Akshaya Tritiya 2026 : अक्षय तृतीया कोणत्या देवी-देवतांच्या पुजेसाठी समर्पित आहे?अक्षय तृतीयाच्या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ का असतं?या वर्षी अक्षय तृतीया केव्हा आहे? सोनं खरेदी करण्याचा मुहूर्त कोणता आहे?असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील, मग जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती. हिंदू धर्मात वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीस अक्षय तृतीया किंवा आखा तीज असं म्हटलं जातं.या शुभ दिनी केलेली कोणतीही पूजा, जप‑तप,उपवास कधीही व्यर्थ जात नाही. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी अनेक लाभ मिळतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीहरी आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते. तसच सोने खरेदी करण्यालाही विशेष महत्त्व देण्यात आलं आहे.
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार,सोनं हे भगवान सूर्य नारायण यांच्या सकारात्मक ऊर्जेशी तसेच देवगुरु बृहस्पती यांच्याशी संबंधित मानले जाते. तसच ते जीवनात सुख‑सौभाग्याचे प्रतीकही मानलं जातं. या दिवशी बाजारातून सोने आणल्याने संपूर्ण वर्षभर धनदेवीची कृपा राहते.अक्षय तृतीया एक शुभ मुहूर्त मानला जातो. जो इतका शुभ असतो की या दिवशी कोणत्याही नव्या कार्याची सुरूवात करणे किंवा एखाद्या योजनेत धनाची गुंतवणूक करणे अत्यंत लाभदायक ठरते.
अक्षय तृतीयाला पूजेचा शुभ मुहूर्त
अक्षय तृतीयाला भगवान विष्णु आणि माता लक्ष्मीच्या पूजेसाठी सर्वात उत्तम मुहूर्त 19 एप्रिल 2026 रोजी आहे.रविवारी पहाटे 10.49 पासून दुपारी 12.30 पर्यंत राहील. सोन्याच्या खरेदीचा पहिली शुभ वेळ : 19 एप्रिल 2026 च्या सकाळी 10.49 वाजल्यापासून 20 एप्रिल 2026 ला पहाटे 5.51 वाजेपर्यंत
अक्षय तृतीयाला सोनं खरेदी करण्याचा दुसरा शुभ मुहूर्त
जर तुम्हाला 20 एप्रिल 2026 च्या सकाळी सोनं खरेदी करायचं असेल,तेव्हा या दिवशी पहाटे 05.51 पासून 7.27 दरम्यान सोनं खरेदी करणं शुभ राहील.
सोनं खरेदी करण्याचे शुभ मुहूर्त
- 19 एप्रिलला दुपारी 01:58 पासून 03:35 पर्यंत
- 19 एप्रिल रोजी संध्याकाळी 06:49 पासून 10.57 पर्यंत.
- 20 एप्रिल रोजी दुपारी 01:43 ते 03:05 पर्यंत
- 20 एप्रिलला सकाळी 04:28 ते 05:51 पर्यंत
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world