Beer Bath Trend : पाणी नाही, बिअरने करतात आंघोळ; या देशात का आहे बिअर बाथचा ट्रेंड?

जगभरातील आरोग्य आणि निरोगीपणासंबंधित विविध ट्रेंड समोर येत असतात. मात्र एक वेगळाच हैराण करणारा ट्रेंड समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
beer bath trend हा व्हायरल होत आहे.

Beer Bath Trend : जगभरातील आरोग्य आणि निरोगीपणासंबंधित विविध ट्रेंड समोर येत असतात. मात्र एक वेगळाच ट्रेंड हैराण करणारा आहे. जगभरातील असा एक देश आहे जिथं लोक आंघोळ करण्यासाठी पाण्याऐवजी बिअरचा वापर करतात. वाचून विचित्र वाटेल, मात्र ही हेल्थ ट्रिटमेंट मानली जाते. याबद्दल जाणून घेऊया. 

युरोपात हा ट्रेंड असतो. येथील अनेक देशांमध्ये बिअर स्पो लोकप्रिय झाले आहेत. येथे लोक फेसाळलेल्या बिअरने भरलेल्या टबमध्ये तासन् तास रिलॅक्स करतात. शरीर आणि मेंदूसाठी हे फायदेशीर असल्याचं सांगितलं जात. 

येथे बिअरचा वापर केवळ पिण्यासाठी केला जात नाही तर आंघोळीसाठीही केला जातो. युरोपात गेल्या शंभर वर्षांपासून ही परंपरा असल्याचं सांगितलं जातं. असं म्हटलं जातं की, मध्ययुगात लोकांचा असा विश्वास होता की बिअरमध्ये असलेले यीस्ट आणि हॉप्स त्वचा स्वच्छ करण्यास आणि शरीराला ताजेतवाने करण्यास मदत करतात.

Beer Spa चालविणाऱ्या तज्ज्ञांनी दावा केला आहे की, बिअरने आंघोळ केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. बिअरमधील यीस्ट आणि विटॅमिन बी त्वचा मऊ आणि चमकदार बनवते. याशिवाय फेसाळलेल्या टबमध्ये बसून लोक रिलॅक्स होतात. गरम बिअर टबमुळे शरीरातील रक्तप्रवाह चांगला होता आणि बिअरमधील नैसर्गिक घटक घामातून शरीरातून विषारी द्रव्य बाहेर काढण्यास मदत करतं. 

Advertisement

युरोपातील अनेक देशांमध्ये आता बिअर स्पा पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असतं. विशेषत: चेक गणराज्य, ऑस्ट्रिया, जर्मनी आणि पोलंडमध्ये बिअर बाथ प्रचंड लोकप्रिय आहे. येथे येणारे पर्यटक फेसाळलेल्या बिअरमध्ये तासन् तास आराम करीत असतात. इतकच नाही तर अनेक स्पामध्ये आंघोळीसह बिअर पिण्याची सुविधी उपलब्ध असते. वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बिअर बाथमध्ये काही प्रभावी परिणाम होत नाही. 

Topics mentioned in this article