What is Boysober? : डेटिंगचे ट्रेंड सतत बदलत असतात. यापूर्वी काही समान मित्रांच्या माध्यमातून तरुण-तरुणींची भेट निश्चित केली जात असे. त्या भेटीतून डेटिंग, प्रेम आणि नंतर लग्न हे टप्पे ते जोडपं पूर्ण करत. सोशल मीडियाचं महत्त्व वाढल्यानंतर डेटिंगचा हा पारंपारिक प्रकार मागं पडलाय. सोशल मीडियामुळे जास्त लोकांना भेटणं शक्य झालंय. त्यामुळे ऑनलाईन डेटिंग हा नव्या पिढीचा परवलीचा शब्द झालाय. फिजलिंग (fizzling) , मास्टर डेटिंग (masterdating) या सारखे शब्द या पिढीच्या बोलण्यात सर्रास वापरणाऱ्या या पिढीमध्ये रिलेशनशिपचा नवा ट्रेंड सध्या झपाट्यानं वाढू लागलाय. त्याचं नाव आहे बॉयसोबर (Boysober) हा बॉयसोबर हा प्रकार काय आहे? हे तुम्हाला आम्ही सांगणार आहोत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'द इंडिपेंडंट' नं दिलेल्या माहितीनुसार, 'बॉयसोबर' हा शब्द सर्वप्रथम अमेरिकेतील हास्य कलाकार होप वुडार्डनं वापरला. होपनं त्यासंबधीचे नियम देखील सांगितले आहे. 'बॉयसोबर' प्रकारात आजची जनरेशन Z म्हणून ओळखली जाणारी विशीतील तरुणाई कोणत्याही प्रकारचे तणावग्रस्त नातेसंबंधांपासून दूर राहते. डेटिंगमधून इतरांपासून खोटं प्रमाणपत्र मिळवण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा ती ऊर्जा स्वत:साठी वापरणे म्हणजे बॉयसोबर. यामधील तरुणाई कोणत्याही डेटिंग अॅपच्या भानगडीत पडणार नाही. तो सर्व वेळ स्वत:ला आनंद देणाऱ्या गोष्टींवर खर्च करेल.
बॉयसोबर हा फक्त महिलांसाठी असलेला प्रकार आहे, अशी तुमची समजूत होऊ शकते. पण, प्रत्यक्षात तसं नाही. हा लिंगनिरपेक्ष शब्द आहे. या प्रकारचं आयुष्य जगणाऱ्या महिला आणि पुरुष दोघांनाही बॉयसोबर असंच म्हणतात. अमेरिका आणि युरोपमधील अनेक पुरुषांमध्येही हा ट्रेंड वाढत आहे. भारतामधील महानगरात विशेषत: भरपूर पगार मिळवणाऱ्या तरुणाई 'बॉयसोबर' होण्याचा पर्याय स्विकारत आहे.
( ट्रेंडींग न्यूज : वारंवार हेअर डाय केल्याने होतात हे 6 तोटे, पैसे वाया जातात शिवाय केसांचे होते मोठे नुकसान )
वुडार्डनं याबाबत दिलेल्या स्पष्टीकरणानुसार 'बॉयसोबर' मधील मुलं-मुली त्यांचं वर्ष हे तणावग्रस्त नातेसंबंध, हुक-अप्स याच्या नादी न लागता स्वत:वर खर्च करतील. आपल्या आयुष्याचा आढावा घेतील. त्याचं विश्लेषण करतील. आपल्याला पुढील आयुष्यात काय हवंय याचा विचार करतील.'
'टूडे' मधील लेखानुसार, बॉयसोबर हे लैंगिक संबंधाकडं सकारत्मकतेनं पाहणारं जनरेशन झेडचं व्हर्जन आहे. रोमँटिक रिलेशनशिपमध्ये स्वत:वरही प्रेम केलं पाहिजे हा जुना विचार सांगणारं हे तत्वज्ञान आहे.
बॉयसोबर म्हणजे ब्रह्मचर्य नव्हे
बॉयसोबर ही संकल्पना ब्रह्मचर्यपेक्षा वेगळी आहे, असं वुडार्डनं स्पष्ट केलंय. तुम्ही लैंगिक संंबंध ठेवत नसाल तर तुम्ही खूप प्रेमळ आणि आदरणीय आहात असा खोटा विश्वास मला कुणालाही द्यायचा नाही. हा एक ब्रेक घेण्याचा प्रकार आहे. त्यामध्ये तुम्ही कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाच्या परवानगीशिवाय तुम्ही तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी निश्चित करु शकता, असं तिनं स्पष्ट केलं.