Mutah Nikah : लग्नाचं नाव ऐकल्यावर आपल्या मनात प्रेम, सोबत आणि सात जन्माच्या गाठी असे शब्द येतात. पण जर लग्न फक्त 2-4-10 किंवा 15 दिवसांसाठी असेल आणि तेही केवळ पैशांसाठी, तर तुम्ही त्याला काय म्हणाल? आज आम्ही तुम्हाला अशा एका देशाबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्हाला फक्त 15 दिवसांसाठी बायको मिळू शकते.
विशेष म्हणजे, मुलीलाही हे लग्न काही दिवसांसाठीच आहे हे माहीत असते, तरीही ती आनंदाने यात सहभागी होते. या लग्नासाठी आनंदाने होकार देण्याचं कारण आहे पैसा. या लग्नाला ‘मुताह निकाह' म्हणतात आणि याला 'प्लेजर मॅरेज' (Pleasure Marriage) असंही एक नाव मिळालं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुताह निकाह म्हणजे काय?
मुताह निकाह किंवा प्लेजर मॅरेज इंडोनेशियातील पुंकाक प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून ही प्रथा वाढली आहे. मुताह निकाह ही एक जुनी इस्लामिक परंपरा आहे जी विशेषतः शिया मुस्लिमांमध्ये प्रचलित आहे. या परंपरेत, मुलगा आणि मुलगी काही निश्चित कालावधीसाठी, जसे की 5 दिवस, 10 दिवस किंवा 15 दिवस, परस्पर संमतीने लग्न करतात.
वेळ पूर्ण होताच लग्नही संपते आणि तेही कोणत्याही वाद किंवा कायदेशीर अडचणीशिवाय. खरं तर, या परंपरेची सुरुवात खूप पूर्वी अरब देशांमध्ये झाली होती. त्यावेळी पुरुष अनेकदा दीर्घकाळ घराबाहेर राहत असत. तेव्हा ते प्रवासात किंवा इतर शहरांमध्ये वेळ घालवण्यासाठी अशा प्रकारची अल्प-मुदतीची लग्ने करत असत.
( नक्की वाचा : ग्रेटर नोएडामध्ये Gay App गँगनं केली आणखी एक शिकार, वाचा कसं विणलं जातंय तरुणांभोवती जाळं )
गरीब महिलांमध्ये वाढता कल
आज ही प्रथा इराण आणि इराकसारख्या शियाबहुल देशांमध्ये मर्यादित स्वरूपात अस्तित्वात आहे. तर इंडोनेशियाने याला एक नवीन रूप दिले आहे आणि आता हे या देशात पूर्णपणे व्यवसायात बदलले आहे. इंडोनेशियामध्ये प्लेजर मॅरेज आता एक उद्योग बनला आहे. पुंकाक प्रदेशात अशा प्रकारच्या लग्नांचा कल वेगाने वाढला आहे. येथील गरीब महिला, विशेषतः तरुण मुली, पैशांच्या बदल्यात परदेशी पर्यटकांशी 5 ते 20 दिवसांचे लग्न करतात.
हे पर्यटक कोण आहेत?
यांपैकी बहुतेक पर्यटक मध्यपूर्वेतील अरब पर्यटक असतात आणि ते येथे येतात. त्यानंतर पर्यटक एजंट्समार्फत 'पत्नी' निवडतात आणि काही दिवसांचे लग्न करून निघून जातात. महिला या काळात त्यांना घरगुती कामांपासून लैंगिक सेवांपर्यंत सर्व काही पुरवतात. या बदल्यात त्यांना 300 ते 500 डॉलर मिळतात. लॉस एंजेलिस टाइम्सच्या अहवालानुसार, काहाया नावाच्या एका इंडोनेशियन मुलीने 28 वर्षांच्या होईपर्यंत 15 पेक्षा जास्त अशी लग्ने केली आहेत. पहिल्यांदा ती मुताह निकाहमध्ये गेली तेव्हा तिचे वय फक्त 13 वर्षे होते. तिच्या आजी-आजोबांनी तिला जबरदस्तीने या लग्नासाठी पाठवले होते.
मोठी आर्थिक कमाई
आज ती आपल्या मुलीचा खर्चही अशाच 'लग्नां'मधून भागवते. पण तिचे सत्य तिच्या कुटुंबाला माहीत नाही. ती म्हणते की जर तिने एखाद्या कारखान्यात काम केले असते तर तिला मुश्किलने 50 डॉलर मिळाले असते, तर अशा लग्नामुळे तिला 10 पट जास्त पैसे मिळतात. आता हे लग्न इतका मोठा व्यवसाय बनले आहे की एजंट्स महिन्यात 20-25 लग्ने ठरवतात. रिसॉर्ट्समध्ये व्यवस्थित ‘हायलँड प्लेजर पॅकेज' सारख्या सेवा उपलब्ध आहेत. येथे पर्यटकांना मुली मिळतात, त्यांची लग्न होतात, पण काही काळानंतर सर्व काही संपून जाते.
महिलांचे शोषण
या सर्वांमागील सत्य खूप कटू आहे. हे दिसायला 'लग्न' आहे आणि एखाद्या करारासारखे दिसते. पण प्रत्यक्षात यात महिलांचे शोषणही होत आहे. त्यांना सुरक्षा नाही आणि कोणतेही अधिकारही मिळालेले नाहीत. या लग्नामध्ये कुठेतरी गरीब आणि हतबल महिलांचे दुःखही दडलेले आहे.