Best Winter Trekking Destinations : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक लोक मोठ्या पार्ट्यांचे आयोजन करतात. पण नवीन वर्षाची सुरुवातही धमाकेदार करण्यासाठी काही लोकांनी आधीपासून तयारी केलेली असते. नवीन वर्षात अनेकांना डोंगर माथ्यावर फिरायला जाणं आवडतं, तर काहींना समुद्राच्या लाटांजवळ मनमुराद आनंद लुटावासं वाटतं. पण काही जण असेही असतात, ज्यांना ट्रेकिंगचं फारच वेड असतं. त्यामुळे ही माणसं नवीन वर्षाची सुरवात ट्रेकिंगने करतात. प्रत्येक जण नवीन वर्षासाठी वेगवेगळे प्लॅन करण्याच्या तयारीत असेल, पण भारतात कोणते असे जबदरस्त ट्रेकिंग स्पॉट्स आहे, जिथे हे लोक ट्रेकिंगचा आनंद लुटू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
पांढऱ्या बर्फाने झाकलेली शिखरं, गोठलेले तलाव आणि थंड हवा..
भारतातील हे सर्वोत्तम ट्रेकिंग स्पॉट्स (Trekking Destination) तुमच्यासाठी अप्रतिम अनुभव ठरू शकतात. खरंतर, नवीन वर्षाच्या काळात हवामान थंड असते आणि हिवाळ्यात डोंगरांवर सौंदर्याची चादरच पसरते. तसच डोंगरांवर पांढऱ्या बर्फाने झाकलेली शिखरं, गोठलेले तलाव आणि थंड ताज्या हवेमुळं मन तर प्रसन्न होतंच पण मेंदूलाही चालना मिळते. भारतातील सर्वात सुंदर हिवाळी ट्रेकिंग स्पॉट्स (Winter Trekking Destination) कुठे आहेत? याबाबत आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.
नक्की वाचा >> लेक रात्री 2 वाजता ढसाढसा रडत होती, बापाने केलं असं काही..व्हिडीओ पाहून सर्वच आई-वडिलांचे डोळे पाणावतील!
1) पराशर लेक ट्रेक
हिमाचल प्रदेशात असलेला पराशर लेक ट्रेक नवीन वर्षात साहस करण्यासाठी एक अप्रतिम ठिकाण ठरू शकतो. हा एक सोपा आणि लोकप्रिय ट्रेक आहे, जो शांत आणि सुंदर निसर्गदृश्यांसाठी ओळखला जातो. बर्फवृष्टीच्या काळात हा ट्रेक आणखी मोहक दिसतो.
2) केदारकांठा ट्रेक
केदारकांठा ट्रेक उत्तराखंडमध्ये स्थित आहे. हा मध्यम स्तराचा ट्रेक आहे आणि त्याच्या मार्गावर गंगोत्री आणि यमुनोत्री सारख्या पर्वतांचे अप्रतिम दृश्य दिसते. येथे बर्फाने झाकलेली शिखरे आणि डोंगरांचे सुंदर नजारे पाहायला मिळतात. नवीन वर्षात साहस करण्यासाठी हे ठिकाण अत्यंत अप्रतिम आहे.
नक्की वाचा >> ग्राहकांची मज्जाच मज्जा! आता Maruti Fronx वर मिळणार वर्षभरातील सर्वात मोठं डिस्काऊंट, किंमत वाचून खुश व्हाल
3) चादर ट्रेक
चादर ट्रेक लडाखमध्ये स्थित आहे. हा एक अत्यंत आव्हानात्मक ट्रेक आहे, जिथे तुम्हाला गोठलेल्या झंस्कार नदीवर चालावे लागते. हा ट्रेक त्या लोकांसाठी आहे, ज्यांना साहसाची आवड आहे आणि एक संस्मरणीय अनुभव हवा आहे.