2024 Dating Trends : यावर्षी तरुणांमध्ये खूप गाजले हे डेटिंग ट्रेंड्स, बदलली नात्यांची भाषा

जाहिरात
Read Time: 2 mins
बदलत्या काळात डेटिंगचे ट्रेंड्सही बदलले आहेत. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:


Year Ender Dating Trends 2024:  डेटिंगमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी एकमेकांसोबत क्वालिटी टाईम  (Quality Time) घालवतात. एकमेकांना समजून घेततात. त्यानंतर एकमेकांसोबत आयुष्य घालवायचं की नाही याचा विचार करतात. डेटिंगच्या या साध्या ट्रेंडमध्ये काही नवे ट्रेंड यावर्षी प्रचलित झाले आहेत. सोशल मीडियावर बदलत्या ट्रेंड्सचा परिणाम आता रिलेशनशिपवरही होत आहे. विशेषत: डेटिंमध्ये (Dating) इतके बदल होत आहेत की ते समजल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण, हे ट्रेंड सध्या सोशल मीडियावर चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

बेनचिंग

या प्रकारच्या रिलेशनिपमध्ये तुम्हाला कुणी आवडला असेल तर त्याचा वेटिंग लिस्टमध्ये समावेश केला जातो. या ट्रेंडमध्ये अनेकदा एखाद्या डेट करत असताना दुसरा पर्याय वेटिंगमध्ये ठेवला जातो. बेनचिंगवरचा व्यक्ती देखील त्याच्या इच्छेनुसार अन्य व्यक्तीशी डेटिंग करु शकतो. त्याच्यासोबत आऊटिंग करतो. पण, त्यांच्यात रिलेशनशिपची चर्चा होत नाही. 

( नक्की वाचा : अभिषेक-ऐश्वर्यामुळे चर्चेत आलेला Grey Divorce प्रकार काय आहे? तो का घेतला जातो? )
 

फिजिकल डेटिंग

डेटिंगचा हा प्रकार फिजिकल आणि डिजिटल या दोन्ही प्रकार एकत्र करुन तयार झाला आहे. त्यामध्ये पहिल्यांदा डिजिटल भेट होते. ऑनलाईन आवड जुळली तर ते जोडपं एकमेकांना भेटण्याचा निर्णय घेतं. 

नेक्स्टिंग

हा डेटिंगचा सर्वात फास्ट प्रकार आहे. यामध्ये एका रिलेशनशिपमधून दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये जाण्यास आणि त्याच्याशी डेटिंग करण्यास वेळ लागत नाही. आपल्या पार्टनरची एखादी गोष्ट आवडली नाही  तर त्याला सोडून लगेच दुसऱ्या व्यक्तीशी डोटिंगमध्ये यामध्ये करता येते. डेटिंगच्या या प्रकारालाच नेक्सिंटग असं म्हणतात. 

Advertisement

( नक्की वाचा : तरुणांमध्ये वाढत असलेला Boysober रिलेशनशिप ट्रेंड काय आहे? यामध्ये मुलं-मुली काय करतात? )
 

जॉम्बिंग

एखादा व्यक्ती तुम्हाला खूप आवडत होता. पण तुमचा त्याच्याशी अनेक दिवस काहीच संपर्क नव्हता. त्यानंतर अचानक डिजिटल माध्यमातून तो व्यक्ती तुमच्या आयुष्यात परत आला आणि तुमच्यामध्ये पुन्हा  एकदा गप्पांचा ओघ सुरु झाला. बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा संपर्क झालेला पार्टरनर पूर्वी काहीच झालं नाही असं दाखवतो. या पद्धतीनं डेटिंगमध्ये रिलेशनशिपला पुन्हा एकदा संधी देण्याच्या प्रकाराला जॉम्बिंग म्हणतात. 

DIFO

DIFO म्हणजे डेट इन, फेड आऊट. या पद्धतीच्या डेटिंगमध्ये दोन व्यक्तींमध्ये बोलणं सुरु असतं. पण, डेटनंतर हळू हळू ते बोलणं कमी होतं किंवा एकदम बंद होतं. या प्रकारच्या रिलेशनशिपला डेट इन फेड आऊट असं म्हंटलं जातंय. या पद्धतीच्या डेटिंगमधील कपल्समध्ये नेहमी संभ्रम असतो. समोरचा व्यक्तीला आपण आवडतो की नाही हे त्याला समजत नाही. 

Advertisement

स्पष्टीकरण : ही सामान्य ज्ञानावर आधारित माहिती आहे. NDTV नेटवर्क यापैकी कोणत्याही प्रकाराचं समर्थन किंवा प्रसार करत नाही. या प्रकारच्या कोणत्याही प्रकाराचं अनुकरण करण्यापूर्वी तुमच्या जवळच्या व्यक्तीचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. NDTV नेटवर्क यामधील कोणत्याही प्रकाराच्या जबाबदारीचा दावा करत नाही.

Topics mentioned in this article