व्हॉट्सॲप (WhatsApp) आपल्या प्लॅटफॉर्मवर सतत नवीन फीचर्स आणि अपडेट आणत असते. आता याच प्रक्रियेत कंपनीने 8 सप्टेंबर 2026 पासून जुन्या ऑपरेटिंग सिस्टमला दिलेला सपोर्ट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही जर जुन्या अँड्रॉइड स्मार्टफोनचा वापर करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
कोणत्या फोन्सवर व्हॉट्सॲप बंद होणार?
'WABetainfo' च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲप आता 'अँड्रॉइड 6.0' पेक्षा जुन्या व्हर्जन्सवर काम करणे बंद करेल. ज्या फोन्समध्ये अँड्रॉइड 5.0 किंवा 5.1 ऑपरेटिंग सिस्टम आहे, त्या फोन्सवर आता व्हॉट्सॲपचे नवीन अपडेट्स मिळणार नाहीत आणि ॲप काम करणे बंद करेल. आयफोन युजर्ससाठी मात्र आनंदाची बातमी आहे. या निर्णयाचा आयफोन (iOS) युजर्सवर कोणताही परिणाम होणार नाही.
तुमचा फोन कसा तपासावा?
- फोनच्या Settings मध्ये जा.
- System किंवा About Phone पर्यायावर क्लिक करा.
- System Update किंवा Android Version तपासा.
- जर तिथे 6.0 पेक्षा कमी व्हर्जन दिसत असेल, तर तुम्हाला लवकरच फोन बदलावा लागेल.
(नक्की वाचा- Chandrapur News: चंद्रपूर हादरलं! मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर रुग्णांसोबत भयंकर घडलं; रुग्णालय सील)
चॅट्सचा बॅकअप कसा घ्यावा?
- व्हॉट्सॲप Settings मध्ये जा.
- Chat* पर्यायावर क्लिक करा.
- Chat Backup निवडा आणि Back Up Now बटण दाबा. यामुळे तुमचे फोटो आणि मेसेजेस क्लाउडवर सुरक्षित राहतील.
व्हॉट्सॲपच्या आगामी फीचर्समध्ये 'नोटिफिकेशन बबल्स' आणि अधिक अॅडव्हान्स सिक्युरिटी सिस्टमचा समावेश आहे. जुन्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये या नवीन फीचर्सना सपोर्ट करण्याची तांत्रिक क्षमता नसल्याने, कंपनीने हा निर्णय घेतला आहे. तंत्रज्ञानाच्या युगात सुरक्षेच्या दृष्टीने ॲप अपडेट ठेवणे आवश्यक आहे, त्यामुळे युजर्सनी नवीन व्हर्जनच्या स्मार्टफोनवर शिफ्ट होणे हिताचे ठरेल.