Relationship: नातं जुळण्यासाठी डेटिंग अॅपचा वापर हा एकेकाळी प्रचलित ट्रेंड होता. पण आता लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. डेटिंग ॲप्सबद्दल नाराजी वाढू लागली आहे. अनेक जण डेटिंग ॲप्स काही महिने वापरून ते डिलीट करतात आणि पुन्हा तिकडं फिरकत नाहीत. डेटिंग ॲप्सची लोकप्रियता आता कमी का होऊ लागली आहे? लोकांचा त्यामुळे अपेक्षाभंग का होत आहे? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठीच वॉर्विक विद्यापीठातील आन्ह लुओंग यांनी संशोधन केले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे कारण?
या संशोधनानुसार ब्रिटनमध्ये 4 मोठ्या डेटिंग ॲप्सने गेल्या वर्षी लाखो युजर्स गमावले आहेत. याचे कारण म्हणजे या डेटिंग ॲप्सला युझर्स कंटाळले आहेत आणि निराश झाले आहेत. अन्य युझर्सचं चुकीचं कारण हे याचं मोठं कारण आहे. त्याचबरोर एआयमुळे मिळत असलेले चुकीचे प्रस्ताव हा देखील मोठा प्रश्न आहे.
पारदर्शकता कमी
यापूर्वी डेटिंग वेबसाइट्सवर अनेक प्रकारचे प्रश्न विचारून दुसऱ्या युजर्सबद्दल काहीतरी माहिती मिळवता येत होती. एखाद्या अनोळखी व्यक्तीला जाणून घेण्यासाठी अनेक पर्याय होते. डेटिंग ॲप्सवर ही माहिती मर्यादित झाली आहे. यापूर्वी भावी पार्टनरकडून काय हवे आणि काय नको? हा प्रश्न देखील वेबसाईटकडून विचारला जात असे. पण, आता या गोष्टी वैकल्पिक झाल्या आहेत. त्यांची उत्तर फार कमी युझर्स देतात.
हे डेटिंग ॲप्स एका बिझनेस मॉडेलप्रमाणे काम करत आहेत, ज्यामध्ये आपल्या आवडीचा साथीदार शोधणे खूप कठीण काम वाटू लागले आहे. याशिवाय या ॲप्सवर जोपर्यंत अतिरिक्त पैसे दिले जात नाहीत तोपर्यंत तुमची प्रोफाइल जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही.
( नक्की वाचा : Grey Divorce प्रकार काय आहे? तो का घेतला जातो? )
समाधान नाही
डेटिंग ॲप्स वापरणाऱ्या युझर्समध्ये असंतोष वाढत आहे. त्यामधून मनासारखी कनेक्शन तयार होत नाही, असा त्यांचा आक्षेप आहे. युझर्स एक दिवस बोलतात आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांना घोस्ट करू लागतात, म्हणजेच अचानकपणे बोलणे बंद करतात. याशिवाय फ्लेकिंग म्हणजे खूप बोलल्यानंतर शेवटी एकमेकांना नकार देणे. या प्रकारच्या गोष्टी डेटिंग ॲप्सवर खूप जास्त वाढल्या आहेत.
( नक्की वाचा : Boysober रिलेशनशिप ट्रेंड काय आहे? यामध्ये मुलं-मुली काय करतात? )
संशोधनाचा निष्कर्ष काय?
या संशोधनाच्या निष्कर्षानुसार, लोकं अजूनही डेटिंग ॲप्स वापरत आहेत, पण ते पूर्वीपेक्षा जास्त समजूतदार झाले आहेत. या ॲप्सवर त्यांचा अनुभव चांगला असावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. अनुभव चांगला नसल्यास ते या ॲप्सवरून निघून जातात. त्याचबरोबर डेटिंग ॲप्सवर पारदर्शकता वाढावी, अशी त्याची मागणी आहे.