What Do Boys And Girls Search On Google Before getting Married: लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण.. लग्नानंतर मुलगा- मुलगी प्रत्येकाचेच आयुष्य बदलून जाते, नव्या प्रवासाला सुरुवात होते. लग्नानंतर प्रत्येकाच्या लाईफमध्ये बदल होतात, जबाबदारी वाढते, तडजोड करावी लागते अन् एकमेकांना समजून मोठा प्रवास पूर्ण करायचा असतो. म्हणूनच लग्न हा मुलगा असो किंवा मुलगी दोघांच्याही आयुष्यातला महत्त्वाचा निर्णय असतो. त्यामुळे लग्नाच्या बेडीत अडकण्याआधी मुला- मुलींच्या मनात असंख्य प्रश्न, शंका, उत्सुकता असते.
प्रत्येक प्रश्न ते मित्र मैत्रिणींना विचारु शकत नाहीत. अशावेळी त्यांना गुगलची मदत घ्यावी लागते. लग्नाआधी तरुण-तरुणी गुगलवर काय काय सर्च करतात? बोहल्यावर चढण्याआधी नवरदेवाला अन् नवरीला कोणते प्रश्न पडतात, कोणत्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. याचीच महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. चला तर मग जाणून घेऊया..
Heart Attack: सडपातळ आणि फिट दिसणाऱ्यांनाही हार्ट अटॅकचा धोका; व्हिसरल फॅट ठरतंय 'सायलेंट किलर'
लग्नापूर्वी मुली गुगलवर काय सर्च करतात?| What Do Girls Search On Google Before Marriage
लग्नासाठी योग्य वय कोणते?: लग्नासाठी मुली लग्नासाठी योग्य वय कोणते? मी घाई करत नाही ना? असा प्रश्न मुलींना पडतो. ज्याबद्दल त्या गुगलवर सर्च करतात.
नव्या घरात कसे सांभाळून घ्यावे?: लग्नाआधी अनेकदा मुलींना काळजी असते की नवीन घरात गेल्यावर त्यांना कसे वाटेल. नव्या जागी कसं स्थीर व्हावं, याबाबत त्या सर्च करतात. तसेच नव्या घरात सर्वांशी मिळुन मिसळून कसे राहायचे? याबाबतही त्या अभ्यास करतात.
पतीला खुश कसे ठेवायचे?: लग्नानंतर मुली पतीला कसे खुश ठेवायचे? याबाबतही सर्च करतात. याशिवाय सासू सासऱ्यांची मने कशी जिंकायची? वाद-विवाद कसे टाळायचे? याबाबतही त्यांना जाणून घ्यायचे असते.
कपड्यांबाबत माहिती: लग्न झाल्यानंतर मुलींच्या कपड्यांमध्ये मोठा बदल होतो. मुली त्यांच्या लग्नाबद्दल खूप उत्सुक असतात आणि याशिवाय त्यांच्या मनात एक वेगळीच भीती असते. याबाबतही त्या गुगलवर सर्च करतात.
लग्नापूर्वी मुले गुगलवर काय सर्च करतात? What Do Boys Search On Google Before Marriage
पैशांची बचत कशी करायची? कुठे- कुठे गुंतवणूक करता येईल?: लग्नापूर्वी मुलांना त्यांच्या आर्थिक बाबींबाबत दक्षता घ्यावी लागते अन् चिंताही असते. त्यामुळे मुले प्रामुख्याने लग्नानंतर कमाई आणि खर्च याचे नियोजन कसे करावे? कुठे कुठे गुंतवणूक करावी? अनावश्यक खर्च टाळून लग्नानंतर आर्थिक बाजू कशी भक्कम करता येईल याबाबत मुले सर्च करतात..
लग्नासाठी मी घाई करत नाही ना?
लग्नानंतर मुलांची जबाबदारी वाढते, अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे मुले लग्नासाठी कितीही उत्सुक असले तरी मी घाई करत नाही ना? असा प्रश्न त्यांच्या मनात नक्की येतो. यासाठी मुले लग्नाचे योग्य वय कोणते? याबाबत गुगलवर सर्च करतात.
बायको कुटुंबाला सांभाळून घेईल का? आपली होणारी पत्नी आपल्या कुटुंबाशी जुळवून घेईल ना? आई वडिलांचा सन्मान राखेल ना? असे प्रश्न मुलांच्या मनात असतात, याबाबतही ते गुगलची मदत घेतात. पत्नी आणि फॅमिलीमध्ये एकत्रित आनंद ठेवण्यासाठी आपणं काय करावं? याबाबत ते जाणून घेतात.
पत्नीला खुश कसं ठेवायचे? लग्नानंतर प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात त्याची पत्नी ही महत्त्वाची व्यक्ती असते. त्यामुळे पत्नीला वेळ कसा द्यावा? सरप्राईज, छोट्या छोट्या गोष्टींमधील काळजी, तिला न दुखावता संसाराचा गाडा कसा हाकावा? याबाबतही मुले जागरुक असतात.
फॅमिली प्लॅनिंग केव्हा करु? लग्नानंतर बऱ्याच जोडप्यांना फॅमिली प्लॅनिंगबाबत अनेक प्रश्न पडतात. फॅमिली प्लॅनिंग कधी करु? त्याबाबत काय काळजी घ्यावी? याबाबतही मुले गुगलवर सर्च करतात.
लग्न टिकेल ना?: गेल्या काही वर्षांमध्ये वैवाहिक नात्यामध्ये असणाऱ्या अडचणी पाहता आमचं नातं किती काळ टिकेल इथपासून होणारी पत्नी अर्थावरच साथ सोडणार नाही ना? घटस्फोट मागणार नाही ना? असे प्रश्नही मुलं गुगलवर सर्च करतात.
BSNL Offer: बीएसएनलची धमाकेदार ऑफर! वर्षभर कॉलिंग, डेटा, OTT अन् बरंच काही... वाचा सर्व डिटेल्स