Nashik News : पायऱ्यांवरुन पाय घसरला अन् थेट दरीत; महाराष्ट्रातील अवघड किल्ल्यावरुन पडून ट्रेकरचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्ल्यावरून पडून 29 वर्षीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Harihar Fort News : पावसाळ्यात गडकिल्ल्याची भ्रमंती हा तरुणांचा आवडता छंद. अनेकजण सुट्टीला हिलस्टेशन किंवा थंड हवेच्या ठिकाणी जाण्याऐवजी गड-किल्ल्यांवर जाणं पसंत करतात. त्यादरम्यान निसर्गाशी साधता येणारा संवाद आनंद आणि उत्साह देणारा असतो. हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत वसलेले डोंगर दऱ्या पाहण्याचा आनंद निराळाच असतो. हाच आनंद एका तरुणाच्या जिवावर उठल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मित्रांसोबत ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका तरुणाचा गड चढत (Youth dies after falling from Harihar Fort) असताना मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्ल्यावरून पडून 29 वर्षीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. आशिष समरीत असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. 30 ऑगस्ट, शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना  घडली. हा ट्रेकर भंडारा जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. हरिहर किल्ला हा तसं अवघड किल्ल्यांपैकी एक मानला जातो. सरळ चढण असल्याने लढताना आणि उतरताना अधिक काळजी घ्यावी लागते.

नक्की वाचा - Nandurbar News: यातना संपणार कधी? झोळीतून नेताना आदिवासी महिलेची रस्त्यातच प्रसूती

त्यात पावसाळ्यात पायऱ्या घसरड्या झाल्याने पाय घसरून पडण्याची भीती असते. आशिष किल्ल्यावर चढत असताना पाय घसरून थेट खोल दरीत पडला. त्याचा जागीच मृत्यू झाला. आशिष भंडारा जिल्ह्यातील 20 जणांच्या पर्यटकांचा ग्रुपसोबत किल्ल्यावर गेला होता. मात्र पाय घसरल्याने त्याचा मृत्यू झाला. 

Topics mentioned in this article