहतात. त्यामुळे टाइप-२ मधुमेहाचा धोका देखील कमी होऊ शकतो.


वॉक करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल

  • योग्य शूज घालावे
  • सरळ चालावे आणि शरीराची मुद्रा योग्य ठेवावी
  • फोनमध्ये टायमर किंवा स्टेप काऊंट सुरू ठेवा
  • संगीत ऐकत असताना फोकस वॉकवर ठेवा
  • ज्यास्त पाणी प्या