मृत्यूपूर्वी येतात 'अशी' स्वप्नं...; खरंच कोणी न्यायला येतं का? शास्त्रज्ञांचा अंगावर काटा आणणारा अहवाल

मृत्यूपूर्वी खरंच कोणी आपल्याला घेऊन जायला येतं का? की तो पांढरा घोडा आणि प्रकाश हा केवळ मेंदुचा खेळ आहे?

जाहिरात
Read Time: 2 mins

Death Dreams Study: मृत्यू...एक असं सत्य ज्याची सर्वांनाच भीती वाटते. मात्र प्रत्येकासाठी मृत्यू अटळ आहे. मात्र एखादी व्यक्ती शेवटच्या घटका मोजत असताना तिच्या बंद डोळ्यांच्या मागे काय सुरू असतं? इटलीच्या IRCCS (Reggio Emilia) ने २३९  तज्ज्ञांशी बोलून एक असा अहवाल तयार केला जो वाचून तुमच्या अंगावर काटा उभा राहील. याला पुस्तकी भाषेत  'अँड ऑफ लाइफ ड्रीम्स' (End-of-Life Dreams)' म्हटलं जातं. 

जुन्या आठवणी आणि तो चमकणारा दरवाजा (dreams before death)

या संशोधनानुसार, मृत्यूवेळी माणसाला त्याच्या जवळच्या व्यक्ती दिसतात ज्यांचा आधीच मृत्यू झाला आहे. कोणाला आपला जुना मित्र आठवतो, तर कुणाला आपल्या आईची कुस. एका रुग्णाने सांगितलं की, तिला तिचा दिवंगत पती हाक मारत होता, ये, मी तुझी वाट पाहत आहे. ही स्वप्न घाबरवणारी नाहीत, उलटपक्षी ते जखमांवर फुंकर घालण्यासारखे असतात. ज्यामुळे त्या व्यक्तीला वाटतं की पुढचा मार्ग एकट्याने नसेल. इतकच नाही तर काहींना लखलखीत दिवे, उंच पायऱ्या किंवा अगदी उघडे दरवाजे दिसतात. 

Advertisement

नक्की वाचा - इस्लाममध्ये पैगंबर मोहम्मद यांचं चित्र काढण्यास मनाई का? फोटो का दाखवला जात नाही? कुराणमध्ये काय म्हटलंय?

पांढरा घोडा अन्.... (End of life dreams visions)

हे केवळ स्वप्नांबद्दल नाही तर संशोधनानुसार, काही लोकांना खूप चांगलं दृश्य दिसतं. ज्यामध्ये समुद्र किनाऱ्यावर धावणारा पांढरा घोडा किंवा ढगांनी आच्छादलेलं आकाश. पण चित्राची दुसरी बाजू थोडी भीतीदायक असते. काही लोकांना भीतीदायक दृश्य दिसतात. काही जाणकारांनुसार, हे आपल्या आतील लपलेली भीती किंवा अपूर्ण स्वप्न असतात, जे शेवटच्या क्षणी खलनायक होऊन आपल्या समोर येतात. 


मृत्यूवेळी डोळे काय सांगतात? (Science of dying dreams)

अनेकजण या स्वप्नांबाबत बोलत नाही. लोकांना कदाचित हे सर्व विचित्र वाटेल. पण प्रत्यक्षात, ही स्वप्ने मानवजातीने मृत्यूला कितपत स्वीकारले आहे हे उघड करतात. जर स्वप्ने शांततापूर्ण असतील, तर निरोप घेणं सोपं जातं. मृत्यू एक गूढ आहे, आणि ही स्वप्ने त्या गुढाचे छोटे संकेत देतात. विज्ञान म्हणतं की, हे तणाव आणि आठवणींचे मिश्रण आहे, पण श्रद्धाळू लोक याला एक आध्यात्मिक आवाहन म्हणतात.

(वरील माहिती सोशल मीडियावरील व्हायरल वृत्तांच्या आधारावर देण्यात आली आहे. NDTV मराठी याचा दावा आणि पुष्टी करीत नाही)