Benefits of eating pomegranate : सुदृढ आरोग्यासाठी फळांचं सेवन अत्यंत आवश्यक मानलं जातं. विविध फळां विविध समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतात. सोबतच यातील पोषक तत्वांमुळे शरीर आरोग्यदायी ठेवण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला डाळिंबाबद्दल सांगणार आहोत. डाळिंब खायला चविष्ठ लागतं, याशिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं. यामध्ये विटॅमिन सी, के, फोलेट (बी९), पोटॅशियम, फायबर, अँटीऑक्सिडेंट, आर्यन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, झिंक आणि विटॅमिन ए, बी सारखे अनेक आवश्यक पोषक तत्व असतात. आपण डाळिंबाच्या वरील साल काढून टाकतो आणि त्यातील दाणे खातो. मात्र डाळिंब खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत आहे का? डॉ. सुभाष गोयल यांनी एका पॉडकास्टमधये त्यांनी डाळिंब खाण्याची योग्य पद्धत सांगितलं, आणि फायदेही सांगितलं.
डाळिंब कसं खाल, जाणून घेऊया...
डॉ. सुभाष गोयल यांनी सांगितलं, डाळिंब खाण्यापूर्वी एका पातेल्यात पाणी चांगलं उकळून घ्यावं. यानंतर उकळतं पाणी गॅसवरुन खाली उतरून घ्या. आता या गरम गरम पाण्यात एक डाळिंब टाका आणि पाणी थंड झाल्यानंतर ते बाहेर काढून घ्या. यामुळे डाळिंबाला पाण्याची वाफ मिळेल. थोडेसे शिजलेले डाळिंबाचे दाणे खाल्ल्याने ब्रेन, हॉर्ट, लिव्हर हेल्दी राहील. चिडचिड दूर होईल आणि मेंदूला तातडीची एनर्जी मिळेल.
डाळिंब खाण्याचे फायदे....
रक्ताची कमतरता भासत नाही...
ज्या लोकांना चक्कर येणे, शरीरात रक्ताची कमतरता जाणवते, त्यांनी नियमित आहारात डाळिंबाचा समावेश करावा. डाळिंबात मोठ्या संख्येने आर्यन असतं, ज्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते. याच्या सेवनामुळे शरीरातील रक्ताभिसरण चांगलं होतं आणि रक्तशुद्धी होते.
हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं..
हृदयासंबंधित आजारांपासून लांब राहण्यासाठी डाळिंबाचं सेवन करू शकता. यातील अँटीऑक्सिडेंट आणि फायबर शरीरातील बॅड कॉलेस्ट्रोल कमी करते आणि हृदयाचं आरोग्य सुधारतं.
पचनक्रिया सुधारते...
डाळिंबात फायबर मुबलक प्रमाणात असतं. याच्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठता, गॅस, अॅसिडिटीसारख्या पोटाच्या समस्या दूर होतात.
रोगप्रतिकारकशक्ती वाढते...
डाळिंबात मोठ्या प्रमाणात विटॅमिन असतं. जे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यात मदत करते. जर तुम्हाला वारंवार सिजनल आजारांचा सामना करावा लागत असेल तर डाळिंबाचं सेवन सुरू करा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि तुम्ही वारंवार आजारी पडणार नाही.