STAR Technology: 'स्टार' तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार ! 'शून्य' शुक्राणू असलेले पुरुषही होणार पालक

Columbia University Fertility Center News: आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आणि उच्च-गती प्रतिमा प्रणालीचा वापर करून दुर्मिळ पेशी (rare cells) ओळखणे आणि त्यांना अत्यंत अचूकपणे वेगळे करणे या STAR पद्धतीमुळे शक्य झाले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

डॉ. हेमंत बब्रुवान सूर्यवंशी

What is Sperm Tracking and Recovery: कोलंबिया युनिव्हर्सिटी फर्टिलिटी सेंटरने (Columbia University Fertility Center) विकसित केलेले STAR (Sperm Tracking and Recovery) हे तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवणारे ठरले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आणि उच्च-गती प्रतिमा प्रणालीचा वापर करून दुर्मिळ पेशी (rare cells) ओळखणे आणि त्यांना अत्यंत अचूकपणे वेगळे करणे या STAR पद्धतीमुळे शक्य झाले आहे.

या नाविन्यपूर्ण पद्धतीमध्ये अवघ्या काही मिनिटांत लाखो प्रतिमा घेतल्या जातात. AI च्या मदतीने योग्य पेशी अचूकपणे ओळखल्या जातात आणि नंतर एका सूक्ष्म मायक्रोफ्लुइडिक चिप (microfluidic chip) आणि रोबोटच्या साहाय्याने त्या पेशी अलगद वेगळ्या केल्या जातात. ही संपूर्ण प्रक्रिया नॉन-इनवेसिव्ह (शरीरात कोणतीही प्रक्रिया न करता), सौम्य आणि अत्यंत अचूक आहे.

Dark Circles Remedies: डार्क सर्कलमुळे तुमचे सौंदर्य बिघडलंय? हा उपाय केल्यास डोळे दिसतील प्रचंड सुंदर

केवळ शुक्राणू नव्हे, इतर वैद्यकीय फायदे

STAR तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ शुक्राणू (Sperm) ओळखण्यासाठीच नव्हे, तर इतरही अनेक महत्त्वाच्या वैद्यकीय क्षेत्रांमध्ये होऊ शकतो. यामध्ये रक्तामध्ये फिरणारे कर्करोगाचे पेशी (circulating cancer cells), भ्रूणातील पेशी (fetal cells), लवकर कर्करोग निदान (early cancer diagnosis) आणि गर्भाची तपासणी (prenatal testing) यांचा समावेश आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञ आणि या तंत्रज्ञानाचे संशोधक डॉ. हेमंत सूर्यवंशी यांच्या मते, “AI हे केवळ तंत्रज्ञान नाही, ते एका नव्या आयुष्याची शक्यता निर्माण करत आहे, विशेषतः अशा जोडप्यांसाठी जे पूर्णपणे आशा सोडून बसले होते.”

अ‍ॅझोस्पर्मिया (Azoospermia) रुग्णांसाठी आशेचा किरण

या तंत्रज्ञानाचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा वापर वंध्यत्व उपचारांमध्ये करण्यात आला आहे. ज्या पुरुषांमध्ये शुक्राणूंचे प्रमाण अत्यल्प असते किंवा आढळतच नाहीत (azoospermia), त्यांच्यासाठी STAR पद्धती आशेचा किरण ठरली आहे. सामान्यतः एका इजाक्युलेशन (ejaculation) मध्ये १०० ते २०० दशलक्ष शुक्राणू असतात. अ‍ॅझोस्पर्मिया असलेल्या पुरुषांसाठी पारंपरिक पद्धतींमध्ये टेस्टीक्युलर सर्जरी (testicular surgery) करून शुक्राणू काढणे किंवा डोनर स्पर्म वापरणे हे मुख्य पर्याय होते. पण, त्याऐवजी ही नवीन पद्धत सुरक्षित, वेगवान आणि परिणामकारक ठरत आहे. अगदी एकच निरोगी शुक्राणू सापडला, तरी तो आयव्हीएफ (IVF) साठी वापरता येतो, ज्यामुळे अनेक कुटुंबांसाठी पालकत्वाचा मार्ग खुला झाला आहे.

Advertisement

Hair Growth Tips: केसांच्या वाढीसाठी कोणते तेल लावावे? हर्बल तेल आणि नारळ तेलात फरक काय?

दोन लक्षवेधी उदाहरणे:

  • एका रुग्णाच्या नमुन्यात, एम्ब्रियोलॉजिस्ट (Embryologists) यांनी दोन दिवस तपासणी करूनही शुक्राणू सापडले नाहीत. परंतु, STAR प्रणालीने त्याच नमुन्यावर प्रक्रिया केल्यावर त्यामधून ४४ शुक्राणू मिळाले.

  • दुसऱ्या एका जोडप्याने १९ वर्षे गर्भधारणेसाठी प्रयत्न केले. अ‍ॅझोस्पर्मियामुळे शक्यता कमी होत्या. STAR प्रणाली वापरून त्यातून ५ शुक्राणू वेगळे करण्यात आले आणि त्यापैकी एकाचा वापर करून गर्भ तयार झाला. सध्या ती महिला ५ महिन्यांची गर्भवती असून गर्भ पूर्णतः निरोगी आहे, ज्यामुळे १९ वर्षांचा प्रवास अखेर यशस्वी झाला आहे.

निष्कर्ष: STAR ही जगातील एकमेव तंत्रज्ञान प्रणाली आहे जी अ‍ॅझोस्पर्मिया असलेल्या पुरुषांमध्ये शुक्राणू शोधून त्यांचा IVF साठी उपयोग करते. हे तंत्रज्ञान हजारो कुटुंबांसाठी आशेचे नवीन दार उघडणारी वैद्यकीय क्रांती आहे.