तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवत असाल सावधान; दुर्लक्ष केल्यास मोठा धोका!

तुम्ही पाहिलं असेल की बरेच लोक त्यांच्या फोन कव्हरच्या मागे नोटा ठेवतात. जेव्हा ते कुठे बाहेर जातात तेव्हा ते त्यातून पैसे काढून सहजपणे पेमेंट करतात. काहींसाठी तर हा आपत्कालिन फंड असतो.

जाहिरात
Read Time: 2 mins
मोबाइलच्या कव्हरमध्ये पैसे ठेवणं सुरक्षित आहे?

तुम्ही पाहिलं असेल की बरेच लोक त्यांच्या फोन कव्हरमध्ये नोटा ठेवतात. जेव्हा ते कुठे बाहेर जातात तेव्हा त्यातून पैसे काढून सहजपणे पेमेंट करतात. काहींसाठी तर हा आपत्कालिन फंड असतो. अनेकजण फोन कव्हरला मिनी वॉलेट करतात. मात्र याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला याच सवयीमुळे होणाऱ्या त्रासांबद्दल सांगणार आहोत. तुम्हाला ही सवय असेल तर आताच का बदलायला हवी, जाणून घ्या कारणं. 

फोन कव्हरच्या मागे पैशांच्या नोटा ठेवल्याने काय होतं? 

  • फोन ओव्हरहिट होऊ शकतो - जेव्हा फोन आणि कव्हरमध्ये कागदाची नोट येते, तेव्हा उष्णता बाहेर येण्यास अडथळा येतो. असं घडतं कारण नोट इन्सुलेटर म्हणून काम करतं.  ज्यामुळे फोनची उष्णता आत अडकून राहते. परिणामी बॅटरी फुगू शकते, प्रोसेसर हळू काम करू लागतो आणि फोन वारंवार हँग होण्याची शक्यता असते. 
     
  • कॅमेरा आणि फ्लॅशमध्ये अडचणी - अनेकदा नोट कव्हरच्या आत सरकते आणि कॅमेऱ्याची लेन्स किंवा फ्लॅशचा काही भाग झाकला जातो. ज्यामुळे फोटोची क्वालिटी खराब होते आणि फ्लॅशचा प्रकाश नीट येत नाही. 
     
  • स्फोट होण्याची भीती - आजकल स्मार्टफोनमध्ये फास्ट चार्जिंगचा फिचर असतोस ज्यामुळे चार्जिंगदरम्यान फोन बराच गरम होतो. अशात जर तुम्ही कव्हरमध्ये नोट ठेऊन फोन चार्ज करीत असाल तर फोन अधिक हिट होऊ शकतो, ज्यामुळे नोटेला आग लागू शकते.