जाहिरात

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या हाती पिस्तूल सोबत वाल्मिक कराड, दमानियांनी दाखवले Video

Dhananjay Munde News : अन्न आणि नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे नव्या वादात सापडले आहेत.

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या हाती पिस्तूल सोबत वाल्मिक कराड, दमानियांनी दाखवले Video
मुंबई:

Dhananjay Munde News : अन्न आणि नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे नव्या वादात सापडले आहेत. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात कराड अद्याप फरार आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरलीय. विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनात त्याचे पडसाद उमटले. त्याचवेळी धनंजय मुंडे यांचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी हे व्हिडिओ ट्विट करत मंुडेवर निशाणा साधला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाल्या दमानिया? 

अंजली दमानिया यांनी एकामोगमाग एक असे ट्विट करत मुंडेंवर निशाना साधलाय. पहिल्या व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे कारमध्ये ड्रायव्हरच्या सिटवर बसले असून त्यांच्या शेजारी वाल्मिक कराड आहे. तर त्याचवेळी त्यांनी मुंडे यांनी हातात पिस्तूल घेतल्याचा फोटोही दमानिया यांनी पोस्ट केलाय.

हे असले बॉस ? इनेटाग्राम वर अशी reels दाखवल्यावर नवी पिढी ह्यातून काय प्रेरणा घेणार ? कष्ट न करता पिस्तुल दाखवून पैसे कमावणे सोपे असेच त्यांना वाटते. आपला देश असा असणार आहे का ? हे देशाबद्दल vision असणार आहे का ? ताबडतोब बीड मधील सगळ्या शास्त्र परवान्यांवर चौकशी लावा. गरज नसलेले सगळे परवाने रद्द करा, अशी मागणी दमानिया यांनी या ट्विटमध्ये केली.

अंजली दमानिया याच ट्विटवर थांबल्या नाहीत. त्यांनी आणखी एक व्हिडिओ ट्विट केला. त्यामध्ये वाल्मिक कराड पोलिसांशी चर्चा करत असल्याचं दिसत आहे. हे पोलिस आहेत का ह्या वाल्मिक कराडांचे नोकर? असा प्रश्न दमानियांनी विचारला.

धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर आघाडी उघडलीय. त्याचवेळी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या प्रकरणात राजकारण केलं जात आहे. त्यामधूनच आपलं नाव पुढं करण्यात आलंय. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही. या हत्येमध्ये कुणीही असला, अगदी माझ्या जवळचा असला तरी त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आपली भूमिका आहे, असं मुंडे यांनी सांगितलं.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: