फिटनेस कोच आणि आरोग्य तज्ञ आजकाल वारंवार लोकांना केवळ वजन पाहून आरोग्याचे मूल्यांकन करणे चुकीचे असल्याची चेतावणी देत आहेत. एका फिटनेस कोचने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये व्हिसरल फॅट (Visceral Fat) म्हणजेच अंतर्गत अवयवांभोवती जमा होणारी चरबी किती घातक आहे आणि ती बारीक व कमी वजनाच्या लोकांनाही जाड लोकांसारखेच अनहेल्दी कसे बनवू शकते, याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
व्हिसरल फॅट म्हणजे काय? | What is visceral fat?
व्हिसरल फॅट ही ती चरबी आहे जी आपल्या यकृत , किडनी, आतडे आणि हृदय यांसारख्या महत्वाच्या अवयवांभोवती जमा होते. ही चरबी बाहेरून दिसत नाही, पण शरीराच्या आत गंभीर नुकसान करते. हे फॅट हार्मोनल असंतुलन निर्माण करते, ज्यामुळे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल बिघडते. यामुळे शरीरात सतत सूज येण्याची स्थिती निर्माण होते. ज्यामुळे धमन्या कमकुवत आणि अरुंद होतात. यामुळे रक्त गोठून हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचे थेट कारण बनू शकते.
बारीक लोकही अनहेल्दी का?
फिटनेस कोचने स्पष्ट केले की, अनेक लोक बारीक दिसतात आणि स्वतःला निरोगी मानतात. पण सत्य हे आहे की बारीक लोकांमध्येही व्हिसरल फॅट जास्त असू शकते. बाहेरून सडपातळ दिसणाऱ्या लोकांच्या शरीरात आतल्या बाजूला चरबी जमा होऊ शकते. अशा लोकांमध्ये ब्लड शुगर, रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल असामान्य असू शकतात. हीच लपलेली चरबी त्यांच्या धमन्यांवर परिणाम करते आणि हृदयविकाराचा धोका वाढवते.
सूज आणि क्लॉटिंगचा धोका
व्हिसरल फॅट शरीरात क्रॉनिक इन्फ्लेमेशन म्हणजेच दीर्घकाळ टिकणारी सूज निर्माण करते. ही सूज हळूहळू धमन्यांच्या भिंतींना (Artery Walls) नुकसान पोहोचवते. जेव्हा धमन्या कमकुवत होतात, तेव्हा त्यामध्ये प्लॅक जमा होऊ लागते. प्लॅकमुळे रक्ताचा प्रवाह थांबतो. शरीरात रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरू होते. हेच क्लॉट्स अचानक हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचे कारण बनू शकतात.
व्हिसरल फॅटपासून बचावाचे उपाय
व्हिसरल फॅट एक सायलेंट किलर आहे. केवळ बाहेरून बारीक दिसणे नव्हे, तर आतून निरोगी राहणे हेच खरे फिटनेस आहे.
- नियमित व्यायाम : कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग व्हिसरल फॅट कमी करण्यास मदत करतात.
- समतोल आहार : प्रक्रिया केलेले अन्न आणि साखर टाळा; फायबर आणि प्रोटीनचा आहारात समावेश करा.
- तणाव आणि झोप : पुरेशी झोप आणि स्ट्रेस मॅनेजमेंट अत्यंत आवश्यक आहे.
- नियमित तपासणी : केवळ वजन नव्हे, तर कंबरेचा घेर आणि रक्त तपासणी नियमितपणे करा.