Winter Skin Care Tips: हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी होणे (Dry Skin Remedies) ही सामान्य समस्या आहे. पण त्वचा आवश्यकतेपेक्षा अधिक कोरडी होत असेल तर यावर वेळीच उपाय करणे आवश्यक आहे. अन्यथा त्वचेशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ त्वचा फाटणे, त्वचेतून रक्त येणे, इत्यादी. त्वचा कोरडी पडल्यानंतर चेहऱ्यावरील तेजही कमी होते. तुम्ही देखील या समस्यांवर उपाय शोधत आहात का? तर जाणून घेऊया काही साधेसोपे उपाय... स्किन केअर रुटीनमध्ये या टिप्स फॉलो केल्यास हिवाळ्यातही तुमच्या चेहऱ्यावर नॅचरल ग्लो दिसू शकतो.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
कोरड्या त्वचेपासून सुटका कशी मिळवावी? | How To Get Rid Of Dry Skin In Winter
- पहिला उपाय तुम्हाला आंघोळीच्या वेळेस करावा लागेल. हिवाळ्यामध्ये काही लोक कडक गरम पाण्याने आंघोळ करतात. यामुळे त्वचा अधिक कोरडी होते.
- तसेच जास्त वेळ आंघोळ करण्यापेक्षा केवळ पाच ते 10 मिनिटांत आंघोळ पूर्ण करावी.
- आंघोळीनंतर संपूर्ण शरीरावर तेल लावू शकता.
- त्वचेवर ब्रश वापरणे किंवा स्क्रब करणे टाळावे.
- ब्रशचा वापर केल्यास त्वचा आवश्यकतेपेक्षा अधिक एक्सफोलिएट होते आणि कोरडेपणा वाढू लागतो.
- ओल्या शरीरावर तेल किंवा एखादे क्रीम लावल्यास त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यास मदत मिळू शकते.
- आंघोळ केल्यानंतर अथवा चेहरा धुतल्यानंतर त्वचेवर क्रीम न लावल्यास त्वचा कोरडी दिसते.
(नक्की वाचा: Hair Growth Tips: नाभीवर हे तेल लावून करा मसाज, केसांची होईल जबरदस्त वाढ)
स्किन केअर रुटीनमध्ये या टिप्सही करा फॉलो
- कोरड्या त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर नारळाचे तेल लावू शकता.
- नारळाच्या तेलाऐवजी बदामाचेही तेल वापरू शकता.
- त्वचेवर दूध लावल्यासही कोरडेपणा दूर होण्यास मदत मिळू शकते. यासाठी कापसाच्या मदतीने कच्चे दूध त्वचेवर लावा.
- एलर्जी नसल्यास दुधाची मलई देखील तुम्ही त्वचेवर लावू शकता.
- कोरफड जेलचा वापर केल्यास त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यास मदत मिळू शकते.
- कोरफड जेलमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, ज्यामुळे त्वचा मऊ होते.
- आठवड्यातून एकदा मधाचे फेस पॅक वापरू शकता. मध आणि दूध मिक्स करून पॅक तयार करा. हे पॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचेशी संबंधित कित्येक समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते.