Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी जिममध्ये घाम गाळण्यापेक्षा दररोज चाला 'इतकी' पावलं; 15 दिवसात दिसेल फरक

How Much Walking Is Required To Lose 1 Kg Of Body Weight:  वजन कमी करणे किंवा स्वतःला फिट ठेवणे ही आजच्या काळात एक मोठी गरज बनली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Weight Loss Tips : जिममध्ये न जाताही केवळ चालण्याने तुम्ही तुमचे वाढलेले वजन कमी करू शकता.
मुंबई:

How Much Walking Is Required To Lose 1 Kg Of Body Weight:  वजन कमी करणे किंवा स्वतःला फिट ठेवणे ही आजच्या काळात एक मोठी गरज बनली आहे. जेव्हा वेट लॉसचा विचार येतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर जिममधील अवजड मशीन, तासनतास गाळलेला घाम आणि कडक डाएट उभा राहतो. अनेक जण चालण्याला खूप हलका व्यायाम समजतात आणि त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, जिममध्ये न जाताही केवळ चालण्याने तुम्ही तुमचे वाढलेले वजन कमी करू शकता.

फिटनेस कोच अंजली सचान यांनी फॅट बर्न करण्यासाठी चालणे हा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे म्हटले आहे. 1 किलो फॅट कमी करण्यासाठी नेमके किती पावले चालावे लागते, याचे सविस्तर गणित आता समोर आले आहे.

1 किलो फॅट आणि कॅलरीजचे नेमके गणित

तज्ज्ञ अंजली सचान यांच्या माहितीनुसार, आपल्या शरीरातील 1 किलो फॅट हे साधारणपणे 7,700 कॅलरीजच्या बरोबर असते. हे वजन म्हणजे केवळ शरीरातील पाणी किंवा सूज नसून शरीरात जमा झालेले जिद्दी फॅट असते. 

फॅट ही शरीरात साठवलेली एक प्रकारची ऊर्जा आहे, त्यामुळे ती जाळण्यासाठी थोडा वेळ आणि सातत्य आवश्यक असते. एकदा का हे फॅट जळाले की ते कायमस्वरूपी कमी होण्यास मदत होते. या प्रक्रियेत घाई करण्यापेक्षा सातत्य राखणे जास्त महत्त्वाचे असते.

Advertisement


( नक्की वाचा : Healthy Diet: रोज मूठभर शेंगदाणे खा आणि 'या' गंभीर आजारांना ठेवा दूर! 3 व्हिटॅमिन्स'मुळे मिळतात जबरदस्त फायदे )

किती पावले चालल्यावर किती कॅलरीज बर्न होतात?

आपण जेव्हा चालतो तेव्हा आपल्या शरीरातील स्नायू सक्रिय होतात, हृदयाचे ठोके वाढतात आणि शरीराचा तोल सांभाळला जातो, या सर्व प्रक्रियेत कॅलरीज खर्च होतात. अंजली सांगतात की, जेव्हा तुम्ही साधारण 1,000 पावले चालता, तेव्हा शरीरातील 50 ते 70 कॅलरीज बर्न होतात. ही आकडेवारी व्यक्तीच्या चालण्याच्या वेगावर आणि शरीरयष्टीवर देखील अवलंबून असते.

1 किलो वजन कमी करण्यासाठी किती चालावे लागेल?

कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर विकास ठाकरान यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर व्यायामाचा परिणाम वेगवेगळा होतो. तरीही कॅलरीजचे सरासरी गणित मांडले तर, 1 किलो फॅट म्हणजेच 7,700 कॅलरीज जाळण्यासाठी तुम्हाला साधारणपणे 1 लाख 28 हजार ते 1 लाख 50 हजार पावले चालावे लागेल. हा आकडा ऐकायला खूप मोठा वाटत असला तरी, जर तुम्ही त्याचे दिवसांमध्ये विभाजन केले तर हे लक्ष्य गाठणे अत्यंत सोपे आहे.

Advertisement

(नक्की वाचा : Healthy Diet: एका दिवसात किती शेंगदाणे खावे? कुणी अजिबात खाऊ नये? फायदे, तोटे आणि 17 प्रश्नांची उत्तरं (FAQ) )

किती दिवसात कमी होईल 1 किलो वजन?

तुम्ही दररोज नियमाने 10,000 ते 15,000 पावले चाललात, तर अवघ्या 10 ते 12 दिवसांत तुमचे 1.5 लाख पावलांचे लक्ष्य पूर्ण होऊ शकते. याचाच अर्थ असा की, कोणत्याही कडक डाएटशिवाय किंवा जिममध्ये न जाता तुम्ही केवळ दोन आठवड्यांत 1 किलो फॅट सहजपणे कमी करू शकता. हे गणित समजून घेतल्यास वजन कमी करणे ही गोष्ट ओझे न वाटता एक सोपी प्रक्रिया वाटू लागते.

चालणे हा व्यायामाचा सर्वोत्तम पर्याय का आहे?

फिटनेस तज्ज्ञांनी चालण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. चालण्यामुळे कॅलरीज जळतात आणि शरीरातील फॅट कायमस्वरूपी कमी होण्यास मदत होते. या व्यायामामुळे इतर जड व्यायामांप्रमाणे खूप जास्त भूक लागत नाही, ज्यामुळे आहारावर नियंत्रण राहते. 

Advertisement

विशेष म्हणजे चालण्याचा आपल्या हार्मोन्सवर किंवा महिलांच्या मासिक पाळीवर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. शरीर जास्त न थकवता मानसिक आरोग्य आणि मूड सुधारण्यासाठी चालणे हा सर्वोत्तम उपाय मानला जातो. फॅट लॉस ही एका रात्रीत होणारी जादू नसून दररोज उचललेल्या लहान पावलांचा तो सकारात्मक परिणाम आहे.

( स्पष्टीकरण : ही माहिती सामान्य ज्ञानावर अधारित आहे. हा कोणत्याही योग्य उपचाराचा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमी एखाद्या तज्ज्ञाचा किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. NDTV नेटवर्क या माहितीच्या जबाबदारीचा दावा करत नाही.)