Father-Daughter Viral Video : वैद्यकीय शिक्षण हे जगातील सर्वात कठीण अभ्यासक्रमांपैकी एक मानले जाते. असंख्य पुस्तके, परीक्षेचा ताण आणि भविष्याची चिंता...अनेकदा मुले या ओझ्याखाली दबून जातात. पण जर वडिलांचा हात डोक्यावर असेल, तर मोठ्यातली मोठी अडचण सोपी होते. सोशल मीडियावर एक असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एका वडिलांनी रात्री दोन वाजता आपल्या रडणाऱ्या मुलीला जे सांगितले, ते प्रत्येक पालकांनी ऐकायला हवे, विशेषत: ज्यांची मुले नैराश्य किंवा तणावाला सामोरे जात आहेत.
व्हिडीओत पाहू शकता की, एक मुलगी, जी वैद्यकीय शिक्षण घेत आहे, रात्री दोन वाजता आपल्या वडिलांना फोन करते. अभ्यासाच्या ताणामुळे ती इतकी घाबरलेली असते की तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा सुरु होतात. अशा परिस्थितीत पालक मुलांना सांगतात की, अजून मेहनत कर. पण या मुलीच्या वडिलांनी जे सांगितलं आहे, त्यानं सर्वांचच मन जिंकलं आहे.
“बेटा, डॉक्टर झाल्यावरच सगळं काही.."
वडील त्यांच्या मुलीला शांत करत म्हणाले, “बेटा, डॉक्टर झाल्यावरच सगळं काही ठीक होईल असं नाही. जगात खूप चांगल्या नोकऱ्या आहेत. तुझं वय अजून कमी आहे. अजिबात ताण घेऊ नकोस. अभ्यास कंटाळवाणा वाटत असेल तर सोडून दे. मी अजून म्हातारा झालो नाही. घरात कमावणारा मी आहे, तुला पैशांची चिंता करण्याची गरज नाही. मी भरपूर कमवेन, तू फक्त आनंदात राह.” वडिलांचे हे शब्द ऐकून केवळ मुलीच नाही तर व्हिडिओ पाहणाऱ्या लाखो लोकांच्या डोळ्यांत अश्रू आले.
नक्की वाचा >> ना स्टंटबाजी..ना मारली शायनिंग! रायडरने गोव्यात असं काही केलं..EMI सह घरखर्चही निघाला!
बाप-लेकीचा भावनिक व्हिडीओ झालाय व्हायरल
A young girl breaks down under heavy career pressure, but her father's calm and loving words give her strength.
— News Algebra (@NewsAlgebraIND) December 3, 2025
FATHER : "Don't cry, beta. There are many jobs. Don't come under pressure. Be happy"
"I am here for you, beta. I will earn for you" 🥹 pic.twitter.com/JvnOCkdDsW
हा व्हिडिओ फक्त एक भावनिक क्षण नाही, तर एक केस स्टडी आहे. आज आपण कोटा आणि इतर शहरांतून विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या ऐकतो, तेव्हा हे वडील एक आदर्श म्हणून पुढे येतात. ही एक शिकवण आहे की मुलांची ‘मार्कशीट'पेक्षा त्यांचे ‘मानसिक आरोग्य' अधिक महत्त्वाचे आहे. जर प्रत्येक पालक आपल्या मुलांना हेच सांगतील की ‘आम्ही तुमच्या सोबत आहोत, निकाल काहीही असो', तर कदाचित कोणताही मुलगा किंवा मुलगी कधी चुकीचे पाऊल उचलणार नाही.
नक्की वाचा >> ग्राहकांची मज्जाच मज्जा! आता Maruti Fronx वर मिळणार वर्षभरातील सर्वात मोठं डिस्काऊंट, किंमत वाचून खुश व्हाल
हा व्हिडिओ सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. X वर ही क्लिप @NewsAlgebraIND या हँडलवरून पोस्ट करण्यात आली असून लोक त्यावर भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत. एका युजरने म्हटलंय, “जगाने साथ दिली किंवा नाही, जर बापाने डोक्यावर हात ठेवला, तर मुलगा कोणतीही लढाई जिंकू शकतो.” दुसऱ्याने म्हटले “हे फक्त वडील नाहीत, तर खरे हिरो आहेत. काश! प्रत्येक मुलाला असा सपोर्ट सिस्टम मिळाला असता.” तसेच आणखी एका युजरने लिहिले, “म्हणूनच पप्पा म्हणजे पप्पा असतात!”
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world