BSNL Offer News: सध्या टेलिकॉम कंपन्यांच्या महागड्या रिचार्जने ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे, त्यामुळे प्रत्येकजण स्वस्त प्लॅन्सच्या शोधात असतो. या ग्राहकांसाठी आता सरकारी मालकीची टेलिकॉम कंपनी BSNLने सर्वात स्वस्त आणि मस्त ऑफरची घोषणा केली आहे. भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने बाजारपेठेतील आपले स्थान मजबूत करण्याच्या दृष्टीने दोन अत्यंत आकर्षक आणि किफायतशीर प्रीपेड प्लॅन्स सादर केले आहेत, ज्यामुळे ग्राहकांची लॉटरीच लागणार आहे. कोणते आहेत ते प्लॅन? काय आहे खास ऑफर? वाचा...
1 वर्षाचा प्लॅन, 1000 रुपयांची होणार बचत...
BSNL चा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्लॅन म्हणजे २,३९९ रुपयांचा वार्षिक प्लॅन. BSNL चा हा प्लॅन तब्बल १,००० ते १,५०० रुपयांची बचत करणारा ठरतो. ग्राहकांना एकदा रिचार्ज केल्यानंतर वर्षभर रिचार्जच्या त्रासातून सुटका मिळेल. हा प्लॅन ३६५ दिवसांसाठी आहे. ज्यामध्ये दररोज २ GB हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड मोफत व्हॉईस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस मोफत, यासह या प्लॅनमध्ये ग्राहकांना BiTV सेवेचा मोफत ॲक्सेस मिळतो. ज्यामध्ये 350 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्स आणि अनेक OTT ॲप्सचा समावेश आहे.
Tech News : डेटा शिवाय मोबाईलवर लाईव्ह स्ट्रीमिंग, टीव्ही-ओटीटी पाहता येणार; काय आहे D2M तंत्रज्ञान?
या एका वर्षाच्या प्लॅनसोबतच, BSNL ने कमी कालावधीसाठी देखील एक आकर्षक प्लॅन बाजारात आणला आहे. हा प्लॅन 50 दिवसांचा असून त्याची किंमत 347 इतकी आहे. कंपनीने अधिकृत ‘X' (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून याची माहिती दिली आहे. हा प्लॅन अशा ग्राहकांसाठी उत्तम पर्याय आहे ज्यांना दीड महिन्याच्या आसपास व्हॅलिडिटी आणि भरपूर डेटा हवा आहे.
Say goodbye to recharge stress!
— BSNL India (@BSNLCorporate) November 28, 2025
With the BSNL ₹347 plan, enjoy Unlimited Calls, 2GB Data per day, 100 SMS/day for 50 days of seamless connectivity.
Now recharge via BReX: https://t.co/41wNbHpQ5c#BSNLPrepaidPlan #ConnectingBharat #Recharge #RechargePlan #BSNL pic.twitter.com/fBrJNOrTE8
50 दिवसांचा प्लॅन...
या प्लॅनमध्ये दररोज २ GB हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएस यासह संपूर्ण भारतात मोफत नॅशनल रोमिंग मिळणार आहे. या प्लॅन्सची किंमत आणि मिळणारे फायदे पाहता, BSNL ची ही रणनीती निश्चितच यशस्वी ठरू शकते. विशेष म्हणजे, BSNL च्या अधिकृत वेबसाइट किंवा सेल्फ-केअर ॲपवरून रिचार्ज केल्यास ग्राहकांना ५% पर्यंत अतिरिक्त सूट मिळत आहे. यामुळे, सरकारी कंपनीकडे ग्राहकांचे स्थलांतर (पोर्टिंग) वाढण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world