मुंबई: एकीकडे राज्याच्या राजकारणात आता महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असतानाच पोलीस प्रशासनात मोठे आणि महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. राज्यातील 14 पोलीस तसेच आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आल्या आहेत. पंकज देशमुख, मोक्षदा पाटील यांच्यासह 14 बड्या पोलीस अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांना कुठे मिळाली पदोन्नती?
1. प्रसाद अक्कानवरु: पोलीस उप महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई.
2. पंकज देशमुख: अपर पोलीस आयुक्त, पुणे शहर
3. अमोघ गावकर: पोलीस उप महानिरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (प्रशासन), पुणे
4. जी. श्रीधर: पोलीस उप महानिरीक्षक, पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे.
5. मोक्षदा पाटील: पोलीस उप महानिरीक्षक, रा. रा. पोलीस बल, मुंबई.
6. राकेश कलासागर पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई
7. प्रियंका नारनवरे अपर पोलीस आयुक्त, वाहतूक, बृहन्मुंबई.
8.अरविंद साळवे सह संचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक
9. सुरेश कुमार मेंगडेमुख्य दक्षता अधिकारी, सिडको, नवी मुंबई (पद उन्नत करुन)
10. धनंजय कुलकर्णी अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, बृहन्मुंबई.
11. विजय मगर पोलीस उप महानिरीक्षक, रा. रा. पोलीस बल, पुणे (पद अवनत करुन)
12. राजेश बनसोडे अपर पोलीस आयुक्त, पुणे शहर
13. विक्रम देशमाने अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई.
14. राजेंद्र दाभाडे, अपर पोलीस आयुक्त, नागपूर शहर.