Plant Purifies Air : घरात लावा ही 5 रोपं, स्वस्तात हवा स्वच्छ होईल, महागड्या एअर प्युरीफायरची गरज आता संपली!

Air Purifying Plants: महागडे एअरप्युरिफायर प्रत्येकाच्या बजेटमध्ये नसतात. अशावेळी अत्यंत सोप्या पद्धतीने घरातील हवा शुद्ध ठेऊ शकतात. 

जाहिरात
Read Time: 2 mins
Air Purifying Plants

दिल्ली-एमसीआरमध्ये प्रदूषण दिवसेंदिवस अधिक वाढत आहे. PM2.5 आणि PM10 सारख्या हानिकारक कणांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याचा परिणाम केवळ फुप्फुसंवर होत नाही तर हृदय आणि मेंदूवरही होतो. घराच्या आतही धूळ आणि धुरामुळे हवा स्वच्छ राहत नाही. महागडे एअरप्युरिफायर प्रत्येकाच्या बजेटमध्ये नसतात. अशावेळी अत्यंत सोप्या पद्धतीने घरातील हवा शुद्ध ठेऊ शकतात. 

घरात लावा ही पाच रोपं...

हिरवी रोपं केवळ घर सजवण्याचं काम करीत नाही तर घरातील हवा स्वच्छ ठेवतत. यामुळे कार्बन डायऑक्साइडचं ऑक्सीजनमध्ये रुपांतर होतं. आणि हानीकारक वायू शोषून घेतात. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, काही वनस्पती फॉर्मल्डिहाइड, बेंझिन आणि अमोनिया सारखे वायू कमी करण्यास मदत करतात. दिल्ली-एनसीआरमध्ये घरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी प्रभावी असलेल्या अशा पाच वनस्पतींबद्दल जाणून घेऊया.

1. स्नेक प्लान्ट (Snake Plant) : स्नेक प्लान्ट याला मदर-इन-लॉज टंग देखील म्हटलं जातं. रात्री हे रोप ऑक्सीजन उत्सर्जित करतं. यामुळे चांगली झोप लागते. याला जास्त पाणी किंवा उन्हाळी गरज भारत नाही. त्यामुळे हे रोप घराच्या कोपऱ्यात ठेवता येतं. 

2. एरेका पाम (Areca Palm) : एरेका पाम ह्यूमिडिटी कायम ठेवणे आणि हवा शुद्ध करण्यास मदत करते. या रोपाची मोठी पानं हवेतील हानिकारक वायू शोषून घेतो. याला प्रकाशात ठेवता येतं. यामुळे याची वाढ लवकर होते. याची काळजी घेणं सोपं आहे. 

3. स्पाइडर प्लान्ट (Spider Plant): स्पाइडर प्लान्ट कार्बन मोनोऑक्साइड आणि फॉर्मलडीहाइड सारखे वायू शोषून घेतं. हे रोप प्रकाशात ठेवता येतं. त्यामुळे रोपाची वाढ चांगली होते. याची काळजी घेणं अत्यंत सोपं आहे. 

Advertisement

4. पीस लिली (Peace Lily) : पीस लिली हवेला शुद्ध ठेवण्याबरोबरच घरातील सौंदर्य वाढतं. हे रोप कार्बन डाइऑक्साइड, बेंजीन आणि अमोनिया सारखे वायू शोषित करतं. हे रोप अत्यंत कमी प्रकाशातही चांगलं वाढतं. 

5. एलोविरा (Aloe Vera) : एलोविरा केवळ हवा स्वच्छ ठेवत नाही तर याच्या पानांमधील जेल त्वचा आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे रोप कार्बन डाइऑक्साइड शोषून घेतं आणि ऑक्सीजन सोडतं. 

Advertisement

नक्की वाचा - Morning Habits : सकाळी 5 वाजता उठणारे लोक अधिक आनंदी आणि यशस्वी का असतात? जाणून घ्या कारणं आणि फायदे

Advertisement


लहान मुलांसाठी फायदेशीर...

वनस्पतींची काळजी घेणे हा मुलांना निसर्गाच्या जवळ आणण्याचा एक चांगला मार्ग आहे. यामुळे त्यांना  जबाबदारी आणि नैसर्गिक आरोग्याचं महत्त्व कळतं. तुमच्या बाल्कनीत, बैठकीच्या खोलीत किंवा बेडरूममध्ये वनस्पती ठेवणे हा एक उत्तम पर्याय आहे.