
Dark Circles Remedies: डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांमुळे तुमचे सौंदर्य बिघडलंय का? डार्क सर्कल कमी होत नसल्याने तुम्हाला आणखी टेंशन आलंय का? अपुरी झोप, ताणतणाव, अयोग्य लाइफस्टाइल यासह अन्य कारणांमुळे चेहऱ्यावर थकवा जाणवतो आणि अकाली म्हातारेपण दिसू लागते. या समस्येवर उपाय म्हणून महिलावर्गसह पुरुष देखील महागड्या क्रीमची मदत घेतात. पण इतका पैसा खर्च करण्याची आवश्यकता नाही. महागड्या ब्युटी ट्रीटमेंटऐवजी तुम्ही किचनमधील काही सामग्रींचा वापर करू शकता. योगगुरु कैलाश बिश्नोई यांनी सांगितलेले घरगुती उपाय जाणून घेऊया...
डार्क सर्कलची समस्या (Dark circles)
डार्क सर्कलची समस्या अतिशय सामान्य आहे. रात्री उशीरापर्यंत मोबाइलचा वापर करणे, पुरेशा प्रमाणात झोप न घेणे, वाढता ताणतणाव यासारख्या कारणांमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळ दिसू लागतात. तुम्ही देखील डार्क सर्कलच्या समस्येमुळे (How To Remove Dark Circles) त्रस्त आहात का? तर महागड्या क्रीमचा वापर करण्याऐवजी सोपे आणि प्रभावी रामबाण उपाय जाणून घेऊया...
डार्क सर्कल समस्येमागील कारणं (Common Causes of Dark Circles)
- अपुरी झोप
- वाढते वय
- आनुवंशिक (कुटुंबाशी संबंधित समस्या)
- अॅलर्जी आणि डिहायड्रेशन
- मोबाइल, लॅपटॉपचा अति वापर करणे
- जास्त वेळ उन्हाच्या संपर्कात येणे

योगगुरू कैलाश बिश्नोई यांनी सांगितलेला उपाय (Home Remedy By Yoga Guru)
योगगुरू कैलाश बिश्नोई यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये डार्क सर्कलशी संबंधित उपाय सांगितला आहे. विशेष म्हणजे डार्क सर्कल कमी करण्यासाठी किचनमधील सामग्रींचा वापर करावा लागणार आहे.
(नक्की वाचा: Dark Circle Treatment: डार्क सर्कल कमी करण्यासाठी बटाट्यामुळे कशी मिळेल मदत?)
डार्क सर्कल समस्येवरील उपाय (Natural Dark Circle Hack)
सामग्री
- कच्चे दूध
- हळद
- मध
- कॉफी पावडर
(नक्की वाचा: Dark Circles Remedy: डार्क सर्कल कमी करण्यासाठी उपाय?)
डार्क सर्कल कमी करण्यासाठी पेस्ट कशी तयार करावी (Under Eye Treatment)
- एका वाटीमध्ये कच्चे दूध घ्या.
- त्यामध्ये हळद, मध, कॉफी पावडर मिक्स करुन पेस्ट तयार करा.
- पेस्ट डोळ्यांखाली लावावी.
- 10 मिनिटांनंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करावी.
- आठवड्यातून दोनदा हा उपाय करू शकता.
घरगुती उपाय केल्यास कोणते फायदे मिळतील? (Benefits of Ingredients For Eyes)
- कच्चे दूध : त्वचा हायड्रेट राहण्यास मदत मिळेल आणि त्वचेला पोषणतत्त्वांचा पुरवठा मिळेल.
- हळद: अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे सूज आणि त्वचेचा काळेपणा दूर होईल.
- मध : त्वचेला मॉइश्चराइझर मिळेल आणि त्वचा मऊ होण्यास मदत मिळेल.
- कॉफी पावडर : डोळ्यांच्या भागातील रक्ताभिसरण प्रक्रिया वाढेल आणि यामुळे काळी वर्तुळं कमी होण्यास मदत मिळेल.
नैसर्गिक आणि रामबाण उपाय (Under Eye Remedy)
- डार्क सर्कलसाठीचा हा उपाय पूर्णतः नैसर्गिक आहे.
- यामुळे डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांची समस्या दूर होण्यास मदत मिळेल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world