World Emoji Day 2025: वर्ल्ड इमोजी डे का साजरा केला जातो? या इमोजीचा सर्वाधिक होतोय वापर

World Emoji Day 2025: डिजिटलच्या युगात मेसेज करताना इमोजीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. संभाषणादरम्यान वापरल्या जाणाऱ्या इमोजींमध्येही शब्दांइतकीच शक्ती असते.

जाहिरात
Read Time: 2 mins
World Emoji Day 2025: वर्ल्ड इमोजी डे कधी साजरा केला जातो?

World Emoji Day 2025: डिजिटलच्या युगात लोक एकमेकांना मेसेज करताना इमोजीचा (World Emoji Day) हमखास वापर करतात. इमोजी म्हणजे छोटी-छोटी चिन्हं असतात, ज्यामध्ये वेगवेगळ्या हावभावांसह काही आकार तसंच चिन्हांचाही समावेश असतो. युजर्सकडून त्यांना आवश्यक त्या ठिकाणी या चिन्हांचा मेसेजमध्ये वापर केला जातो. रडण्याचे भाव दर्शवण्यासाठी रडणाऱ्या चेहऱ्याचे इमोजी तर हसू येत असल्यास हसणारे भाव दर्शवणाऱ्या इमोजीचा मेसेजमध्ये वापर केला जातो. मोठमोठे मेसेज लिहिण्याऐवजी लोक आता इमोजीचाच वापर करू लागले आहेत. इमोजींच्या माध्यमातून मेसेजद्वारे भावना व्यक्त करू लागले आहेत. या इमोजींसाठीच दरवर्षी 17 जुलैला 'वर्ल्ड इमोजी डे' (World Emoji Day 2025) साजरा केला जातो. 

मेसेजमध्ये हल्ली प्रत्येक रंगामध्ये झाड, फुले, नदी, घर, जनावरे वेगवेगळ्या गोष्टींचे इमोजी उपलब्ध आहेत. पण लोक सर्वाधिक कोणत्या इमोजीचा वापर करतात, हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Advertisement

वर्ल्ड इमोजी डे का साजरा केला जातो?| World Emoji Day 2025 History

वर्ष 1980 मध्ये इमोजीपूर्वी इमोटिकनची सुरुवात झाली होती, यामध्ये टेक्स्ट कीबोर्डवरील चिन्हांच्या मदतीने इमोटिकन तयार केले जात असत. उदाहरणार्थ हास्याचे भाव दर्शवण्यासाठी ":)" तर उदास असल्याचे भाव दर्शवण्यासाठी ":(" अशा इमोटिकन्सचा वापर केला जात असे. जपानी डिझाइनरने या इमोटिकन्सची निर्मिती केली होती. वर्ष 2011मध्ये अ‍ॅपलने iOS मध्ये इमोजी कीबोर्डचे नवीन फीचर आणले होते, यानंतर कित्येक देशांमध्ये इमोजीचा वापर होऊ लागला. आता प्रत्येक फोनमध्ये इमोजीचे फीचर उपलब्ध आहे. सोशल मीडियाच्या युगात इमोजीचे एक वेगळेच महत्त्व आहे. इमोजीविना प्रत्येक संवाद अपूर्णच असतो जणू काही. इमोजींचा (Emojis) वापर आणि या चिन्हांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी 'वर्ल्ड इमोजी डे' साजरा केला जातो. 

Advertisement

Advertisement

(नक्की वाचा: Happy World Emoji Day 2025 Wishes: शब्दांच्या पलिकडले भावविश्व, वर्ल्ड इमोजी डेनिमित्त पाठवा खास शुभेच्छा)

कोणत्या इमोजीचा सर्वाधिक वापर केला जातो?

  • इमोजीपीडियानुसार हार्ट इमोजीचा (Heart Emoji) सर्वाधिक वापर केला जातो. 
  • यानंतर हिरव्या रंगाच्या बॉक्समधील चेक मार्क असणाऱ्या इमोजीचा वापर सर्वाधिक केला जातो. 
  • यानंतर रडणारे आणि हसणारे भाव दर्शवणाऱ्या इमोजीचा वापर जास्त प्रमाण होतोय.