Sleep Divorce in Couples : सध्या तरुणांसमोर सर्व जगाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे. जगभरात लोकप्रिय होत असलेले ड्रेंड फॉलो करण्यावर तरुणांचा भर असतो. ते त्यांच्या रिलेशनशिपमध्येही (Relationship ) वेगवेगळे प्रयोग करत असतात. सध्या जोडप्यांमध्ये स्लीप डिव्होर्स (Sleep divorce) हा शब्द प्रचलित आहे. काय आहे स्लीप डिव्होर्स? त्याचा रिलेशनशिपवर काय परिणाम (Benefits and Harms of Sleep Divorce) होतो हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे स्लीप डिव्होर्स?
स्लीप डिव्होर्समध्ये लग्न झालेली जोडपी झोपण्यासाठी वेगवेगळी खोली वापरतात. साधरणपणे विवाहित जोडप्यांची बेडरुम एकच असते. पण, इथं नेमकं उलटं आहे. एकत्र झोपल्यानं जोडप्यांमधील संबंध आणि गाढ आणि सदृढ होतात, असं मानलं जातं. पण, स्लीप डिव्होर्स घेतल्यानंतरही जोडप्यांमधील शारीरिक दुरावा त्यांना भावनिकरित्या एकमेकांच्या जवळ आणतो.
का वाढतीय लोकप्रियता?
चांगली झोप हे स्लीप डिव्होर्सचं महत्त्वाचं कारण आहे. सध्या अनेक ठिकाणी नवरा-बायको दोघंही नोकरी किंवा व्यवसाय करत असतात. त्यांना कामाच्या ठिकाणी मोठा तणाव सहन करावा लागतो. त्यामुळे विश्रांतीची वेळ मर्यादीत असते. त्यामध्ये नीट झोप झाली नाही तर नंतर त्रास होऊ शकतो.
एका पार्टनरच्या सवयींचा (उदाहरणार्थ : घोरणे, रात्री उशीरापर्यंत मोबाईल पाहणे) दुसऱ्या पार्टनरच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. स्लीप डिव्होर्समध्ये दोन्ही पार्टनरच्या झोपेच्या रुम वेगळ्या असतात. त्यामुळे त्यांना चांगली आणि पुरेशी झोप मिळते.
( नक्की वाचा : अभिषेक-ऐश्वर्यामुळे चर्चेत आलेला Grey Divorce प्रकार काय आहे? तो का घेतला जातो? )
आरोग्याच्या अडचणी
काही जणांच्या तब्येतीच्या प्रश्न असतात. त्यांना रात्री अनेकदा उठावं लागतं. त्यामुळे त्याच्या पार्टनरची झोप मोडू शकते. या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी स्लीप डिव्होर्स घेतला जातो.
पर्सनल स्पेस
सध्या प्रत्येकालाच पर्सनल स्पेस हवी असते. झोपण्याची रुम वेगळी असेल तर जोडप्यांना पर्सनल स्पेस मिळते. वेगळी रुम असेल तर त्यांना स्वत:साठी वेळ काढण्यात त्रास होत नाही.
तणाव कमी
रोजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक ताण-तणाव असतात. एखादा पार्टनर तणावग्रस्त असेल तर त्याचा परिणाम दुसऱ्यावरही पडतो. झोपण्यासाठी वेगळी रुम असेल तर हा परिणाम कमी होतो, असं मत व्यक्त केलं जातं.
स्लीप डिव्होर्सचा तोटा
भावनिक दुरावा
स्लीप डिव्होर्समध्ये पर्सनल स्पेस मिळतो. पण, त्यामुळे कधी-कधी जोडप्यांमध्ये भावनिक दुरावा निर्माण होण्याचा धोका देखील यामध्ये आहे.
इंटिमेसीत कमतरता
स्लीप डिव्होर्समुळे अनेकदा जोडप्यांमधील इंटिमेसी कमी होण्याचा धोका असतो.
स्पष्टीकरण : लेखातील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. त्याचे अनुकरण करण्यापूर्वी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यावा. NDTV नेटवर्क या बातमीतील कोणत्याही मजकुराची जबाबदारी घेत नाही.