Tea : चहा प्यायल्याने अ‍ॅसिडिटी का होते? त्रासापासून कसा बचाव कराल? हे 4 उपाय करून पाहाच

चहा आवडतो, मात्र होणाऱ्या त्रासांकडे दुर्लक्ष करता येत नाही, काय आहेत उपाययोजना? (does drinking tea cause gas in stomach)

जाहिरात
Read Time: 2 mins

Tea Acidity Remedy: अनेकांची दिवसाची सुरुवात कडक चहाचा घोट घेत होते. मात्र अनेकांना या चहाच्या घोटासह जळजळ, जडत्व आणि अॅसिडिटीचा सामना करावा लागतो. अनेकदा रिकाम्या पोटी खूप कडक आणि घाईघाईने चहा प्यायलात तर हा त्रास जाणवतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये सुभाष गोयल यांनी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. काही छोटे बदल करून तुम्ही चहाची मजा घेऊ शकता. यातून तु्म्हाला अॅसिडिटीही होणार नाही. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चहा पिण्यापूर्वी फक्त दोन घोट पाणी प्यायल्याने पोट शांत राहते आणि अ‍ॅसिडिटीची शक्यता कमी होते.

चहा प्यायल्यामुळे होणारी अॅसिडिटी कशी दूर कराल? (How to get rid of acidity after drinking tea)

1. चहा पिण्यापूर्वी पाणी प्या... (Drink Two Sips of Water Before Tea)

डॉ. सुभाष गोयल यांच्या व्हायरल व्हिडिओनुसार, चहा पिण्याच्या पूर्वी थोडं पाणी प्यावं, यामुळे पोटातील अॅसिडिटी नियंत्रणात राहते. यामध्ये गॅस्ट्रिक वॉल शांत होते आणि चहाच्या परिणाम संतुलित राहतो. यानंतर तुम्ही बिस्कीट, रस्क किंवा हलका स्नॅक खाऊ शकता. अॅसिडिटीची शक्यता कमी असते.

Photo Credit: Canva

2. सकाळी उठताच चहा पिऊ नये  (Avoid Tea Right After Waking Up)

सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने अॅसिड अधिक वाढतं. यामुळे गॅस, जडत्व जाणवू लागतं. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आधी एक ते दोन ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे पोटातील अॅसिडची पातळी नैसर्गिकपणे कमी राखली जाते. यानंतर आपल्या चहाचा आनंद घ्या. 

3. कडक चहा नको, चहासोबत हलके पदार्थ आवश्यक (Avoid Strong Tea and Add Light Snacks)

कडक चहामुळे पोटातील आम्ल वाढते. कमी दुधाचा  सौम्य चहा पिणं कधीही चांगलं. कधीही फक्त चहा पिऊ नका. नेहमीच चहासोबत काहीतरी हलके पदार्थ खावेत. यामध्ये भाजलेले शेंगदाणे, रस्क, कुरमुरे किंवा साखर नसलेलं बिस्कीट याचा समावेश करू शकता. या पदार्थांमुळे चहाचे दुष्परिणाम कमी होतात. 

Advertisement

4. आलं, वेलची आणि बडीशेपची जादू (Ginger, Cardamom and Fennel Magic)

आलं आणि वेलचीमुळे चहाचा फ्लेवर वाढत नाही तर पचनक्षमता वाढते. यामुळे गॅस आणि अॅसिडिटी कमी करायला मदत होते. चहा प्यायल्यानंतरही तुम्हाला जळजळ होत असेल तर थोडी बडीशेप खा. यामुळे पोट शांत होईल. चहा प्यायल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये. यामध्ये १५ ते २० मिनिटांचं अंतर ठेवा.  

Topics mentioned in this article