5 days ago

आज छत्रपती संभाजी महाराजांची 336 वी पुण्यतिथी आहे. आज सकाळी अजित पवारांनी पुण्यात छत्रपती संभाजी राजेंच्या स्मृतीस्थळी अभिवादन केलं. याशिवाय मोठं स्मारक उभारणार असल्याची घोषणा केली. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. 

Mar 29, 2025 22:40 (IST)

मुलुंड पश्चिममध्ये 1800 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती

मुलुंड पश्चिमेकडील टी विभागाला  पाणीपुरवठा करणाऱ्या 1800 मिलीमीटर  व्यासाच्या जलवाहिनीवर भांडुप पश्चिमेकडील तानसा जलवाहिनी जवळ मोठ्या प्रमाणावर गळती झाल्याचे आज  29 मार्च 2025 आढळून आले आहे.   सदरच्या ठिकाणी जलवाहिनी दुरुस्तीचे काम सहाय्यक अभियंता (जलकामे) परिरक्षण पूर्व उपनगरे घाटकोपर यांच्या मार्फत हाती घेण्यात आले आहे . दुरुस्ती काम युद्ध पातळीवर सुरू असून , काम पूर्ण करून पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी अंदाजे 10 ते 12 तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे . त्यामुळे खालील भागात पाणी पुरवठा होणार नाही.

Mar 29, 2025 21:37 (IST)

राज ठाकरे यांच्या विरोधातील दोषारोपपत्र रद्द

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात परळी वैजनाथ येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा आणि दोषारोपपत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी व न्या. संजय देशमुख यांनी रद्द केले आहे. राज ठाकरे यांच्या अटकेनंतर 2008 साली उसळलेल्या दंगलीमध्ये परळी-गंगाखेड या मार्गावर एस. टी. बस थांबवून दगडफेक झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी राज ठाकरे व इतर आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

Mar 29, 2025 18:09 (IST)

उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ लोकल च्या लगेज डब्यात लागली आग

उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ लोकल च्या लगेज डब्यात लागली आग

दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडलेली घटना

प्रवाशाने ठेवलेल्या सामानाला लागली होती आग

रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत आग विझवली

10 ते 15 मिनिटं लोकल खोळंबल्याची माहिती

Mar 29, 2025 16:21 (IST)

आयपीएस अधिकारी सुधाकर पठारे यांचे अपघातात निधन

महाराष्ट्राचे 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी सुधाकर पठारे आणि त्यांचे सहबंधू भगवत खोडके यांचे आज तेलंगणातील श्रीशैलम, नागरकुरनूल येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात दुर्दैवी निधन झाले. ही दुःखद घटना आज (शनिवारी) घडली असून, नागरकुरनूलचे पोलीस अधीक्षक वैभव गायकवाड (IPS) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Advertisement
Mar 29, 2025 15:54 (IST)

पिंपरी चिंचवडमध्ये 6 लाख रुपये किंमतीचा 10 किलो गांजा शिक्षकाकडून जप्त

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मानधनावरील क्रीडा शिक्षका कडून पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 6 लाख रुपये किंमतीचा 10 किलो 138 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केलाय, हरीश मदन सोनवणे असं या क्रीडा शिक्षकाचे नाव आहे . 

Mar 29, 2025 15:04 (IST)

Live Update :रामटेक लोकसभा मतदारसंघातील महत्वपूर्ण नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात रामटेक लोकसभा मतदारसंघातील महत्वपूर्ण नेते कार्यकर्ते पक्ष पक्षप्रवेश करणार आहेत. सुमारे पाचशे कार्यकर्ते यावेळी भारतीय जनता पक्षात येतील असे सांगितले जात आहे. आज दुपारी 3.30 वाजता कोराडी येथे कार्यालयात हा पक्ष प्रवेश कार्यक्रम होणार आहे.

Advertisement
Mar 29, 2025 13:29 (IST)

Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं विठ्ठल दर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं विठ्ठल दर्शन 

विठ्ठलाच्या मूर्तीची आणि गर्भगृहाची केली देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी

विठ्ठल दर्शननंतर मंदिर जत्रा आणि संवर्धनाची फडणवीस करत आहेत पाहणी

पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून जतन आणि संवर्धनाची माहिती घेत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Mar 29, 2025 12:57 (IST)

Live Update : करूणा मुंडेंनी धनंजय मुंडेंविरोधात दाखल केलेल्या सुनावणीला सुरुवात...

करूणा मुंडेंनी धनंजय मुंडेंविरोधात दाखल केलेल्या सुनावणीला सुरुवात...

Advertisement
Mar 29, 2025 11:04 (IST)

Live Update : रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या इशाऱ्यामुळे शेकडो मच्छीमारी बोटी किनाऱ्याला

रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या इशाऱ्यामुळे शेकडो मच्छीमारी बोटी किनाऱ्याला 

दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता 

वाऱ्याचा खोल समुद्रातील मासेमारीवर परिणाम 

बहुतांश मच्छीमारी बोटी बंदरात उभ्या

जिल्ह्यात अडीच हजार मच्छीमारी बोटी 

मिरकरवाडा, जयगड, साखरी नाटे, हर्णे, पूर्णगड, गुहागर, बंदरात मच्छीमारी बोटी किनाऱ्यालाच 

गेल्या दोन दिवसांपासून किनारपट्टी भागात ढगाळ हवामान 

मच्छीमारीच्या हंगामात मासेमारी ठप्प झाल्याने मासेबाजारपेठेवरही परिणाम 

सुरमई झाली 900 रुपये किलो, मच्छी वरती अवलंबून असणारे छोटे मोठे व्यवसाय ठप्प 

Mar 29, 2025 11:03 (IST)

Live Update : जालन्यात मार्च अखेरीस पारा 40℃ च्या पुढे जाण्याची शक्यता

जालना जिल्ह्यात दिवसागणिक तापमानाचा पारा वाढत चालला आहे. मार्चअखेर पर्यंत 40℃ पेक्षा जास्त वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच जिल्ह्यातील 56 लघु प्रकल्पात सध्या 27 टक्केच उपयुक्त जलसाठा आहे. 15 प्रकल्पांतील पाणीपातळी मृत साठ्यात आहे. दोन प्रकल्प कोरडे पडले आहेत. 17 प्रकल्पांतील उपयुक्त जलसाठा 25  टक्क्यांपेक्षा कमी आहे. जिल्ह्यातील 7 मध्यम प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठ्याचे प्रमाण 30 टक्के आहे. त्यातच जिल्ह्यातील गोदावरी, पूर्णा, केळणा दुधना नदी पत्रात ही कोरड निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 700 गावावर पाणी टंचाईच संकट घोगवंत असताना गेल्या दोन आठवडाभरा पासून जिल्ह्यातील अनेक गावांडून टँकर प्रस्ताव येण्यास सुरुवात आली. तर जवळपास 15 टँकरने गावांना पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी 12 विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. त्यातून 27 हजार 800 लोकसंख्येला पाणी पुरवठा केल्या जात आहे.

Mar 29, 2025 08:50 (IST)

Live Update : पुणे विद्यापीठात 'सुरक्षा हेल्पलाइन' उपक्रम सुरू, सुरक्षेसंबंधित तक्रार करता येणार

पुणे विद्यापीठात 'सुरक्षा हेल्पलाइन' उपक्रम सुरू 

विद्यापीठात घडत असलेले प्रकार बघून विद्यापीठ प्रशासनाला जाग 

विद्यापीठात गेल्या काही महिन्यांपासून घडलेल्या घटनांची दखल घेत आता अखेर विद्यापीठाला जाग आली आहे. विद्यापीठाने विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि अभ्यागत यांच्या सुरक्षेसाठी 'विशेष सुरक्षा हेल्पलाइन' सुरू करण्यात आली आहे

हेल्पलाइनद्वारे विद्यापीठ परिसरातील सुरक्षेसंबंधित तक्रार करता येणार 

विद्यापीठाकडून हेल्पलाइन नंबर प्रसिद्ध 

०२०-४८५५३३८३ या नंबर वरती करता येणार तक्रार

Mar 29, 2025 07:17 (IST)

Live Update : वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला पुष्पहार अर्पण

पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून आज बलिदान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे त्यासोबतच उदयनराजे संभाजी राजे यांच्यासह अनेक मान्यवर हे या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी उपस्थित होते. कालपासूनच शंभू प्रेमी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. 

Mar 29, 2025 07:15 (IST)

Live Update : बिबट्याच्या हल्ल्यात वन विभागाचे दोन कर्मचारी जखमी

दिंडोरीच्या शिंदवडमध्ये मुक्त संचार करणारा बिबट्याने रेस्क्यू टीमवर हल्ला चढविल्याने वनविभागाचे दोन कर्मचारी  जखमी झाले. संरक्षक जाळी असल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र जखमी अवस्थेतही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संरक्षक जाळी  बिबट्याला पकडून ठेवलं.  जखमी अवस्थेत असलेला बिबट्या  आक्रमक झाल्याने त्यास पिंजऱ्यात जेरबंद करता येत नव्हता. अखेर नाशिक येथून डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. बिबट्याला बेशुध्द करून पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. बिबट्याच्या पायाला दुखापत होती तर तापही असल्याने त्याच्यावर उपचार करून डॉक्टरांच्या निगराणीत ठेवण्यात आले आहे.

Mar 29, 2025 07:14 (IST)

Live Update : बाजारात लिंबाचे भाव 150 ते 160 रुपये किलोवर

जळगाव मध्ये किरकोळ बाजारात लिंबूचे भाव 150 ते 160 रुपये किलोवर पोहोचले असून उन्हाळ्यामुळे एकीकडे लिंबूची आवक घटली आहे. तर दुसरीकडे बाजारात लिंबूची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने लिंबूचे भाव 150 ते 160 रूपये किलो झाले असून महिन्याभरात लिंबूचे भाव हे दोनशे रुपये किलोवर पोहोचण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्याचे तापमान हे 40 डिग्री अंशावर पोहोचले असून त्यामुळे घरगुती वापरासह लिंबू शरबत विक्रेते यांच्याकडून मोठ्या प्रमाणात लिंबूची मागणी आहे. मात्र लिंबाचे भाव गगनाला भिडल्याने उन्हाळ्यात शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या लिंबू सरबतचे भावही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे