Winter Health News: बीट ज्युसमध्ये लिंबू पिळल्यास काय होईल? 15 दिवस हा उपाय केल्यास शरीरात होतील मोठे बदल

Benefits Of Beetroot Juice With Lemon: नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार लिंबूतील व्हिटॅमिन सी आणि बीटमधील लोह-अँटी-ऑक्सिडंट्समुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Benefits Of Beetroot Juice With Lemon: बीट ज्युसमध्ये लिंबाचा रस मिक्स केल्यास काय होईल?"
Canva

Benefits Of Beetroot Juice With Lemon: दिवसाची सुरुवात चांगली आणि निरोगी पद्धतीने केली तर शरीर दिवसभर सक्रिय राहते. थकवा आणि अशक्तपणा दूर होण्यास मदत मिळेल. सकाळी रिकाम्या पोटी बीट, आले आणि लिंबाचा रस पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. एमडीपीआयने प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, बीटमध्ये नायट्रेट्सचे प्रमाण खूप असते. बीट ज्युसमध्ये लिंबाचा रस मिक्स करुन प्यायल्यास हृदयाचे आरोग्य सुधारते. परिणामी त्वचेचा रंग आणि पोत सुधारेल, पचनसंस्था मजबूत होते. याशिवाय लिंबूमधील व्हिटॅमिन सी आणि बीटमधील लोह तसेच अँटी-ऑक्सिडंट्समुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होईल. रोगप्रतिकारकशक्ती मजबूत असेल तर शरीराचे संसर्गांपासून संरक्षण होण्यास मदत मिळेल. 

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, लिंबातील पॉलिफेनोल्समध्ये अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म थकवा आणि लिपिड पेरोक्सिडेशन कमी करण्यास मदत करतात. ज्यामुळे वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात शिवाय संपूर्ण शरीरालाही फायदा होतो. बीट ज्युसमध्ये लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्यास कोणते फायदे मिळतील? हा उपाय किती दिवस करावा? यासह सर्व माहिती सविस्तर जाणून घेऊया...

शरीराला ऊर्जा मिळेल

बीटमध्ये नायट्रेटचे गुणधर्म आहेत, जे स्नायू आणि मेंदूच्या भागातील रक्तप्रवाह तसेच ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतात. यामुळे थकवा कमी होण्यास मदत मिळते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त आहे, जे बीटमधील लोह शोषून घेण्यास शरीरास मदत करतात. ज्यामुळे शरीर डिटॉक्स होते. 

पचनप्रक्रिया

बीटमध्ये फायबरचे प्रमाण जास्त आहे, ज्यामुळे मलत्याग करण्यात अडथळे निर्माण होत नाही. फायबरमुळे आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांना पोषणतत्त्वांचा पुरवठा होऊन पचनप्रक्रिया सुधारले. ज्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन, गॅस आणि अ‍ॅसिडिटी यासारख्या समस्यांपासून सुटका मिळेल.

Advertisement

वेटलॉस

वजन कमी करण्यासाठी बीट ज्युस आणि लिंबू एकत्रित प्यायल्यास शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळेल. शरीराचे अतिरिक्त वजन कमी होईल, ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ सहजरित्या शरीराबाहेर फेकले जातील.  

Advertisement

(नक्की वाचा: थंडीत 30 दिवस लाल ज्युस पिण्याचे अद्भुत फायदे, चेहऱ्यावर इतका ग्लो येईल की ब्युटी पार्लरमध्ये जाणं कराल बंद)

त्वचेसाठी लाभदायक 

लिंबू आणि बीट दोन्ही गोष्टी त्वचेसाठी फायदेशीर आहेत. बीटमुळे रक्त शुद्ध होण्यास मदत मिळते आणि रक्तप्रवाह देखील सुधारते, यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि मुरुमांची समस्याही दूर होते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण आहे, ज्यामुळे कोलेजनचे उत्पादन वाढते आणि त्वचेवर नैसर्गिक तेज येते.  

Advertisement

(नक्की वाचा: Sweet Potato Benefits: रताळं खाण्याची योग्य पद्धत कोणती, हिवाळ्यात रताळं खाल्ल्यास कोणते फायदे मिळतील?)

बीट ज्युस किती दिवस प्यावा?

- बीट ज्युस कधीही सलग पिऊ नये. 10 ते 15 दिवस बीट ज्युस प्यावा आणि त्यानंतर ब्रेक घ्यावा किंवा आठवड्यातून दोन ते तीन वेळा बीट ज्युस प्यावा.

- दिवसभरात एक ग्लासच बीट ज्युस प्यावा.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)