घाईघाईत चुकीच्या व्यक्तीला UPI पेमेंट, काय कराल? वारंवार फोन करण्यापेक्षा करा एक काम, पैसे राहतील सुरक्षित!

Wrong UPI Payment: अनेकदा घाईघाईत चुकीचा मोबाइल नंबर किंवा UPI ID दाखल केल्यानं पैसे तिसऱ्याच व्यक्तीला पोहोचतात. अशा स्थितीत अधिकांश लोक घाबरुन जातात

जाहिरात
Read Time: 2 mins

Wrong UPI Payment : आज डिजिटलच्या युगात अधिकांश लोक UPI मधून पेमेंट करतात. युपीआयच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करणं सोपं जातं. मात्र यादरम्यान एक छोटीशी चूकही महागात पडू शकते. अनेकदा घाईघाईत चुकीचा मोबाइल नंबर किंवा UPI ID दाखल केल्यानं पैसे तिसऱ्याच व्यक्तीला पोहोचतात. अशा स्थितीत अधिकांश लोक घाबरुन जातात आणि समोरच्या व्यक्तीला वारंवार फोन करतात. यातून अनेकदा पैसे मिळत नाहीत आणि वादही होतात. जर तुमच्याकडून अशी चूक झाली तर घाबरू नका. तर काही महत्त्वाचं पाऊल उचला ज्यामुळे तुमचे पैसे सुरक्षित राहतील. 

नुकताच राजस्थान पोलिसांच्या अधिकृत X हँडलवरुन एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे आणि अशा स्थितीत काय करायला हवं याबाबत सूचना दिल्या आहेत. 

Advertisement

UPI मधून चुकीचा आर्थिक व्यवहार झाला तर काय कराल?

  • सर्वात आधी आर्थिक व्यवहार आणि UTR म्हणजे ट्रान्झॅक्शन आयडीचा स्क्रीनशॉट घ्या. 
  • या स्क्रीनशॉटमध्ये तारीख, वेळ आणि पेमेंटची किंमत स्पष्ट दिसायला हवी
  • यानंतर १९३० (सायबर सेल) वर डाएल करा आणि आपली तक्रार दाखल करा.
  • ज्या अॅपवरुन तुम्ही पेमेंट केला आहे, तेथे Help or Support पर्याय निवडा.
  • या पर्यायातून तुम्ही Wrong UPI Transfer ची तक्रार करा. 
  • या संपूर्ण प्रक्रियेतून तुमचे पैसे सुरक्षित राहतील.

सायबर फसवणूक झाली तर काय कराल?

याव्यतिरिक्तही तुमच्यासोबत कोणत्याही प्रकारची सायबर फसवणूक झाली तर तातडीने http://cybercrime.gov.in वर तक्रार करा. याशिवाय तुम्ही जवळील पोलीस ठाण्यात तक्रार करू शकता. 


काय काळजी घ्याल?

अनेकदा अशी वेळ येते जेव्हा लवकर पेमेंट करावा लागतो. उदाहरणार्थ फ्लॅश सेलदरम्यान किंवा कुठे जाण्यास उशीर होत असेल तरी घाईगडबड न करता सावधान राहायला हवं. अशा वेळी QR कोड स्कॅन करून पेमेंट करा. युपीआयवरुन पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी प्राप्तकर्त्याचं नाव निश्चित करून घ्या. तर मोबाइल क्रमांकावरुन पैसे पाठवणार असाल तर नंबर व्यवस्थित तपासून घ्या आणि त्यानंतरच पैसे ट्रान्सफर करा. 
 


 

Topics mentioned in this article