Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुख प्रकरणातील 3 आरोपींची हत्या, मृतदेह सापडले; कोणी केला खळबळजनक दावा?

संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी या मागणीसाठी सर्व पक्षांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात येत आहे. अशातच या प्रकरणातील फरार आरोपींबाबत सर्वात खळबळजनक माहिती समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

स्वानंद पाटील बीड: बीडच्या मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 19 दिवस उलटले मात्र अद्यापही या घटनेतील आरोपी फरार आहेत. आज बीड शहरात संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी या मागणीसाठी सर्व पक्षांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात येत आहे. अशातच या प्रकरणातील फरार आरोपींबाबत सर्वात खळबळजनक माहिती समोर आली आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तीन फरार आरोपींची हत्या करण्याता आल्याचा सर्वात मोठा आणि खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. मला एका व्यक्तीने फोन करुन याबाबतची माहिती दिली असून त्यांचे मृतदेहही सापडलेत, असं दमानिया यांनी म्हटलं आहे. बीडच्या मोर्चाआधी माध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाल्या अंजली दमानिया?

 'काल रात्री साडे अकरा मला एक फोन आला. त्यांनी सांगितलं की संतोष देशमुखचे आरोपी  कधीच सापडणार नाहीl कारण त्यांचे मृतदेह सापडले आहेत. त्या व्यक्तीने जागाही सांगितली. मी याबाबतचे कॉल रेकॉर्डिंग पोलिसांकडे पाठवले आहेत ते चौकशी करत आहेत. हे प्रकरण गंभीर असून मी हादरुन गेले आहे. यामध्ये धनंजय मुंडे हेच मुख्य आहेत, त्यांच्यामुळेच वाल्मिक कराड पोलिसांचा वापर करत आहेत,' असं त्या म्हणाल्यात. 

आजचा बीडचा मोर्चा म्हणजे ड्रामा. आज जे मोर्चात सहभागी होतायत त्या सगळ्यांनी धनंजय मुंडेंसोबत काम केले आहे.  शरद पवारांना सुद्धा माहितीय धनंजय मुंडे यांचे कारनामे. त्यांनी सोबत काम केले आहे. त्यामुळे या ड्राम्यामध्ये सहभागी होणार आहे.  मी आधीच सांगितले होते की शनिवारी मी बीडला जाऊन ठिय्या आंदोलन करणार. माझा आणि मोर्चाशी सबंध नाही, असे म्हणत त्यांनी आजच्या मोर्चावरही टीका केली आहे. 

( नक्की वाचा : Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या हाती पिस्तूल सोबत वाल्मिक कराड, दमानियांनी दाखवले Video )