कॅन्सर का होतो? 'या' 10 पदार्थांपासून दूर राहा; नंबर 1 भारतात प्रसिद्ध; जागतिक आरोग्य संघटनेनी दिली लिस्ट

हैराण करणारी बाब म्हणजे यातील अनेक गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. जाणून घेऊया कॅन्सरची लागण होण्यामागील १० कारणं कोणती?

जाहिरात
Read Time: 3 mins

कॅन्सर जगातील सर्वात गंभीर आजारांपैकी एक आहे. याचं नाव घेताच लोकांमध्ये दहशत निर्माण होते. चिंताजनक बाब म्हणजे कॅन्सरची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशात कॅन्सर का होतो, असा सवाल अनेकदा उपस्थित केला जातो. याला कार्सिनोजेन म्हणजे कॅन्सर निर्माण करणारं तत्व म्हटलं जातं. बराच काळ याच्या संपर्कात राहिल्यास कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. ऑन्कोकॉलॉजिस्ट डॉ. वर्तिका विश्वानी यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टवर १० कार्सिनोजेनबद्दल सांगितलं. जागतिक आरोग्य संघटनेने या दहा गोष्टींना ग्रुप १ च्या श्रेणीत ठेवलं आहे. हैराण करणारी बाब म्हणजे यातील अनेक गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. जाणून घेऊया कॅन्सरची लागण होण्यामागील १० कारणं कोणती?

कॅन्सरची लागण होण्यामागील १० कारणं...

नंबर - १० - सूर्याची यूव्ही किरणं...

ऑन्कॉलॉजिस्ट या लिस्टमध्ये दहाव्या क्रमांकावर सूर्यातून निघणाऱ्या हानिकारक पराबॅगनी किरणं म्हणजे युव्ही रेडिएशन आहेत. डॉक्टर सांगतात, बराच काळ याच्या संपर्कात राहिल्याने त्वचेवर टॅनिंग बॅड्स तयार होतात. जो काही प्रकरणात कॅन्सरचं कारण ठरू शकतं. यासाठी सनस्क्रिनचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. 

Advertisement

नंबर 9 - अफ्लाटॉक्सिन (Aflatoxin)

डॉक्टरांनी सांगितलं की, हे तत्व सर्वसाधारणपणे साठवून ठेवलेल्या धान्यांत तयार होतं. विशेषत: पावसाळ्यात गहू, शेंगदाणे किंवा कोणतंही साठवलेल्या धान्यावर कोणत्याही प्रकारची ग्रोथ होत असेल तर ते खाणं टाळावं. यामध्ये अफ्लाटॉक्सिन रिलीज होऊ शकतं, ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. 

नंबर 8- प्रोसेस्ड मीट

बाजारात मिळणारं प्रोसेस्ड मीट खाणं टाळायला हवं. WHO अंतर्गत हे पदार्थ ग्रुप १ कार्सिनोजेनमधील आहे. यामध्ये सॉसेज, बेकन, सलामी, हॉट डॉग आणि हॅमसारख्या पदार्थांचा समावेश आहे. 

नंबर 7- वायु प्रदूषण

वायू प्रदूषणही कॅन्सर उद्भवणाऱ्या मुख्य कारणांपैकी एक आहे. डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की, घराबाहेर पडल्यानंतर N-95 मास्क लावा आणि घरात एयर प्युरीफायर लावण्याकडे गांभीर्याने घ्यायला हवं.

नंबर 6- हेपेटाइटिस बी और सी (Hepatitis B and Hepatitis C)

हेपेटायटिस बी आणि सी सारख्या व्हायरसमुळे लिव्हरला संसर्ग होतो. जर हे इन्फेक्शन बराच काळ राहिलं तर लिव्हर कॅन्सरचा धोका अनेक पटीने वाढतो. 

Advertisement

नंबर 5- ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV)

ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस एक कॉमन व्हायरस आहे. बराच काळ याचा संसर्ग झाल्यास सर्व्हाइकल कॅन्सरचा धोका वाढतो. डॉ. वर्तिका यांनी सांगितलं की, कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी लस घेणं आवश्यक आहे. याशिवाय नियमित चाचणी केल्यामुळे शरीरात होणारे बदल समजून घेण्यास मदत होते. 

नंबर 4- अल्कोहोल

अल्कोहोल हे कॅन्सरमागील सर्वात मोठ्या कारणांपैकी एक आहे. जे लोक जितकं जास्त अॅल्कोहोल घेतात, त्यांच्यात तितकाच कॅन्सरचा धोका वाढतो. 

नंबर 3- पॅसिव्ह स्मोकिंग

डॉ. वर्तिका यांनी सांगितलं की, जर तुम्ही स्मोकिंग करत नाही, मात्र धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात असाल तर कॅन्सरचा धोका वाढतो. 

नंबर २ - तंबाखू  

तंबाखूचं नियमित सेवन कॅन्सरच्या सर्वात मोठ्या कारणांपैकी एक आहे. तंबाखू खाल्ल्याने गळा, तोंड, फुप्फुसं, अन्न नलिका आणि अन्य प्रकारचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. जर तुम्ही सिगारेट, बिडी, बुक्का, खैनी किंवा गुटखा सारख्या कोणत्याही पदार्थाचं सेवन करीत असाल तर बंद करा. 

Advertisement

नंबर 1- सुपारी

अनेकजण दररोज सुपारी खातात. त्यांना वाटतं की सुपारी ही तंबाखू आणि सिगारेट इतकी धोकादायक नाही. मात्र ही धारणा पूर्णपणे चुकीची आहे. डॉ. वर्तिका यांनी सांगितलं की, सुपारी तासन् तास तोंडात ठेवण्याले ओरल सबम्युकस फायब्रोसिस डेव्हलप होतं, ज्यातून कॅन्सर होण्याचा धोका असतो.